Skip to main content

(शापीत मेघ ) ...

लेखक गणेशा
बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आदिती आणि अडगळ यांच्या प्रेरणेने. सारे बोबाट शब्द, फेकीत चाललो मी सोडुन सार्या वाटा, का पीत चाललो मी ? रिचवुनी अनेक प्याले, रातीचे ओसाड नाले अडखळीत का असेना, धुंदित चाललो मी रात्रीत विरले दु:ख, सरलेली सारी स्वप्न झुगारुन लक्ख नभास , ऐटीत चाललो मी झाले आप्त ही परके, रक्तबंध विस्कटलेले नजरेच्या तप्त ज्वाला, सोशीत चाललो मी डागाळलेला चंद्र उरी, नभास का खंत आहे आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी
काव्यरस

गुजरातच्या निवडणूकांतून जनतेचा कौल

लेखक विकास
बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कालच (ऑक्टोबर १२) ला गुजरात मधील अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत, भावनगर, आणि जामनगर येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ५५५ जागांपैकी दोन तृतियांश जागा ह्या "मोदीं"च्या भाजपाला मिळाल्या. "मोदीं"च्या म्हणण्याचे कारण असे की भाजपात अंतर्गत भांडणे (मोदींविरुद्ध देखील) चालू होती, माध्यमे आणि काही स्वयंघोषित सेक्यूलर संस्था / व्यक्ती यांनी मोदींच्या विरुद्ध सततच आगपखड केली आहे, त्यांच्या विरुद्ध मला वाटते दंगलींसंदर्भात (व्यक्तीगतपण) खटले चालू आहेत.

विस्मरणात गेलेले पदार्थ--------- १)डांगर...............

बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे. स्पून जिरे. दही एक वाटी, फोडणीचे साहित्य. थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, एक कांदा.लाल तिखट, मिठ. कॄती:- एक वाटी हरबरा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, पाव वाटी धने, दोन टे.

(शापीत मेघ)

लेखक अडगळ
बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आमचीही प्रेरणा http://www.misalpav.com/node/14884 पाकिट , पर्स , चेना ढापीत चाललो मी, लवते न तोच पाते, कापीत चाललो मी, वाणी विमा विजेची , सारी बिले मिळाली, हिरवा वसंत कोठे? शोधीत चाललो मी. पाकीट का म्हणावे , "हैदोस" भावनांचा, पत्रे पुराणी पिवळी , वाचीत चाललो मी, बघतो अनंत कप्पे , ना नोट , नाही नाणे, घाला चुलीत ह्याला, काशीत चाललो मी, पेठांत या पुण्याच्या ना राहिली खुमारी, औंधात हात मारु, घोकीत चाललो मी.
काव्यरस

झाडांच्या पानात

लेखक गणेशा
बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गीत ऐकण्यासाठी खालील लिंक ओपन करावी, आणि उजव्या प्लेयर मधील पहिले गाणे लावावे. www.jayshreeganesha.blogspot.com गाण्याचे/कवितेचे नाव : झाडांच्या पानात शब्द : गणेशा. गायिका: स्वप्नजा लेले. संगितकार: सत्यजीत केळकर. अल्बमः ये ना तू सख्या ... ---- नोट: नविन असल्या कारणाने गीत कसे अपलोड करतात ते माहीत नाही , शमस्व , एकदा पहिले गाणे ऐकुन बघा, निश्चित मजा आल्या शिवाय राहणार नाही अशी वेडी आशा आहे. आणि मागील 'शापित मेघ' मध्ये गेयता नसल्याच्या रिप्लाया मुळे .. आधीच पोस्ट केलेली ही एकुलती गीत असलेली माझी कविता पुन्हा देत आहे. होप आवडेल
काव्यरस

घ्या....मेतकूट! रेसिपी सौजन्य : जाईची आई :)

बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १) चणा डाळ - ४ वाट्या २) बासमती तांदुळ - १ वाटी ३) उडिद डाळ - १ १/२ वाटी ( दीड वाटी) ४) मूग डाळ - १ वाटी ५) १/२ वाटी गहु ६) पाव वाटी धणे ७) पाव वाटी जिरे ८) हिंग २५ ग्रॅम ९) मिरे - ७-८ १०) लवंग - २० ग्रॅम ११) दालचीनी - २० ग्रॅम १२) वेलची - २० ग्रॅम १३) मेथी दाणे - १/२ चमचा १४) मोहरी * - २० ग्रॅम १५)मसाला वेलची / बडी इलायची - २ १६) १ जायफळ १७) लाल मिरच्या ४-५ १८) हळद १ ते १ १/२ चमचा (दीड) झाल्या का १८ वस्तू?.... इति मातोश्री कृती : १) सगळी धान्ये वेगवेगळी भाजुन घ्यावीत. खमंगपणावर भाजुन घ्यावीत. भाजताना त्याचा कच्चट रंग जाईपर्यंत भाजावीत्.आणि छान खमंग वास सुटायला हवा.

रजनीकांतचा हिट 'रोबो'. (एक दुर्धर मानसिक रोगाची उपजत).

बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
रजनीकांत बद्दल जास्त काय माहित नाही. त्याचे थोडेफार सिनेमे बघितलेले आहेत. १८० कोटी ओतून त्याचा (न बघितलेला) रोबो दणदणीत चाललेला आहे. त्याचा कोणताही सिनेमा येउंद्या, तो इतकाच किंबहुना ह्याही पेक्षा जोरदार चालणार ह्याची खात्री कोणीही देईल. नुकताच त्याचा दुग्ध अभिषेक बघितला नेटवर. कोणी विचार केला आहे, का चालतात त्याचे इतके सिनेमे ? का इतका प्रसिद्ध आहे तो सामान्यांमध्ये ? त्याची जोरदार, अशक्य कोटीतली मारामारी, त्याची सुपरमॅन पॉवर ? तो दिसायला खूप सुंदर आहे ? तो चांगला खूप डान्स करतो ? तो खूप चांगला अभिनय करतो ? छे......... मला नाही वाटत असे...

"डान्राव" व काही "मुक्ताफळे"........

बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच डान्रावांचा "रजनीकांत" व काही "मुक्ताफळे"...... हा लेख वाचायला मिळाला. मग मी व माझ्या एका विक्षिप्त मैत्रिणीने डान्रावांविषयीचीच मुक्ताफळं लिहायचं ठरवलं. अदिती आणि मी दोघांनी कोलॅबोरेशन करून लिहिलेली असली तरी खालील यादी अपूर्ण आहे.

१०/१०/१०

बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
१०/१०/१० हा जगाच्या द्रुश्टिने आगळा वेगळा दिवस होताच तसेच माझ्याही साठी होता. ह्या दिवशीही दर्-वर्शाप्रमाणेच मला १८ वे लागले ;). आदल्या दिवशी आई मुंबईला परत गेली. ति होती तेव्हा मला आराम होता. नेमके नवर्याला अशी साइट दिलि गेलि की त्याला टिफिन द्यावा लागु लागला. आई होती तेव्हा काहिच प्र्श्न नव्हता, आई सकाळी उठुन स्वयंपाक करीत असे. १०/१०/१० ह्या दिवसापासुन लवकर उठण्याचा सकंल्प करायचा असे आधीपासुन माझ्या मनात होतेच. आईला मुंबईला जाण्यासाठी लाल ड्ब्यात बसवुन आले व सकाळी ५ चा गजर लावला. आणी खरच उठले की!!!