Skip to main content

केव्हा तरी पहाटे...

लेखक एस यांनी शनिवार, 10/11/2012 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश तारकांचा उतरून साज गेले अर्धोन्मिलीत नयनी एक स्वप्न साजलेले हा मंदगंध वारा विसरून तोच गेला निष्पर्ण सावलीचे एक पर्ण तरंगलेले बेधुंदल्या कळ्यांचे निःश्वास दाटलेले उन्मीलनाचे स्वप्न स्वप्नात पाहिलेले हलक्याच पावलांची ती वाट धुकटलेली स्मृतिगंधल्या मनांचे हृदय स्पंदलेले पौगंडल्या उषेचा प्रियकर नभी तो आला थरारले अधरही, आरक्त गाल झाले निस्तब्ध शांतताही विस्कटून सारी गेली पंखांतली कुजबूज, आसमंत व्यापलेले चेहर्‍यावरी बटांचे रेंगाळणे उगाच निःश्वासही उगाच, उगाच कूस बदलणे शराबल्या नजरेनं मनपक्षी कैद केला पुन्हा त्याच मिठीत हरवून सारे गेले...
काव्यरस

तुम्ही किती व्यवस्थित आहात?

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 10/11/2012 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल. खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा. प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या.

<<मनातलं सांगताच येईना>>

लेखक प्रास यांनी शनिवार, 10/11/2012 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे! तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे. नाक्या नाक्यावर तुझा हक्क मला नाकारता येईना अड्ड्याची जुळवणी काट्याचा नायटा करतेय... मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... खातं होतंच कुठे?

चारोळी

लेखक कल्पी जोशी यांनी शुक्रवार, 09/11/2012 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
तूझं मला आठवणं माझं देहभर उजळण कुणाची नजर न लागो काळोखात पणतीचं लकाकण कल्पी

लक्ष लक्ष दिव्यांचा ..............

लेखक अनिल तापकीर यांनी शुक्रवार, 09/11/2012 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष लक्ष दिव्यांचा दिपत्कार घडविणारी दिवाळी, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारी दिवाळी, मरगळलेल्या थकलेल्या मनाला उल्हासित करणारी दिवाळी, वर्षभर कामात बुडालेल्या जीवांना सलग सुट्टी देणारी दिवाळी, कामानिमित्त दूर दूर विखुरलेल्या पिलांना घरट्यात आणणारी दिवाळी, धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन,पाडवा,भाऊबीज एकत्र आणणारी दिवाळी, घनदाट अंधारया रात्रीतील अलौकिक दिपोत्सव म्हणजे दिवाळी, ************************************************************************* अश्या ह्या अलौकिक दिवाळी/दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अनिल तापकीर आणि परिवार

मनातलं सांगताच येईना ...

लेखक जेनी... यांनी शुक्रवार, 09/11/2012 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दाशब्दांवर तुझा हक्क मला नाकारता येईना अक्षरांची जुळवणी अर्थाचा अनर्थ करतेय ... वेदनेची बारीक कळही मला दाखवता येईना भरत आलेल्या जखमांचीच परत खपली निघतेय ... नातं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता निभवता येईना श्रावणातल्या सरींनी भिजूनही कोरडेच थेंब पुसतेय ... आठवणींची पानं पलटली तरी अजिबातच आवाज होईना कधीतरी तुला आठवण येईल आसवांची समजुत घालतेय ...

केजरीवाल ह्यांचा स्वीस बॉम्ब

लेखक चिरोटा यांनी शुक्रवार, 09/11/2012 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
सलमान खुर्शीद,जावयबापूं,गडकरी ह्यांचे वस्त्रहरण केल्यानंतर केजरीवाल ह्यांनी भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील बड्या उद्योगपतींना 'घेतले' आहे.!! भारत सरकारकडे जुलै २०११ मध्ये स्वीस बँकेत खाते असणार्‍या ७०० लोकांची यादी होती.ह्या सर्वांचे खाते जिनिव्हामध्ये HSBC बॅन्केत होते. १) मुकेश्,अनिल अंबानी- प्रत्येकी १०० कोटी. २) अंबानींच्या रिलायन्सचे -५०० कोटी.

इंडिअन पोस्टाचा अनुभव

लेखक प्रशांत हेबारे यांनी शुक्रवार, 09/11/2012 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला आलेला पोस्टाचा अनुभव एकदम झकास आहे. तेच्या अगोदर पाठीमागची महिती सांगतो माझी मुलगी अदिती तीन महिन्यापूर्वीच स्वीडन ला शिकायला गेली रोटरी युथ एक्ष्चेन्ज मार्फत. दिवाळी असल्यामुळे तिला दिवाळीचा फराळ पाठवायचा ठरला. तिने आम्हाला स्काएप मार्फत लिस्ट पाठीवली. चकली, कारंजी, लाडू, चिवडा, चटणी वगरे. बायकोने इकडे पदार्थ कारायला घेतले. तीन ते कार दिवसामध्ये तिचे पदार्थ बनले. आता माझे काम सुरु झाले. पुस्तके, चितळे चे काही पदार्थ विकत घेतेल आणि रात्री सर्व प्याक केले. सगळ्या कुरीरअर् वाल्याकडून चार्जेस घेतले ते खालीलीप्रमाणे, DHL – Rs. 3800 per Kg Unique Express & all other courier – Rs.

दारुबंदी झालीच पाहिजे!

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 09/11/2012 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
मद्यप्रेमी आणि मद्यपरिणामभयग्रस्त यांच्यात नेहेमीच चकमकी झडत असतात. दोन्ही पक्ष आपापल्या परीने योग्यच बोलत असतात. दोन घटका विरंगुळा म्हणुन वा मजा म्हणुन कधी चार दोस्तांबरोबर निवांत बसुन मैत्रीबरोबर मद्याचा आस्वाद घेणे काही गैर नाही - हे ही योग्य. एकदा पीण्याची चटक लागली तर बरबादी होण्याची खात्री हेही बरोबर. कोण आस्वाद घेईल आणि कोण व्यसनी होईल हे सांगणे अशक्य आहे. असो. सध्या सोत्रिंच्या चावडीवरून सुरू झालेल्या चर्चासत्रावरुन मला माझा एक जुना किस्सा आठवला.