जिन्नस
* पाच सहा वाट्या सोललेल्या डाळिंब्या
* ओले ताजे खवलेले खोबरे सहा-सात चमचे( पाऊण वाटी ) किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी
* सात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर
* दोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ व दोन चमचे साखर.
* दोन चमचे लाल तिखट. ( शक्यतो रंग येईल अश्या मिरचीचे असावे )
* सहा-सात अमसुले, सहा-सात चमचे फोडणीसाठी तेल.
मार्गदर्शन
दोन -तीन वाट्या कडवे वाल रात्री किंवा सकाळी भिजत घालावेत. १२ तासानंतर ( वाल व्यवस्थित भिजल्यावर ) उपसून पंचात किंवा फडक्यात( हवा थोडीशी तरी खेळती राहावी असे फडके घ्यावे ) बांधून वर दडपण ठेवून मोड येण्यास ठेवावेत.