Skip to main content

चार्वाक - एक न-दर्शन

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
चार्वाक या दर्शनाला थोडंसं झुकतं माप देण्याचा एक ट्रेंड दिसतो. या दर्शनाला बंडखोर दर्शन मानले जाते. भाकडकथांवर विश्वास न ठेवणारे, परलोक न मानणारे, केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानणारे, शब्दप्रामाण्यावर विश्वास न ठेवणारे असे हे दर्शन आधुनिक वैज्ञानिक विचारधारेशी मिळतेजुळते आहे असे अनेकांना प्रथमदर्शनी वाटते. (भोंदू) वैदिक विचारांवर आघात (!) करणारे दर्शन म्हणून ब्राह्मणेतर (ब्राह्मणविरोधी) मंडळींमध्ये या दर्शनाविषयी प्रेम दिसते. जातीपातींचा विचार सोडून दिल्यासही एकूणच सुशिक्षित वर्गामध्ये अंधश्रद्धेच्या ठाम विरोधात असलेल्या या दर्शनाविषयी सॉफ्ट कॉर्नर असतो.
लेखनप्रकार

याद्या 5860

मिक्स फ्रुट रायते

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्यः केळी, सफरचन्द, डाळिम्बाचे दाणे, गोड दही, मीठ, साखर क्रुती: प्रथम केळी आणि सफरचन्दाच्या लहान, लहान फोडी करुन एका बाउल मधे घेणे. त्यात डाळिम्बाचे दाणे घालणे. त्यानन्तर थोडे दही एका बाउल मधे घेउन फेटून घेणे. मग हे फेटलेले दही आणि चवीपुरती मिठ व साखर आधि चिरुन घेतलेल्या फळान्च्या फोडीन्मधे मिक्स करावे. सोपे, चवदार आणि सुन्दर दिसणारे रायते तयार.

याद्या 3111

सहभागप्रेरक एसेमेसचा आणि कॉल्सचा जमाना

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
"और आज का हमारा घर बैठे लखपती बनानेवाला सवाल हैं - बासमती और परिमल यह किस खाद्यप्रकार की किस्में हैं? आपका उत्तर आप एसेमेस द्वारा इस नंबर पर भेज सकते हैं.....या फिर इस नंबर पर कॉल कर सकते हैं.... महानायकाने हा प्रश्न विचारल्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरु झाले. अमिताभसारख्या अभिनयसम्राटाला टेलिशॉपिंगमधल्या पोपटपंची करणार्‍या दुय्यम अभिनेत्यांसारखी (आलोकनाथ, भाग्यश्री, श्वेता तिवारी, सुधीर पांडे, सुधीर दळवी इत्यादी मंडळी असल्या जाहिराती करतांना दिसतात) ही पोपटपंची करतांना बघून एसेमेसमधून आणि फोन कॉल्समधून मिळणार्‍या कोट्यवधींच्या कमाईचा अंदाज बांधता येतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3036

काढला संग्रह कवितांचा -

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
(चाल: ’ कानडा राजा पंढरीचा ’) कोणालाही नाही कळला, खर्च फार याचा काढला संग्रह कवितांचा ।१। मेजावर तो विक्रीस सत्वर कसा पकडला असा ढीग वर कुपन ठेविले खास प्रतींवर खप ना चार प्रतींचा ।२। परमभाग्य हे नात्यांसाठी उभे ठाकले फुकटे पाठी उभा राहिला जमाव सावध जणु की शोकसभेचा ।३। हा गझलेचा शेर वाचतो तो चारोळ्यासवे हायकुतो‌ अभंगोविचा हा रसिकात्मा वाली ना कवितांचा ।४। --------------- (टीप: हायकुतो=हायकू लिहितो, अभंगोविचा=अभंग नि ओवीचा)
लेखनविषय:

याद्या 1441

(एक प्रश्न)

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आज लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट यांची पुण्यतिथी. डंबलडोरवधाबद्दल व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली. डंबलडोर हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद डंबलडोरवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात. (आणि क्रुशिअ‍ॅटस कर्स ऐवजी स्टुपिफाय, किंवा एक्स्पेलिआर्मस वापरतात.) अवारा-केडावरा म्हणजे हत्या हे समजत असतानाही लॉर्ड व्हॉल्डेमार्ट यांची हत्या करण्यात आली?

