मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

DINK चा नको डंका

वन्दना धर्माधिकारी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
DINK चा नको डंका 'DINK' म्हणजे 'Double Income No Kid' मूल आले घरात तर थांबेल चिडाचिड होईल चिवचिवाट आणि खेळण्यांची भिड विचार कर असा जरा, हेका तुझा सोड.. DINK चा तुमच्या मारु नका डंका मोठयांच्या सांगण्यात काढू नका शंका आयुष्यभर पुरत नाहीत आईबाप लेका बहिणीला बरोबर हवा भाऊराया सख्खा. शिक्षित घरात दिसतो मुलांचा तुटवडा झोपडपट्टित मात्र आहे पोरांचा गराडा करतील चोर्यामार्या आणि घालतील दरोडा वेळ निघून गेल्यावर गिरवायचा कशाला धडा .? करिअरवाल्यांच्या संसारात नाही काही कमी मग कां नाही घुमू देत तिथे बोबडी बोबडी वाणी? वाण्याच्या तराजूनं पैका तुझा तोल काय करायचा पैका, जिथे नाहीत बोबडे बोल. या कवितेतून उमलो तुमच्यात वंशवेलीची ओढ गोडधोड करेल आई, त्याला नाही तोड मामा मावशी, आत्या काका नात्यांची जोड घडी घातलेल्या घराची होईल तोडफोड. तुम्हा दोघादोघांना मी देते शुभेच्छा, समाज निपजावा चांगला ही ही एक इच्छा अरे... अरे... रागावू नका मुलांनो, सांगते मी वंदना मावशी पोटी चाहूल लागता ती लाजेल बघ कशी

वाचने 1537 वाचनखूण प्रतिक्रिया 8

प्रियाली 22/09/2010 - 01:19
डिंक दांपत्याच्या येथील कारणांवर वरील कविता चपखल आहे. ;) * वेगळ्या शब्दांत दोन्हीकडील कारणे सारखीच भंपक आहेत.*

In reply to by प्रियाली

धनंजय 22/09/2010 - 01:34
लोक काही-ना-काही कारणे सांगतात. ती कारणे वस्तुनिष्ठ नसून स्वतःचे समर्थन करणारी असतात, हेसुद्धा खरे असू शकेल. मात्र हे प्रश्न विचारायची किंवा त्यांच्याबद्दल कारणे देण्यास उद्युक्त व्हायची परिस्थिती समाजात आहे. हे निरीक्षण मात्र वस्तुनिष्ठ आहे!

In reply to by धनंजय

प्रियाली 22/09/2010 - 04:00
लोक काही-ना-काही कारणे सांगतात. ती कारणे वस्तुनिष्ठ नसून स्वतःचे समर्थन करणारी असतात, हेसुद्धा खरे असू शकेल. मात्र हे प्रश्न विचारायची किंवा त्यांच्याबद्दल कारणे देण्यास उद्युक्त व्हायची परिस्थिती समाजात आहे. हे निरीक्षण मात्र वस्तुनिष्ठ आहे!
सहमत आहे.

शिल्पा ब 22/09/2010 - 06:35
तुम्ही होणार्या मुलांना जबाबदार असतात...तुम्हाला स्वतःचा असा फारसा वेळ मिळत नाही.. जर मानसिक तयारी असेल तरच मुले होऊ द्यावीत..अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न...माझ्या ओळखीत दोन गोरे दाम्पत्य आहेत..एकाला मुले होऊच द्यायची नाहीत...अन एकाने वय उलटून चालल्यावर चार पाच वर्ष बरेच प्रयत्न केले पण मुल झाले नाही म्हणून शेवटी कोरियात जाऊन दत्तक मुल घेतले...आपल्या निर्णयावर ठाम असले कि झाले..पण बरेचदा मत बदलतं देखील...अन या बाबतीत वय हा घटक बरेचदा महत्त्वाचा ठरतो.

अडगळ 22/09/2010 - 08:18
शिक्षित घरात दिसतो मुलांचा तुटवडा झोपडपट्टित मात्र आहे पोरांचा गराडा करतील चोर्यामार्या आणि घालतील दरोडा वेळ निघून गेल्यावर गिरवायचा कशाला धडा .>>> या ओळी वाचून गहिवरुन आलं.
करिअरवाल्यांच्या संसारात नाही काही कमी मग कां नाही घुमू देत तिथे बोबडी बोबडी वाणी? वाण्याच्या तराजूनं पैका तुझा तोल काय करायचा पैका, जिथे नाहीत बोबडे बोल. कविता आवडली...