शब्दाशब्दांवर तुझा हक्क
मला नाकारता येईना
अक्षरांची जुळवणी
अर्थाचा अनर्थ करतेय ...
वेदनेची बारीक कळही
मला दाखवता येईना
भरत आलेल्या जखमांचीच
परत खपली निघतेय ...
नातं होतंच कुठे? पण जे होतं ते
मला आता निभवता येईना
श्रावणातल्या सरींनी भिजूनही
कोरडेच थेंब पुसतेय ...
आठवणींची पानं पलटली तरी
अजिबातच आवाज होईना
कधीतरी तुला आठवण येईल
आसवांची समजुत घालतेय ...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4700
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली. पहिल्या कडव्यात
म्हणजे गं ??
In reply to कविता आवडली. पहिल्या कडव्यात by रेवती
भावनांमध्ये वेगळेपणा वाट्टोय.
In reply to म्हणजे गं ?? by जेनी...
कवितांमधलं फारसं ज्ञान मलाही
In reply to भावनांमध्ये वेगळेपणा वाट्टोय. by रेवती
रेवा आज्जी .
In reply to भावनांमध्ये वेगळेपणा वाट्टोय. by रेवती
कविता आवडली
ठिक-ठाक कविता...
काही आहे / काही नाही .
खूप छान!
छान लिहिलंय.
मस्त मस्त गो बालिके,मस्त...!
कवीता
ठीक्ठाक
पै बै टेन्शन नै लेनेका
In reply to ठीक्ठाक by पैसा
चांगला प्रयत्न
आजच्या युवा पिढीने???????
In reply to चांगला प्रयत्न by श्रीरंग_जोशी
वय वर्ष १२५
In reply to आजच्या युवा पिढीने??????? by बॅटमॅन
शीर्षक एकदम परफेक्ट
एक्झॅटली .अब्या ..
In reply to शीर्षक एकदम परफेक्ट by अभ्या..
(No subject)
In reply to एक्झॅटली .अब्या .. by जेनी...
पूजा, लेखनाला स्टेनो ठेवलाय काय?
पॉ पॉ पॉ पॉ पॉ
नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला?
In reply to पॉ पॉ पॉ पॉ पॉ by खटासि खट
अरे त्यांनापण माझ्यासारखच '
In reply to नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? by किसन शिंदे
पू ssssssssssss.... सुन्दर
In reply to अरे त्यांनापण माझ्यासारखच ' by जेनी...
पूजा पवार जी , कविता आवडली