रजनीकांत बद्दल जास्त काय माहित नाही. त्याचे थोडेफार सिनेमे बघितलेले आहेत. १८० कोटी ओतून त्याचा (न बघितलेला) रोबो दणदणीत चाललेला आहे. त्याचा कोणताही सिनेमा येउंद्या, तो इतकाच किंबहुना ह्याही पेक्षा जोरदार चालणार ह्याची खात्री कोणीही देईल. नुकताच त्याचा दुग्ध अभिषेक बघितला नेटवर.
कोणी विचार केला आहे, का चालतात त्याचे इतके सिनेमे ? का इतका प्रसिद्ध आहे तो सामान्यांमध्ये ?
त्याची जोरदार, अशक्य कोटीतली मारामारी, त्याची सुपरमॅन पॉवर ?
तो दिसायला खूप सुंदर आहे ?
तो चांगला खूप डान्स करतो ?
तो खूप चांगला अभिनय करतो ?
छे.........
मला नाही वाटत असे... (वरील सगळे गुण कितीतरी नायकांच्या अंगी आहेत पण ते का नाहीत मग रजनीकांत इतके प्रसिद्ध ?) तर रजनिकांतच का इतका प्रसिद्ध आहे ?
त्याला एक टाचणी टोचा, बघा रक्त येते का नाही ते आणि तो सुद्धा बघा कसा कुई कुई करेल.
तो प्रसिद्ध आहे, कारण त्याची प्रतिमा एका भयानक मानसिक रोगाची उपजत आहे.
तो रोग साधासुधा नाही. तो रोग जडलेला आहे सगळ्या जनतेला. एक अतिप्राचीन रोग आहे तो.
त्या रोगाचे नाव आहे. "मी दुबळा". "I AM HELPLESS". आजकाल सर्व जनतेला ह्या रोगाने भेडसावले आहे. तर बघूया ह्या रोगाची लक्षणे.
रोगट व्यक्तीला
१) आपण दुबळे वाटायला लागतो,
२) दुसरा कोणतरी येऊन आपले सगळे दुख: एक क्षणात काहीसे जादू मंतर करून समाप्त करेल.
३) कोणती तरी super power ची मनधरणी केल्या शिवाय त्याच्या मनाला चैन पडत नाही.
४) कोणत्याही समस्येला 'हा जिवंत झाला पाहिजे', 'तो जिवंत झाला पाहिजे' असे वाटून त्या समस्येस प्रभावीपणे तोंड देण्याचे रोगट व्यक्ती नाकारते.
५) आपल्या आजूबाजूच्या सर्व वाईट प्रवृत्तींना नष्ट करण्याची एक सुप्त इच्छा केवळ सिनेमात जाऊन पूर्ण करतात.
६) आणि जो हि इच्छा पूर्ण करु शकतो त्याला डोक्यावर घेउन बेभान होतात.
अशी काही रोगट माणसे आणि त्यांचे रोग नेहमीच आजूबाजूला दिसून येतात.
त्यामुळे काही मुन्नाभाईन्ना गांधीबाबा इकडे तिकडे दिसतात तर काही 'राजे परत आले पाहिजे' असा घोषा लावत मोर्चे काढतात, तर काही कल्की लवकर यावा म्हणून त्याची पूजाअर्चा करतात. काहीजण रोज विघ्नहर्त्याची देवपूजा करून सर्वआपापली विघ्ने हटवून स्वताला सुखी ठेवण्यासाठी साकडे घालतात. कायम दुसर्यावर अवलंबून राहतात. त्यांचे मन अपंग होते.
मी म्हणतो,
नकोत मला शिवाजी / कल्की / रोबो / कि अजून कोणी जिवंत व्ह्यायला,
मीच होईल भक्कम, मीच करीन माझ्या जीवनातील सैतानाचा नाश. मीच आहे विष्णू, मीच रोबो आहे. रावणाचा नाश करणारा राम मीच, आणि मीच होईल शिवाजी. कोणी मावळे आले तर ठीक नाहीतर मीच लढा देईल एकटा. सर्व थोरामोठ्यांचा आदर्श ठेऊन त्या स्वर्गातल्या रामालासुद्धा हेवा वाटला पाहिजे असे राज्य मीच स्थापन करील. अशी शपथ का कोण घेत नाही ?
बाजी प्रभू ज्या हिमतीने खिंडीत लढला त्याच्या किती पट हिम्मत लागते आज सगळ्या भ्रष्ट नेत्याशी लढा द्यायला ? कोणाच्या तरी नावाने जयघोष करायचा आणि आपल्या रोगी मनावर तात्पुरती मलम पट्टी करून झोपी जायचे. असं किती युगे चालणार ?
निसर्गाने मला जीवन दिले आहे, त्याचीसुद्धा काहीतरी अपेक्षा असेल ना माझ्याकडून.
.....
.....
.....
--------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील सर्व विचार कोणत्याही धर्माला / व्यक्तीला उद्देशून नाहीत. आढळून येत असेल तर मोठ्या मनाने माफ करा. जाऊदे जरा जास्त झालं. भूक लागलीये. जेऊन येतो, ते सन्सेक्स बघतो कुठपर्यंत आलाय ?
वाचने
3254
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>>ते सन्सेक्स बघतो
लेख ठीक ठीक वाटला. आपले विचार
>>सगळ्यांच्यात समाजातल्या
In reply to लेख ठीक ठीक वाटला. आपले विचार by llपुण्याचे पेशवेll
मस्त. आता बॉबी डार्लिंगवर पण
+१ सहमत
मानसिक रोग वैगेरे नाही पण
'रोबो' थेट्रात जाऊन पहाणारे
रजनीकान्त च म्हणाल तर तामीळ
मला माणसांच्या व्यक्तिपूजेच्या वृत्ती बद्दल भाष्य करायचे होते.
In reply to रजनीकान्त च म्हणाल तर तामीळ by सन्दीप
राजांची तुलना गांधीबाबा बरोबर
In reply to मला माणसांच्या व्यक्तिपूजेच्या वृत्ती बद्दल भाष्य करायचे होते. by गांधीवादी
confused!!!!! सर्वांचे विचार
रजनीकांत बाबतचा एक किस्सा
अस्सल मराठीतून
In reply to रजनीकांत बाबतचा एक किस्सा by आप्पा