याद्या 4538

या दिवाळी व सहलीचे फोटो.

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार, या वर्षीचे दिवाळि व गोवा मालवण सहलीचे फोटो तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पाहु शकाल. काही मोजके फोटो व प्रवास वर्णन २-३ दिवसांत इथे टाकेन. http://www.facebook.com/album.php?aid=28678&id=100000898189618 हर्षद
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2489

महाराष्ट्र दर्शन - अंबाजोगाई /भाग १

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
कल्याण स्टेशनातून "देवगिरी एक्स्प्रेस" सुटली, आणि आपण निदान एक आठवडा तरी मुंबईच्या मगरमिठीतून सुटलो , या भावनेने " हुश्श " केले...... कामाची आणि बाकीची सगळी " टेन्शन" सोडून फक्त धमाल करायची असं ठरवलंच होतं. गाडी सकाळी बरोबर ५ ला औरंगाबाद ला पोहोचली अनपेक्षितपणे वादळी गडगडाटासह "वरुण राजा" स्वागताला आला होता. मराठवाड्याच्या उष्णतेने पोळून निघण्याच्या तयारीने आलेल्या आम्हाला हा सुखद धक्काच होता. कडाक्याची थंडी पडली होती .. (बहुतेक रात्रभर पाऊस पडलेला असणार.....) आम्ही कुडकुडत बाहेर पडलो. MTDC बुक केलेलं होतंच, पण त्याआधी नातेवाईकांकडे उतरलो.

याद्या 14135

भस्म्या

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
मधुकर घुसळे ह्यांचं एक सुंदर गाण मराठी चित्रपटात आहे. >>>डोक फ़िरलं या बयेच डोक फ़िरल या हाताला धरलया म्हणते लगीन ठरलय या ह्या चालीवर विडंबन (त्या गाण्याचे नव्हे!), समाजात माजलेल्या भस्म्या रोगावर विडंबन सादर करीत आहे. भ्रष्टाचाराला सगळेच नावे ठेवतात, अगदी तडस लागे पर्यंत चरत असतांना देखील.
लेखनविषय:

याद्या 1628
काव्यरस

पुढचे पाऊल

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
http://72.78.249.107/esakal/20101116/5396894299098665752.htm वरील बातमी बघा. मुस्लिम पुरुषाने मोबाईलवर तीन वेळा तलाक म्हटले तर इस्लामी कायद्याप्रमाणे तो तलाक ग्राह्य धरला जाईल. पत्नीची ऐकूच आले नाही वगैरे सबब चालणार नाही. इस्लाम हा नव्या तंत्रज्ञानापासून अलिप्त आहे असे समजणार्‍यांना ही एक जोरदार चपराक आहे. इस्लामही नव्या युगाच्या नव्या तंत्रांचा आपल्या धर्माच्या रुढींमधे समावेश करतो. किती किती छान! असे कळते की फेसबुकवर बायकोच्या वॉलवर तलाक तलाक तलाक असे लिहिल्यास ते ग्राह्य आहे का याविषयी मौलवी चर्चा करत आहेत.

याद्या 2247

हैयोंच्या अभ्यासपुर्ण लेखनानंतर

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण असा सामान्य वाचकांचा ग्रह होणे स्वाभाविक आहे.
तथापि, हैयो हैयैयो हे भारतीय व परदेशी भाषातज्ञ तर आहेतच शिवाय ७० पेक्षा जास्त प्राचीन ग्रंथम पासून ते फारसी, अरबी लिपींचे तज्ञ अभ्यासक आहेत.

याद्या 3184