Skip to main content

पोपटी पार्टी

Published on 23/11/2010 - 15:28 प्रकाशित मुखपृष्ठ
पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो. पोपटी करण्यासाठी लागणार्‍या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात.

याद्या 14668

४. पतंग आणि वावडी

Published on 23/11/2010 - 15:13 प्रकाशित मुखपृष्ठ
एकदा जानेवारी महिन्यात कोणा नातेवाईकांकडील कार्यक्रमानिमित्त पुण्याला जाण्याचा योग आला. 'ह्या म्हैनात काय बी मज्जा असनार न्हाय बग. मी नस्तो आल्लो तरीबी चाल्लं अस्तं.' एस् टी ने अर्धा रस्ता संपवल्यावर मला हा साक्षात्कार झालेला. 'अरे जानेवारीमधे पुण्याची मुलं पतंग उडवतात, काटाकाटी खेळतात.' आईने माहिती पुरवल्यावर मी चेकाळलो. 'हैच शबास. म्हंजी पतंगी उडवाया घावणार? काटाकाटी खेळायाबी? मंग तं मज्जाच मज्जा भो.' 'पण जास्त दंगा करायचा नाही पतंग खेळतांना. काय?' उत्तर द्यायच्या मनस्थितीत मी नव्हतोच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2567

या हृदयीचे त्या हृदयी!

Published on 23/11/2010 - 12:24 प्रकाशित मुखपृष्ठ
ही माझी तशी पहिलीच कथा. २००५ मधे लिहिलेली. मायबोलीच्या अर्काइव्हज मधे असेल अजूनही कदाचित. पण त्यानंतर थोडे बदल केलेत. -------------------------------------------------------------------------------------------------------- "केवढा फुललाय चेहरा! काय विशेष आज?" "आज खूप आनंद झालाय.. मस्त वाटतंय.." "काय झालं काय एवढं? नवर्यानं काही गिफ्ट आणलं वाटतं नवीन!!" "केलात पचका!! लावलीत वाट!!‘ "का? नाही आणलं काही त्यानं? मग काय झालंय? का काही विशेष? काही खावंसं वाटतंय का? मला सांग हो, इथे तुझी आई नाही आणि सासूही नाही पण मी करीन हो सगळं!!" "आक्का! स्लो डाउन! मला दिवस गेलेले नाहीत. थॅन्क गॉड!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1308

मदत

Published on 23/11/2010 - 12:17 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी, आज आपल्या मदतीची, मार्गदर्शनाची, आणि प्रोत्साहनाची मदत प्रकर्षाने जाणवतेय. त्याचसाठी हा पत्रप्रपंच! आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो. मी गेली ६.५ वर्षे तंत्रलेखन (टेक्निकल रायटिंग) या क्षेत्रात काम करत आहे. पुण्यातील एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी गेली ६.५ वर्षे या क्षेत्रात काम करत असून सध्या मी सीनियर काँटेंट लीड या पदावर कार्यरत आहे. त्या आधी मी जालन्यातील एका कंपनीमध्ये आणि पुण्यातील एका मॅन्युफक्चरिंग कंपनी मध्ये मेंटेनन्स इंजिनीयर म्हणून, नंतर एका छोट्या वितरण कंपनीमध्ये सेल्स इंजिनीयर म्हणून काम केलेले आहे. आतापर्यंत माझा एकूण अनुभव साधारण ९ वर्षे आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1835

पुरस्काराचा भुलभुलैया

Published on 23/11/2010 - 11:57 प्रकाशित मुखपृष्ठ
पुरस्काराचा भुलभुलैया “स्टार माझा” तर्फे, घेण्यात आलेल्या ब्लॉग माझा-३ स्पर्धेत मला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण माझेवर प्रेम व्यक्त करून अभिनंदन केलेत त्या बद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ॠणी आहे, त्याबद्दल आपले सर्वांचे खूपखूप आभार. भविष्यातही आपणाकडून असेच उदंड प्रेम मिळत राहील ही अपेक्षा. (संदर्भ :- http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669) शक्यतो कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. घेतलाच तर त्याचा निकाल कसाही लागो, नंबर येवो अथवा ना येवो, दोन्ही स्थितीमध्ये ना आनंद मानायचा ना दु:ख.

याद्या 1732

आजकाल..खरंतर..आणि आठ पैलू..

Published on 23/11/2010 - 11:40 प्रकाशित मुखपृष्ठ
ओल्या मोज्यांचा येतो तसा शब्दांचा वास येतो. लोक लिहितात. बोलतात. आपण वास घेतो. "आजकाल" या शब्दानं सुरुवात झाली की टीकेचा, निराशेचा, अपचनाचा, वार्धक्याचा, त्रिफळा चूर्णाचा वास सुरु. "आजकाल" हा एवढा शब्द ऐकून मनाची निराशा सुरु करून टाकावी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3319

स्वैर विचार: १ कलाकार, २ चित्रपट, १ नाव

Published on 23/11/2010 - 09:31 प्रकाशित मुखपृष्ठ
CBFC कडून दिलेल्या जाणार्‍या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली. असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही. त्यातील काही नावे म्हणजे: 'संतान' - कलाकार जितेंद्र. जुना चित्रपट आला होता १९७६ मध्ये. आणि त्यानंतर १९९३ मध्ये. पहिल्या चित्रपटात जितेंद्रनेच संतान साकार केला होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2170

गुंजग्रामीचे दिवस

Published on 23/11/2010 - 09:19 प्रकाशित मुखपृष्ठ
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

याद्या 14415

काहिच्या काहि शब्द प्रयोग करुन भाषा घाण करु नका.

Published on 23/11/2010 - 07:53 प्रकाशित मुखपृष्ठ
मि इथे मिसळ्पाव वर बघतो कि बरेच लोक " काहिच्या काहि " या सरळ शुध्ध शब्दा एवजि " कै च्या कै " हा शब्द फार आवडीने वापरत असतात. हे असे करण्याचे कारण काय ? रिकलायनर वर बसुन असलि भाषा वापरलि कि माति चा सुगन्ध अन्गि लागतो का ? पण त्याच्याकरता मराठिचि अशि मारु नका !! शक्य तिकडे शुध्ध भाषा वापरा. नाहितरि भाषेवर सगळ्य बाजुने आक्रमण सुरु आहेच. सम्पन्न होत आहे भाषा या आक्रमणाने ?? अरे आता साजरा होणे या सरळ शब्दा एवजि पण लोक हा सम्पन शब्द वापरु लागले आहेत.

याद्या 12386