Skip to main content

कॉमनवेल्थ गेम्स २०१०

लेखक नि३ यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
४ वर्षा अगोदर ,१८ व्या कॉमनवेल्थ गेम्स च्या मेलबॉर्न येथील क्लोजींग सेरेमनी मधे ज्या आत्मविश्वासाने ( बॉलीवुड नट/नटींचे नाच) भारताने पुर्ण जगाला भारतात( दिल्ली ) मधे यायचे आमंत्रण दीले त्यावेळेस वाटले होते की , नक्कीच आपण हे गेम्स योग्यरीतीने यशस्वी करुन पुर्ण जगात भारताचे नाव उंच करु. पण जसे जसे १९ व्या कॉमनवेल्थ गेम्स चे दीवस जवळ येत गेले तसा तसा त्याभवतीचा गुंता अधीकच वाढ्त गेला.

(पाल बोले सरडीला )

लेखक अडगळ यांनी बुधवार, 22/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पाल बोले सरडीला , जळले गं अंग, अंग अंग होळी झाले , शेपटीचा भंग. ओट्यावरी होते , दूध आणि पाव, माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव, झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग. तापुनिया दूध , साय वर येई, गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई, जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग. सोडुनिया शेपटाला , पाल मुक्त होई, नासकवणीसाठी , घरभर घाई , जळे काया कुठे , कोणी खाण्यामध्ये दंग.
काव्यरस

DINK चा नको डंका

लेखक वन्दना धर्माधिकारी यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
DINK चा नको डंका 'DINK' म्हणजे 'Double Income No Kid' मूल आले घरात तर थांबेल चिडाचिड होईल चिवचिवाट आणि खेळण्यांची भिड विचार कर असा जरा, हेका तुझा सोड.. DINK चा तुमच्या मारु नका डंका मोठयांच्या सांगण्यात काढू नका शंका आयुष्यभर पुरत नाहीत आईबाप लेका बहिणीला बरोबर हवा भाऊराया सख्खा. शिक्षित घरात दिसतो मुलांचा तुटवडा झोपडपट्टित मात्र आहे पोरांचा गराडा करतील चोर्यामार्या आणि घालतील दरोडा वेळ निघून गेल्यावर गिरवायचा कशाला धडा .?

सकारात्मक की नकारात्मक...

लेखक एक अनामी यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकांकडून आपल्याला सल्ला मिळतो... नेहमी सकारात्मक विचार करावा... पण एक प्रश्न पडलाय... जेव्हा बर्‍याचअंशी आपल्याला कदाचित नकारात्मकच पुढे घडणार, हे माहीत असतानाही सकारात्मक विचार कर असंच सांगतात... अर्थात ते योग्यही असतं... पण... "पुढे घडणार्‍या वाईट गोष्टीसाठी मनाची तयारी करणे (जेणेकरून पुढे कमी त्रास व्हावा यासाठी...) म्हणजे नकारात्मक विचार करणे...?" यावर मिपाकरांचं काय मतं...???

दिनांक २४ सप्टेंबर २०१०

लेखक बाबुराव यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा निर्णय दिनांक २४ सप्टेंबर २०१० ला लागणार हाय. बातमी दुवा महाराष्ट्र टाइम्स निकाल काय लागेल त्यो लागेल. पण दोन समाजामधील द्वेष आन् राजकारण्यांना एक आयतं कोलीत मिळणार हाय. पब्लीक रस्त्यावर यायचं भेव वाटून राह्यलं. ”आपल्याला विश्वासात घेतले गेले नसल्याचा दावा अलाहाबाद हायकोर्टाच्या एका न्यायाधीशाने केला आहे”’ च्यामारी, या स्टेटमेंटमुळं इषय अजून सेन्सेटीव्ह झाला. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा निर्णय कोर्टाबाहेर व्हावा ही गोष्टबी खरीच व्हती.

मेदूवडा व चट्णी.

लेखक निवेदिता-ताई यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
http://img1.orkut.com/images/milieu/1283586494/1284180469373/546100837/… मेदूवडा व चट्णी.------------ साहित्य:- दोन वाट्या उडीद डाळ, पाव वाटी चना डाळ, तीन हिरव्या मिरच्या, मिठ थोडेसेच. मेदुवडा साचा.तेल.जिरे एक छोटा चमचा. कॄती:-डाळी दोन-तीन तास भिजत घाला, नंतर मिक्सरमधुन बारीक वाटुन घ्या, मिरचीचे बारीक तुकडे त्यात घाला,मिठ घाला, चमचाभर जिरे घाला मिश्रण जास्त घट्ट नक्को, साच्यात घाला , गरम तेलात साच्याने वडॆ पाडा, तांबूस रंगावर तळा. चटणीसाठी -एक व

दोघे-२

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आता किती वेळ थांबायचेय? भुक लागली आहे का? तसेच काही नाही. पण उगाच खोळंबा कशाला. सवय. सर्व डॉक्युमेंटस क्लियर असुन सुद्धा २ महीने रखडवायचो मी पार्टीला. ओके. आता सुद्धा २ महीने? नाय नाय फार तर अर्धा तास. इतर जण पण वाट बघताहेत. ते गेले ढगात. तशी क्वालीटी काही चांगली वाटत नाही. आता इथे हीच क्वालीटी. तु बासमती वाला वाट्टे? नाही रे. कोलम, नाही तर आंबे मोहर. बाकी तुझी केस सुटली का? नाही रे. डेटा करप्ट झाल्यामुळे १५ दिवस उशीर होणार आहे. मधे संप असल्यामुळे थोडासा बॅकलॉग आहे असे मंडळी म्हणताहेत. तुझे काय? ऑडिट मधे अडकलोय. हायर अथॉरीटी कडे आहे फाईल.