मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १

भानस ·
जिन्नस * पाच सहा वाट्या सोललेल्या डाळिंब्या * ओले ताजे खवलेले खोबरे सहा-सात चमचे( पाऊण वाटी ) किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी * सात-आठ हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर * दोन चमचे जिरे, चवीनुसार मीठ व दोन चमचे साखर. * दोन चमचे लाल तिखट. ( शक्यतो रंग येईल अश्या मिरचीचे असावे ) * सहा-सात अमसुले, सहा-सात चमचे फोडणीसाठी तेल. मार्गदर्शन दोन -तीन वाट्या कडवे वाल रात्री किंवा सकाळी भिजत घालावेत. १२ तासानंतर ( वाल व्यवस्थित भिजल्यावर ) उपसून पंचात किंवा फडक्यात( हवा थोडीशी तरी खेळती राहावी असे फडके घ्यावे ) बांधून वर दडपण ठेवून मोड येण्यास ठेवावेत.

इकडची गोची

रन्गराव ·
भारताने आपला BPO मधला प्रथम क्रमांक गमावला आहे, ती जागा फिलीपीन्सने बळकावली आहे. http://www.rediff.com/business/slide-show/slide-show-1-philippines-beats-india-to-be-the-worlds-bpo-capital/20101208.htm स्वस्तात सेवा करून काय फायदा झालेला दिसत नाही. भारत "information Superpower" आहे असं फार वर्षांपासून एकून आहे. पण अल्गोरिदम ऑलम्पिक्स ह्या स्पर्धेतली आपली कामगिरी आपल्या दाव्याला शोभनारी नाही.

"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-परिचय-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १

सुधीर काळे ·
"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-"परिचय"-प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती-भाग १ मूळ लेखकः श्री पवनकुमार वर्मा अनुवादकः सुधीर काळे © मूळ लेखकाच्या वतीने: सुधीर काळे (या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत) "भारतीय असणे म्हणजे काय?" याबाबत एक नवे आणि आणि अगदी 'सोळा आणे' वेगळे संशोधन करणे हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे! असे संशोधन फक्त भारतासाठीच नव्हे तर सार्‍या जगाच्या बाबतीतही समर्पक आणि प्रसंगोचित आहे.

आई .. मिटलेला श्वास.. १२

गणेशा ·
लेखनविषय:
आई .. मिटलेला श्वास..११ नदीचा सुन्न किनारा पाणी वाहतेय जपून ओल्या हिरव्या तनांवर निळसर घाव थबकून चांदणे हरवलेली सुनी खिन्न गर्भरात प्रतिबिंबित गहिरा रंग मनावर काळसर रंगहीन स्वप्नांचा धुसर स्तब्ध प्रवाह दिशाहीन नेत्रनजर अन निशब्द आठवांचे काहूर - शब्दमेघ

१ विनोद

अश्फाक ·
लेखनविषय:
राहुल घरी आला तर पत्नीला रडतांना पाहिले आणि विचारले , काय झाले ? पत्नी :तुमच्या आइने माझी बेइज्जती केली आहे . पति :आइ असे कसे करु शकते ती तर ताइ कडे युरोप फिरायला गेलि आहे . पत्नी : आज तुमच्या आइ चा मेल आला होता तुमच्या मेल एड्रेस वर , त्यात शेवटी लिहले होते "सटवी वाचल्यानंतर माझ्या मुलालाही वाचायला सांग"

देशातली लोकसंख्या

रणजित चितळे ·
आपल्या देशातली लोकसंख्या काहीच वर्षात चायनाच्या पेक्षा जास्त होणार. आपल्या देशात एवढी लोकसंख्या का ह्या वर कोणी प्रकाश टाकू शकेल का. १. फॅमिली प्लॅनिंग उशीरा सुरु करणे किंवा नसणे - हे कारण वाढत्या लोकसंख्येला देता येणार नाही. कारण अमेरीकेत सुद्धा ३० मुले होती पुर्वीच्या काळी एका कुटुंबात अशा नोंदी आहेत. २. आपला देश मागासलेला असला कारणाने प्राथमिक वैद्यकीय उपचार न मिळाल्या मुळे होणारे मृत्युचे प्रमाण जास्त असुन देखील लोकसंख्या वाढत आहे. ३.

"इकडचे" आणि "तिकडचे"..

गवि ·
खूप पूर्वी मनात आलेलं आणि लिहिलेलं काही आज पुन्हा दिसलं आणि आणि त्यातले काही पॉईंट्स उचलून चर्चेला आणावेसे वाटले म्हणून.. खाली जे काही लिहिलंय ते आडपडदा न ठेवता किंवा मुद्दाम "न्यूट्रल" राहण्याचा कोणताही प्रयत्न न करता "ज्याचे अनेक (जवळ जवळ सर्वच) रोजच्या कट्ट्यावरचे मित्र परदेशात गेले आहेत आणि कायमचे राहिले आहेत" अशा भारतात "उरलेल्या" म्हणा किंवा "राहिलेल्या" म्हणा, माणसाच्या मनातून हे लिहिलं आहे : -------------------------- जो कोणी अमेरिकेला (किंवा यू.के. वगैरेला) जातो..

६: पाउलखुणा

गणेशा ·
लेखनविषय:
५ : मी ..एक स्त्री प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत.. सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा आणि मागोवा कशाचा ?.. कश्यासाठी ... ? बहुदा तो आहे एक अखंड प्रवास एका प्रश्नमालिकेतून, दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्याचा माझ्यासारखीच गुरफ़टलेली ही रात्र आहे .. उद्यास्ताच्या रंगात न्हाऊनही काळवंडली आहे बिच्चारी माझे काय आहे मग त्यापुढे ?.. माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर माझ अस्तित्वच संपत चाललय .. पण तरिही या रात्रीच्या सोबतीनेच मी जगते आहे..

सायलेंट रायफल ड्रील

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
यात वापरलेल्या रायफल्स ३०३ आहेत. या टीमला या स्पर्धेचे पहीले बक्षीस मिळाले.