Skip to main content

आली आली दीवाळी आली................

लेखक लीलाधर यांनी बुधवार, 26/10/2011 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली दीवाळी आली......... चला काढूया रा॑गोळी चला काढूया रा॑गोळी.................. शेव चीवडा, कर॑जी आणी लाडू, फराळाची यादी कीती काढू................... अनारसे, चकली नी कडबोळी हीच तर आहे, दीवाळीची थाळी................ स॑गे घेऊन आली......... घराघरातील ''माऊली'' ............ अशीच राहो तीच्या क्रूपेची साऊली, आली आली दीवाळी आली, चला काढूया रा॑गोळी चला काढूया रा॑गोळी.................. दीपावलीच्या हार्दीक शुभेछा.................

ग्रिव्हन्स डे

लेखक आळश्यांचा राजा यांनी बुधवार, 26/10/2011 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा फिल्डवर जायला कलेक्टरांना आवडे. कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी समजून घेण्याचा खात्रीशीर मार्ग! आणि जिल्हा हा नकाशात बघण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहिलेला केंव्हाही चांगला. आज शनिवार. ग्रिव्हन्स डे. कलेक्टर आणि एस्पींनी एकत्र जनतेची गाऱ्हाणी ऐकण्याचा दिवस. प्रत्येक शनिवार वेगवेगळ्या ठिकाणी करायचा आदेशच होता मुख्यमंत्र्यांचा. जेणेकरुन जनतेला जिल्हा मुख्यालयाला येण्याचा व्याप आणि खर्च करावा लागणार नाही. आज बोइपारीगुडा ब्लॉकला जायचं होतं. मराठी-गुजरातीचा भास होणारे आणि तेलुगु भाषेचे मजेशीर मिश्रण असणारे हे ओडिया नाव कलेक्टरांना मोठे रंजक वाटले होते.

महत्त्वाकांक्षेचे रॉकेट ..

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/10/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक... आकाशात सर्वात उंच जावून व्हावा नेत्रदिपक महान यशाचा स्फोट.. सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!! - निमिष न. सोनार, पुणे
काव्यरस

दिवाळी

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 26/10/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती प्रकाशाची करतील उधळण निमित्य आहे दिवाळीचं रांगोळ्यानी सजेल अंगण मित्र मंडळी जमतील आप्त फराळ होईल क्षणात फस्त मग शुभेच्छांच्या वर्षावात आनंदून जाईल आसमंत ..! अंगणात राँगोळी सभोवती पणत्याँची आरास दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या सहपरिवारास

तयार करा हिरवं पान

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 26/10/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
तयार करा हिरवं पान
दिवाळीचा फराळ खावून केलं जेवन काथ लावून तयार करा हिरवं पान ||धृ|| हिरव्या पानाच्या होsss हिरव्या पानाच्या शिरा हळूहळू खरडा देठ शेवटाला लागल तो पण खुडा तोंडानं म्हणा आपलं खुशीतलं गानं राया तुमी माजबी लावा की हो पान ||१|| पुढं ओढा जरा होsss पुढं ओढा डबा पानाचा तुम्हां जवळी त्यातच ठेवली पहा सुपारी चिकनी अडकित्यामधी फोडा तिला हाती धरून पानावर मग पसरा बारीक कतरून ||२|| प्रेमाचा गुलकंद लावा तुम्ही पानाला तयार झाल्यावर हातामधी द्या त्याला जवळी या आता खावून पान थांबून जा थोडं मन रिझवून ||३||
काव्यरस

छायाचित्रे- खास मिपासाठी

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 26/10/2011 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो/मैत्रिणिंनो, अगोदर मला सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा देऊ देत. सर्व मिपाकरांना व त्याच्या कुटूंबियांना माझ्या दिपावलीच्या शुभेच्छा, कृपया यांचा स्विकार करावा. आपल्यासमोर काही दारूकाम करत आहे, त्याची मजा लुटावी...

परत दिवाळी येणार...

लेखक दादा कोंडके यांनी बुधवार, 26/10/2011 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
परत दिवाळी येणार. लोकं "महागाई किती वाढली आहे!" म्हणणार आणि लक्ष्मीरोडवर खरेदीसाठी झुंबड उडवणार. परत "हॅप्पी डिवाली" वगैरेचे मेसेजेस मिळणार, मी मग ह्याचे त्याला, त्याचे ह्याला असं करून ते परत करणार. आयटी मधलं पब्लिक चितळे मधुन तयार फराळ आणणार आणि चॅटींग करताना किल्ला, घरकुल, न-उडलेल्या फटाक्यातली दारु काढुन उडवण्याचा आठवणींबद्द्ल भरभरुन बोलणार. "बाहेर" असलेले जास्तच नॉस्टॅल्जीक होणार. मी पण, ह्यावेळी घरापासुन लांब आहोत पण 'आकाशदिवा तरी घरीच करुन लावायचा' असं ठरवणार पण परत न-करायला काहितरी निमित्त सापडणार. मागच्या वर्षीपेक्षा एक्-दोन ऑनलाईन दिवाळीअंक जास्त निघणार.

मराठी विज्ञान परिषद - निमंत्रण

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 26/10/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एक स्नेह्यांकडून हे खालील निमंत्रण मिळाले. मराठी विज्ञान परिषदेकडून आलेले असल्याने मराठी बाण्यावाल्या आपल्या मिपाकरांना हे पाठवत आहे. जर अधिक माहिती साठी तुम्हाला निमंत्रण पत्रिका (पीडीएफ) हवी असेल तर मला खरडीवर/व्यनिने कळवा आणि मी तो संदेश आपल्या पत्त्यावर ढकलून देईन. ----आलेला निरोप येथे सुरु----- नमस्कार, ४६ व्या अ. भा. विज्ञान अधिवेशनाचे निमंत्रण सोबत पाठवत आहे. आपण या कार्यक्रमास जरुर यावे. आपल्याला शक्य असेल तर पुर्णवेळ प्रतिनिधी म्हणून नोंदणी करावी ही विनंती. -विनय र. र.

मांगल्याचे औक्षण करूनी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 25/10/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदी भरले पाऊल घेऊन पहाट अवतरली.. अलगद नाजूक, धरतीवरती चाहूल थरथरली.. जागी झाली सृष्टी सारी ऐकून भूपाळी निळेजांभळे क्षितिज तेव्हा झाले सोनसळी क्षितिजावरती डोकावुनीया हळूच तो हसला आळसावल्या चराचराला सूरही गवसला लगबग झाली दहादिशांतुन तया पाहण्याला ओलेत्याने सज्ज जाहल्या जणू स्वागताला धरतीवरती शिंपण झाले सडा रांगोळ्यांचे मनी मानसी दीप उजळले नविन आशांचे काळोखाची संपून जाईल मुजोर बळजोरी आकांक्षांची किरणे येतील हसून सामोरी नविन आशा आकांक्षांनी भरु दे ही झोळी मांगल्याचे औक्षण करूनी हसेल दिवाळी.. - प्राजु
काव्यरस