मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सर्व काव्य्-प्रेमींसाठी निमंत्रण

अनुप्रिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व काव्य्-प्रेमींसाठी निमंत्रण Invitation

प्रवास मी एकटीच करते... (गीत)

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... गुलाम जीवन खितपत मळले नाव माझी धारेत डळमळे कुठली नाही दिशाच ठावी गांव कोठले मला न कळले भाव भावनांचा बाजारी एकटीच मी दारोदारी विरक्त जीवन ईश्वर कोठे भक्त म्हणुन ना कुणी स्विकारी अजून मी माझ्यातच जगते कुठे किनारा धरतीमाते जाणिव नाही कुणास माझी प्रवास मी एकटीच करते... - शब्दमेघ ... (स्त्री.. भावनांचा प्रवास मधुन ) हेल्प: चाल येथे सांगता येत नाहिये , तरीही राग थोडासा "दयाघना" गाण्यात वापरला आहे तसा आहे. रागाचे काही कळत नाही मला, पण मित्राने बंदिश गाताना तसे सांगितले म्हणुन ..

सुलभ शौचालय - अशोक नायगांवकरांची कविता

यकु ·
विक्रोळीच्या संपतला मी म्हटले तु रूळावर काय शी करायला बसतोस? अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रूळावरून? तु संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोस? अरे सरळ शौलायात जावे सुसंकृतपणे तशी संपत म्हणाला - साहेब

कहाणी बालपण हरवलेल्यांची ...

गणेशा ·
लेखनप्रकार
समाजातील काही चित्रण अशीही आहेत .. तेच देतो आहे, कविता विभागात देत होतो पण ह्या कविता नाहितच कदाचीत हे आहे चित्र आपल्या आजुबाजुचे .. यातुन एका जरी मुलाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तरी छान वाटेल .. कहाणी .. १.

जे प्रेम करून लग्न करतात ...!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
जेव्हा तो प्रेम करतो तेव्हा त्याच्या खिशात चंद्र असतो जेव्हा ती प्रेम करते तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न असते दहा पेंशाचे फुटाणे खाता खाता दोघांचे एक गाणे असते चला इथपर्यंत पाऊलवाट सापडली स्वर्ग आता हाकेवर आहे आमचे प्रेमतर सात जन्माची ठेव आहे !! तो तिच्या डोळ्यात बघतो एक छान गाणे गातो ती डोळे मिटते त्याच्या गाण्यात हरवून जाते इथपर्यंत गाडी येता येता ती अवघड वाट संपून जाते प्रेमाचा शेवट लग्नात होतो हु.sss...शः....!! आई बाबांचा अवघड प्रश्न आपण चुटकीसरशी सोडवला ह्याच आनदात दोघे असतात संसाराचे गाणे ठेका धरून गात असतात ....!!

काय करू मी बाई सांगा तरी काही

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
काय करू मी बाई सांगा तरी काही
काय करू मी बाई सांगा तरी काही रातीला मजला झोपच येत नाही ||धृ|| डोळं र्‍हाती माझं सताड उघडं कानं कानोसा घेती कवाडाकडं आता तुमी येनार, लगेच तुमी येनार मनाला वाटं पर तुमी काय येतच न्हायी काय करू मी बाई सांगा तरी काही ||१|| परवा म्हनं तुमी मी येतो उद्याच्याला कालचा दिस खाडा झाला, आजतरी कुठं आला एकलीच बसते विचार करते असं छळू नका डोळं लावून तुमची वाट मी पाही काय करू मी बाई सांगा तरी काही ||१|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०

एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा

अवलिया ·
एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा या नावाचा एक लेख नुकताच (लेख जुनाच म्हणजे सप्टेंबर १० अखेरचा आहे मात्र माझ्या नुकताच वाचण्यात आला) तब्बल तीस (की सदतीस?) वर्षानंतर, वाजत-गाजत प्रकाशित झालेली भालचंद्र नेमाडे लिखित "हिंदू एक समृद्ध अडगळ' ही कादंबरी मराठी साहित्य जगतात व सामाजिक विचारात क्रांती घडवणार असे वातावरण तयार झाले होते.परंतु ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर मात्र मराठी साहित्यविश्र्व व विचारविश्र्व हतबुद्ध झाल्यासारखे भासते आहे. या पार्श्र्वभूमीवर, या कादंबरीचे नायक खंडूराव यांच्याशी कादंबरीतील असंबद्धतेबाबत पत्ररूपाने साधलेला संवाद....

गोरं आनि सुन्दर दिसन्यासाठि ?

नरेशकुमार ·
मी मिपावर तसा नविन नाय. पन जास्त जुना पन नाय. मी दिसायला साधारन, अन कलर सावळा हाय. डोक्यावरचि केसं थोडी पान्ढरी पडलीये. त्यामुळे अनेकदा कॉन्फिड्न्स चा कचरा होतो. तब्येत चान्गलि आहे. वजन सुध्हा प्रमानात आहे. तर मित्रान्नो मला गोरं आनि सुन्दर दिसन्यासाठि काय करावं लागेल ? (त्यासाठि ४-५ हजार खर्च करन्याचि तयारि आहे.) टिप : माझे लग्न झालेले आहे. त्यामूळे मुलगी शोध्न्यासाठी याचि गरज नाहि.

बायोमेट्रिक कितपत वापराल?

गवि ·
नुकत्याच कार्यविषयाशी संबंधित घडलेल्या एका कॉर्पोरेट ताणाताणीचा विषय इथे मांडतोय. जनरलीच जसंजसं तंत्रज्ञान फैलावतंय तसंतसं एटीम , महत्वाच्या ठिकाणचे दरवाजे किंवा तत्सम उपकरणं आता पिन (पासवर्ड किंवा अन्य कोड) ऐवजी अंगठ्याचा स्कॅन, डोळ्यांच्या बाहुलीचा स्कॅन अशा मार्गाने वापरणार्‍याला "ऑथराईझ" करण्यासाठी (तिळा उघड..!!) बनवली जात आहेत. त्याचा वापर सर्वत्र व्हावा (खेडेगावे, अशिक्षित वर्गासाठी विशेषतः आणि हाय सिक्युरिटी एरियामधे..) असा विचार चांगलाच जोर धरायला लागलाय. मी थोडक्यात काही मुद्दे खाली लिहितो: १) अंगठ्याचा ठसा एकमेवाद्वितीय असतो हे एक गृहीतक आहे.