बायोमेट्रिक कितपत वापराल?
नुकत्याच कार्यविषयाशी संबंधित घडलेल्या एका कॉर्पोरेट ताणाताणीचा विषय इथे मांडतोय.
जनरलीच जसंजसं तंत्रज्ञान फैलावतंय तसंतसं एटीम , महत्वाच्या ठिकाणचे दरवाजे किंवा तत्सम उपकरणं आता पिन (पासवर्ड किंवा अन्य कोड) ऐवजी अंगठ्याचा स्कॅन, डोळ्यांच्या बाहुलीचा स्कॅन अशा मार्गाने वापरणार्याला "ऑथराईझ" करण्यासाठी (तिळा उघड..!!) बनवली जात आहेत. त्याचा वापर सर्वत्र व्हावा (खेडेगावे, अशिक्षित वर्गासाठी विशेषतः आणि हाय सिक्युरिटी एरियामधे..) असा विचार चांगलाच जोर धरायला लागलाय.
मी थोडक्यात काही मुद्दे खाली लिहितो:
१) अंगठ्याचा ठसा एकमेवाद्वितीय असतो हे एक गृहीतक आहे. शेकडो वर्षं आपण आयडेंटिफिकेशनसाठी अंगठ्याचा ठसा वापरतोय आणि अजून कधी एकासारखे दोन सापडले नाहीत म्हणून "ब्रॉडली" हे गृहितक मान्य आहे. पण जसाजसा अधिकाधिक संवेदनशील कारणांसाठी (उदा. आर्थिक/ सुरक्षितता) हा वापर वाढेल तसंतसं हे गृहितक "फारच गृहित धरल्या" सारखंही वाटायला लागेल. गुन्ह्याच्या तपासातही "ठसे जुळले नाहीत" म्हणजे त्या गुन्ह्याशी संबंधित दहावीस लोकांच्यात एकमेकांसारखे ठसे आढळले नाहीत एवढंच.
"अंगठ्याचा (किंवा कोणत्याही बोटाचा) ठसा / डोळ्याची बाहुली इ.इ.एकमेवाद्वितीय असतो" हे सिद्ध करणं ही मानवी शक्ति आणि क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे (सध्यातरी). त्यासाठी अब्जावधी हातांच्या प्रत्येकी दहा दहा बोटांचे ठसे (किंवा प्रत्येकी दोन दोन डोळ्यांचे स्कॅन्स ) घेऊन त्याची प्रत्येकाची एकमेकांशी होणारी कल्पनेपलीकडल्या संख्येइतकी काँबिनेशन्स तपासावी लागतील.
२) सध्या रूढ असलेला "पासवर्ड" बदलता येतो. तो "लीक"झाला तरी बदलून वापरता येतो, री-इश्यू करता येतो. थंबप्रिंटची माहिती (छाप)सुद्धा शेवटी कुठेतरी "लीक" होऊ शकतेच, आणि तसा झाला तर तो बदलताही येत नाही. तो कायमचा चोरला जातो.
३) वेगवेगळ्या अकाउंटसना वेगवेगळा पासवर्ड ठेवण्याची सोय असते. थंबप्रिंट / डोळ्यातल्या बाहुलीची प्रिंट ही एकदा चोरीला गेली तर सर्वच अकाउंटसची सुरक्षितता एकत्रच धोक्यात येते.
म्हणून मी पासवर्ड "ऐवजी" बायोमेट्रिक वापरण्याच्या तंत्राला आणि ट्रेंडला विरोध केला.
तुमचं काय मत?
याद्या
5567
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
माफ करा..
ह्म्म्म
मी रोज माझा कंप्युटर बोटाच
सर्व मुद्दे एकदम पटेश. मला
याहु मेल ने देखील आता बोटाचा
एटीएम / डेबिट कार्डेच नीट
मुद्दा..
In reply to एटीएम / डेबिट कार्डेच नीट by यकु
मॅट्रीक्सचे लाईव्ह शो रस्तोरस्ती
In reply to मुद्दा.. by चिगो
हो, हे मान्य! अमेरिकेत
In reply to मॅट्रीक्सचे लाईव्ह शो रस्तोरस्ती by यकु
युके साठी भारतातून कोणत्याही
In reply to हो, हे मान्य! अमेरिकेत by रेवती
>>टेक्नोलॉजी अधिकाधिक
In reply to युके साठी भारतातून कोणत्याही by निनाद मुक्काम …
'ग्राहकाभिमुख' असं म्हणायचं
In reply to >>टेक्नोलॉजी अधिकाधिक by नगरीनिरंजन
+१
नव्या तंत्रज्ञानास बर्याचदा
गणेशा जी इथे मुद्दा चोरीचा
In reply to नव्या तंत्रज्ञानास बर्याचदा by गणेशा
पण फिंगरप्रिंट (म्हणजेच हा
In reply to गणेशा जी इथे मुद्दा चोरीचा by स्वानन्द
मला तरी वर दिलेले मुद्दे
>> थंब-प्रिंट असो वा
In reply to मला तरी वर दिलेले मुद्दे by पिंगू
असहमत
तंत्रज्ञान वापरणार्यां