Skip to main content

मिपाकरांना दिवाळीची भेट काय मिळणार?

लेखक अवलिया
बुधवार, 13/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1286
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

अध्यात्म, धर्म हे बकवास असल्याने ग्यानबा तुकारामाचे फटु काढुन टाकणार
असे असेल तर मिपाचा संस्थापक या नात्यानेही मिपाशी निगडीत राहायला मला आवडणार नाही.. माझ्या मते तो फोटो हीच खरी मिपाची शोभा आहे. त्याच भावनेने मिपा स्थापन करताना तो मी तेथे लावला होता.. धर्म, अध्यात्म याबद्दल मी फारसं काही भाष्य मी करू शकणार नाही परंतु जिथे या गोष्टी संपतात तिथे ग्यानबा-तुकोबा सुरू होतात इतकंच मला माहीत आहे.. बाकी चालू द्या..! तात्या. -- शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!

In reply to by विसोबा खेचर

तात्या वाईट वाटून घेऊ नका पण आपण घर दुसर्‍याला दिले की त्याने घराला कोणता रंग वापरावा हे आपण ठरवू शकत नाही.

In reply to by विजुभाऊ

विजूभाऊ, आपण माझा प्रतिसाद कृपया नीट वाचावा.. मी "असे असेल तर मिपाचा संस्थापक या नात्यानेही मिपाशी निगडीत राहायला मला आवडणार नाही.." इतकंच म्हटलं आहे. कुणी काय करावं अथवा करू नये हे मी ठरवलेलं वा सुचवलेलं नाही..! तात्या. -- शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!

In reply to by परिकथेतील राजकुमार

आम्हाला फक्त जागेचा (आणि मतांचा) रेट माहित आहे, अजुन कोणकोणते रेट असतात बुवा ?

In reply to by गांधीवादी

निगडीपेक्षा पिंपरीचा रेट कमी कसा असेल? निगडी पुढे आहे की. अहो आकुर्डीतच भयानक रेट झालेत जागेचे आता. मला वाटते की संन्यास घ्यावा अन भोसरी पिंपरी चिंचवड आकुर्डी निगडी करणे सोडून दुर्गाटेकडीवर मस्त मठ बांधावा.

In reply to by मिसळभोक्ता

मिभोकाका, चुका वाढल्या, "कोलिती" घसरली, हे काय सुरू आहे तुमचं? तुमच्या तब्येतीला आराम पडो अशी डान्रावांच्या चरणी प्रार्थना!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

निगडी - कोलिती .. तरी बरे .. काने मात्रे सांभाळुन लिहिलेय .. चुकुन वेलांटीचा काना झाला असता तर पुणेकरांच्या अस्मितेवर घाला घातला गेला असता !! अजुन एक महायुद्ध टळले ;)

In reply to by अवलिया

>>मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर असावा या मागणीला मागेच फाट्यावर मारले गेले आहे. असो. तरीही मिसळपावाचा फटु मुखपृष्टावर असावा हा हट्ट सोडायचा नाय. जमल तिथ आनी फट आसल तस रेटत रहायच.

In reply to by विकास

तुमी काड्यावाले त नाय ना भाउ? :-o

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण विकासशेठ संपादक आहेत आणि ते धोतर नेसतात ह्याला पुरावा काय ? आता शेवटी त्यांच्या नावातच सगळे आहे हा भाग वेगळा ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण विकासशेठ संपादक आहेत आणि ते धोतर नेसतात ह्याला पुरावा काय ?
एक काम करा, तुम्हीपण त्यांच्या धोत्राला (किंवा प्यांटीला इ .इ.) हात घाला आणि मग तेच पुरावा देतील तुम्हाला ते संपादक असण्याचा! फक्त नंतर "आयडी का उडाला" आणि "२% ट्यार्पी परामुळे होता" टाईपचे ब्लॉगपोस्ट लिहू नका म्हणजे मिळवलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही आमच्या वाईटावर टपलेल्या आहात हे दरवेळी सिद्ध केलेच पाहिजे का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण विकासशेठ संपादक आहेत आणि ते धोतर नेसतात ह्याला पुरावा काय ? हा पुरावा दिवाळीची भेट म्हणून मिळणार नाही याची खात्री (निश्चिंती) असावी. :-)

