मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गंमतीची गोष्ट

नीधप · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मी लिहायचं तुम्ही नावाजायचं मी आनंदायचं परत लिहायचं हा आपलातुपला गंमतनाच! नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा. लिहिण्याचा हात धरून पळून गेली. खूप विनवलं तिला थांब म्हणून. पण ऐकेना. तिचं टुमणं एकच आळस सोड कष्ट कर कसं जमावं? जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला! पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड. 'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं कल्पना तरी कशी करू शकतेस तू?' गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!! गेलीच निघून आता मी नाही लिहायचं तुम्ही लिही ना म्हणायचं माझी मान वर तुम्ही परत लिही ना म्हणायचं आता माझी कॉलरच ताठ!! स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!! -इतिश्री निर्जाबाई उवाच!!

वाचने 1709 वाचनखूण प्रतिक्रिया 8

बिपिन कार्यकर्ते 01/09/2010 - 15:12
ओळखीचं वाटतंय!!! हे वाचून आमच्या मागे काही नतद्रष्ट लोक मातीचा पुढचा भाग लिही म्हणून मागे लागतात ते आठवलं.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक 01/09/2010 - 15:30
गप्प रे! नीरजानं कुठला लेख अर्धवट ठेवलेला आठवत नाही. उगा तिच्या या लेखामागं लपू नकोस. :) आणि आम्ही नतद्रष्ट काय? ठीके. पाहून घेईन.

प्रकाश घाटपांडे 01/09/2010 - 19:44
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!! गेलीच निघून
येईल परत. कायमची थोडीच निघुन जाणार.गंमत शब्द 'गम्मत' असा लिहिला कि निरागस व खेळकर वाटतो. कधी खोडकर सुद्धा! वाचताना देखील आपण मनातल्या मनात लहान होतो.

राजेश घासकडवी 01/09/2010 - 20:30
दोघांना एकत्र परत बोलवा. फक्त हे कष्टाचं लफडं मध्ये कुठून आलं कळलं नाही. त्या दोघांचा पाहुणचार करावा लागतो का?

पिवळा डांबिस 03/09/2010 - 03:41
सुंदर लिहिलंयस!

नीधप 12/09/2010 - 08:26
सगळ्यांचे आभार.. प्रशांत, अचानक नाही काही. सध्या गंमत पळूनच गेलेली आहे... :)