मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हळूच द्या मज झोका कान्हा

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
हळूच द्या मज झोका कान्हा
हळूच द्या मज झोका कान्हा चित्त नाही माझे थारा हळूच द्या मज झोका कान्हा ||धृ|| मन विचलीत झाले वासनांनी भरले घुसळोनी लोणी काढूनी घेती तयाप्रमाणे वासना काढाना ||१|| संसारी राहून पाही जगजेठी पापपुण्या लावी गाठी कितीक करावी तुमची आरती जन्ममरणाचा पाळणा हलवा ना ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०

एक आठवण

संजयशिवाजीरावगडगे ·
लेखनविषय:
काव्यरस
एक आठवण तुझी येता कातरवेळी . काहुर जागवणारी मनातलं अवेळी. साजंकाळी येता तुझी एक आठवण . मन सुन्न होऊन जळणारी आठवण. मनातल्या मनातं रडणारी एक आठवण. मनातल्या मनात अस्वस्थ होणारी आठवण. जीव भेदून जाते आठवण तुझी जीवघेणी, देते मज असंख्य वेदना मनी. अशी तुझी ती एक आठवण !! @ संजय गडगे

मटार पॅटीस

जागु ·
भाजीचे साहित्य मटार दाणे अर्धा किलो कांदे २ छोटे चिरुन आल लसुण पेस्ट टोमॅटो १ बारीक चिरुन राई, जिर, हिंग, हळद, मसाला १/२ चमचा गरम मसाला मिठ तेल ओल खोबर कव्हरसाठीचे साहित्य: १ किलो बटाटे चांगले उकडून मिठ रवा किंवा बटरचा मिक्सरमधुन काढलेला चुरा. तळण्यासाठी तेल पाककृती: प्रथम वरील भाजीचे साहित्य घेउन तेलावर राई, जिर, हिंग ची फोडणी देउन कांदा गुलाबी रंगावर परतवायचा. नंतर त्यावर आल लसुण पेस्ट, हळद व मसाला घालून मटार टाकायचा. आता वरती झा़कण ठेउन त्यावर पाणी ठेउन मटार वाफेवर शिजुन घ्यायचा.

ओप्रा विन्फ्रे : एक प्रभावशाली व्यक्तिमत्व !

स्वैर परी ·
नाव : ओप्रा विन्फ्रे जन्म : २९ जानेवारी, १९५४ व्यवसाय : जनसामान्यांशी गप्पा! वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी गरोदर, अत्यंत गरीब परिस्थिती, हलाखीचे जगणे या सर्वांवर मात करुन वयाच्या २० व्या वर्षी सौन्दर्य स्पर्धा विजेती, उत्तरोत्तर एक यशस्वी टॉक शो होस्ट, आणि पहिली कृष्णवर्णीय महिला अब्जोपती! जिद्द आणि मेहनत यांच्या बळावर तिने आयुष्यात संपादन केलेले यशाचे शिखर भल्याभल्यांना गाठता नाही आलेले! सविस्तर महिती पुढील संकेत स्थळावर! http://www.esakal.com/esakal/20101213/5522047777492239244.htm http://en.wikipedia.org/wiki/Oprah_Winfrey

प्रेम

संजयशिवाजीरावगडगे ·
लेखनविषय:
काव्यरस
मागितलेल्या सगळ्या गोष्ठी मिळतातच असं थोडी असतं, माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात, ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात..

फरसाणा...

निवेदिता-ताई ·
परवाच पुण्यात एका लग्नाला जाणेचा योग आला, कार्यालयातील जेवण छानच होते (पुणेरी), त्यावेळी एक प्रकार दिसला.. फरसाणा... साहित्य- कांदा बारीक चिरुन, फरसाणा एक वाटी, कोथिंबींर, चिचेचे पाणी-भेळेसाठी करतो तसे,मिठ चवीनुसार. कॄती- फरसाणा, कांदा , कोथिंबींर, चिच पाणी एकत्र कालवुन घ्या.

या पोराला काय करावे ?

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिक्षा ठोका सकाळी शाळेत एक मुलगा उशीरा आला. म्हणून रागे भरत गुरुजींनी विचारले " का रे, का उशीर झाला " पोराने उत्तर दिले " हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ". गुरुजींनी काय शिक्षा केली ते सोडा. तुम्ही काय शिक्षा ठोकणार ते सांगा. प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली हे गुरूजींना आवडले नाही हे कळते. पण आपण पोराच्या उत्तराचा नीट अर्थ लावून मगच शिक्षा करा. [सगळ्यांना विचार करावयास वेळ मिळावा म्हणून वाक्याचा अर्थ दोन दिवसांनी सांगावा ही नम्र विनंती.] [शाळकरू] शरद

एक नवा घोर

सन्जोप राव ·
पार्श्वभूमी - हातकणंगले तालुक्यातल्या मौजे रांजणवाडी बुद्रुक मध्ये घडलेली ही सत्य घटना आहे. म्हणजे घटनाच आहे, पण सत्य आहे. किंवा सत्यच आहे, पण घटना आहे. ______ काही दिवसांपूर्वी रांजणवाडी बुद्रुकमध्ये ग्रामसभा होती. या सभेमध्ये सकाळच्या पारी गावाबाहेर 'बसायला' जाणार्‍या ग्रामस्थांना आणि त्यांच्या मुलांना सरपंचानी आमंत्रित केले होते. हेतू हा होता की सरकारच्या नव्या नियमांची या लोकांना माहिती द्यावी आणि लोकांना घरोघरी बांधकामासाठी प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या सरपंचांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला.

भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/15843#comment-267071 बरेच दिवस लिखन बंद आहे, येथील अनेक कविंच्या कविता वाचुन मन प्रसन्न होते.. त्यांचे पाहुनच जुन्या कविता देत होतो.. स्पुर्ती ती त्यांचीच, विशेष करुन प्रकाशजींच्या कविता आणि प्रतिसाद कायम लिखानाला खुणावत होत्या. आज "ज्ञानराम" यांच्या कवितेमुळे खुप दिवसानी काही तरी लिहिले आहे .. आपल्याला आवडल्यास आनंद द्विगुनीत होयील्च ..

पालक भात !

संजयशिवाजीरावगडगे ·
साहित्य : दोन वाटी तांदूळ, ४ वाट्या बारीक चिरलेला पालक, थोडेसे मसाला व कच्चे शेंगदाणे, ३-४ लाल मिरच्या, पाणी, १ चमचा धने-जिरेपूड, ४ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे, २ चमचे टोमॅटो सॉस , मीठ चवीपुरते. कृती : हिरव्या मिरच्या उभ्या चिराव्या . तांदूळ धुवून ठेवावे. पालक पाण्यात ठेवावा , त्यात अर्धा चमचा हळद घालावी. १५- ते २० मिनिटांनी पालक चाळणीवर हाताने काढून ठेवावा. म्हणजे माती पाण्यात खाली बसेल . नंतर चाळणीतला पालक धुवावा. अलगद पाणी पिळून काढावे.