In reply to by विकास

हा पुरावा दिवाळीची भेट म्हणून मिळणार नाही याची खात्री (निश्चिंती) असावी.
ती खात्री आहे म्हणुन तर आमची फडफड चालु आहे ;) आता जटायु झाला नाही म्हणजे मिळवले =))

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>डायरेक संपादकांच्याच धोतराला हात ... ऑ बॉ बॉ बॉ ते धोतर नेसतात हे मला माहित न्हवत.. :-) जिंदगीके साथ दखल अंदाजी नही करनेका...जो होता है हो देनेका... इति: नाना

In reply to by नावातकायआहे

जिंदगीके साथ दखल अंदाजी नही करनेका...जो होता है हो देनेका... इति: नाना
'नावात काय आहे ?' हे जरी खरे असले तरी वरचे वाक्य हे नानाचे नसुन किरण पुरंदरेचे उर्फ झमिर जाफर ह्याचा आहे.

In reply to by अवलिया

घंटा !! आय मीन ईतर सोडुन सर्व पर्यायांकरता नकारघंटा वाजवित आहोत ...

In reply to by अवलिया

का? त्यात काय अश्लील आहे ? कुठे चर्चा झाली असल्यास किंवा संपादकांनी काही सांगितले असल्यास त्याचा दुवा देता का?

काहिहि मिळणार नाहि! आली दिवाळी लागले काहितरी मागायला.. गेल्याजन्मी/याजन्मी पोष्टात होतात का हो? ;)

जाहीरात विभाग सुरू होणार असं ऐकून आहे ;)

पहिले चार पर्याय असे धाग्यामध्ये देता येणार नाहीत हे संपादकमंडळाकडून वेळोवेळी स्पष्ट झालं होतं तरी आपण दिले आहेत आणि त्याला अजून पंख लागले नाहीत. उगीच ओरडा होतो नंतर. मी इतर या पर्यायास मत दिले आहे.

In reply to by रेवती

>>>पहिले चार पर्याय असे धाग्यामध्ये देता येणार नाहीत हे संपादकमंडळाकडून वेळोवेळी स्पष्ट झालं होतं तरी आपण दिले आहेत सहमत आहे. संपादकमंडळानी असे काहीही मिळणार नाही म्हणजे नाहीच असे अनेकवेळेला अगदी निक्षुन सांगितलेले मला माहित आहे. आणि म्हणूनच असे पर्याय हवे आहेत किंवा द्या किंवा देणार काय असे संपादकमंडळ किंवा मालक यांना अजिबात न विचारता फक्त मिपाकरांना "भेट" म्हणुन अशा गोष्टी मिळतील काय असे "मिपाकरांना वाटते का?" असे विचारणा करणारा हा कौल आहे. त्यामधे या पर्यांयाचा समावेश केला आहे. यात कुठेही संपादक मंडळाला विनंती किंवा इच्छा प्रदर्शन नसुन केवळ आणि केवळ मिपाकरांना तुम्हाला भेट म्हणुन काय मिळेल असे वाटते हे विचारले आहे. ह्यात मिपाकरांना जे हवे आहे ते देण्याचे संपादक मंडळावर अजिबात बंधन कारक नाही. हे अगदी तसेच आहे जसे सामान्य भारतीयांना सरकारने असे करावे तसे करावे असे वाटते पण सरकार तसे काहिही करत नाही त्याचप्रमाणे आहे. :) >>>आणि त्याला अजून पंख लागले नाहीत. उगीच ओरडा होतो नंतर. ह्यावर प्रतिक्रिया राखीव.

मुखपृष्ठावर आकाशकंदिलाचा फटू लागणार...

छ्या, पुर्वी कसं अधुन मधुन चपला भेट मिळायचा, अधुन मधुन चांदण्या मिळायच्या. नानबाला आठवण येत असेल जुन्या दिवसांची. (१९४० च्या मराठी शिन्मातली एक काकु अ‍ॅक्ट्रेस म्हणतेय असं पिच्चर आना डोळ्यासमोर) नाना, काय हो आठवते आहे तुम्हाला, चांदण्या आठवताहेत, की त्या सुंदर कुचकुचणार्‍या कोल्हापुरी हो नाना??