Skip to main content

काढला संग्रह कवितांचा -

लेखक विदेश यांनी बुधवार, 17/11/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: ’ कानडा राजा पंढरीचा ’) कोणालाही नाही कळला, खर्च फार याचा काढला संग्रह कवितांचा ।१। मेजावर तो विक्रीस सत्वर कसा पकडला असा ढीग वर कुपन ठेविले खास प्रतींवर खप ना चार प्रतींचा ।२। परमभाग्य हे नात्यांसाठी उभे ठाकले फुकटे पाठी उभा राहिला जमाव सावध जणु की शोकसभेचा ।३। हा गझलेचा शेर वाचतो तो चारोळ्यासवे हायकुतो‌ अभंगोविचा हा रसिकात्मा वाली ना कवितांचा ।४। --------------- (टीप: हायकुतो=हायकू लिहितो, अभंगोविचा=अभंग नि ओवीचा)
लेखनविषय:

वाचने 1443
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

शेवटच्या कडव्यात जरा खेचाखेची झाली, पण तरीही स्तुत्य प्रयत्न. जारी रख्खो ! (कोणालाही नाही पडल.. असे जास्त सुस्पष्ट वाटते. खर्च कळत नाही, खर्च पडतो.)

In reply to by मिसळभोक्ता

+१ स्वगतः ( मिभोकाका ती पूर्वीची फॅक़्टर वगैरे लावून मार्क देण्याची पद्धत अजून का दिसत नाही असे वाटत राहते )!

छान झालंय. आणखी लिहीत रहा, विडंबन करत रहा! (वाचक)बेसनलाडू