Skip to main content

तिरफळाची बांगड्याची आमटी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी मंगळवार, 19/03/2013 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)५-६ ताजे बांगडे. २)१०-१२ लाल मिरच्या. ३)हळद्पूड. ४)खवलेला नारळ(अर्धा नारळ) ५)५-६ आमसुले. ६)८-९ तिरफळे. ७)मीठ. ८)एक चमचा धणे. कॄती :-बांगड्याचे तुकडे करून घ्यावे.खवलेले खोबरे,मिरच्या,धणे,हळद एकत्र वाटावे.वाटण आमटी करणार त्या भांड्यात काढून घ्यावे.त्यात मीठ व ठेचलेली तिरफळे घालून शिजत ठेवावे.उकळायला आले की त्यात बांगडे व आमसुले घालावी.व आमटी चांगली उकळून घ्यावी.

शित्याची खोड

लेखक नरेश_ यांनी मंगळवार, 19/03/2013 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
शित्याशेट ज्याम दिवस गावातनं गायप झाल्ता.कुनाला कय खबर ना पता. नाय म्हनाल आशिला सांगला व्हता क मामासकरं जातू म्हनून! शित्याशेट म्हनजे सिताराम म्हात्रे- हा तोच तो. एक नं. झोलर मानुस.मागं पन आपल्याला तो भेटलावता.

चाकवतची ताकातली पातळ भाजी

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 19/03/2013 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज आमटी करून कंटाळा येतो. काहीतरी कढी, सार असा बदल छान वाटतो. याच उद्देशाने केलेली ही चाकवतची ताकातली पातळ भाजी!! चाकवत ऐवजी पालक वापरूनही याच क्रुतीने ही भाजी करता येते. साहित्यः एक जुडी चाकवत, अर्धा लीटर दह्याचे ताक, दोन-तीन चमचे बेसन, आठ-दहा लसूण पाकळ्या, अर्धी वाटी ओले अगर भिजवलेले काजूगर(ऐच्छीक), मीठ, साखर, वाट्लेली ओली मिरची अर्धा चमचा अगर लाल तिखट, दोन-तीन चमचे तूप, अर्धा चमचा जीरे, सुक्या मिरच्या दोन-तीन्, मेथी दाणे दहा-बारा. क्रुती: प्रथम चाकवत निवडून, धुवून, चिरून कुकरला वाफवून घ्यावा. दही मिक्सरला घुसळून घ्यावे. चाकवत आणि बेसन पीठ एकत्र मिक्सरला थोडे फिरवून घ्यावे.

'लेह' वारी, भाग ७

लेखक मनराव यांनी मंगळवार, 19/03/2013 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
काही करणास्तव महिना दिडमहिना लिहायला उशिर झाल्यबद्द्ल क्षमस्व.....अता पुढे.... 'लेह' वारी, भाग १ 'लेह' वारी, भाग २ 'लेह' वारी, भाग ३ 'लेह' वारी, भाग ४ 'लेह' वारी, भाग ५ 'लेह' वारी, भाग ६ मनालीला जाताना रोहतांग पासला काळजी घ्या असा सल्ला त्य

द्रमुकने केंद्राचा पाठिंबा काढला

लेखक नाना चेंगट यांनी मंगळवार, 19/03/2013 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी अखेरीस द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढणार असल्याचे जाहिर केले आहे. श्रीलंकेतील तामिळींवर होणार्‍या अत्याचारांच्या संदर्भात भारताने काही ठोस भुमिका घ्यावी ह्या उद्देशाने करुणानीधींनी पाठिंबा काढला असल्याचे कळते. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19061506.cms पण एकंदरीत पहाता १) हा करुणानिधींचा स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रकार आहे? २) करुणा निधींना खरोखर तामिळींची फिकीर आहे? ३) इतर काही यामागे घडामोडी आहेत? तुम्हाला काय वाटते?

कवितेचे शिर्षक आहे: मिठी

लेखक जोशमनिष यांनी मंगळवार, 19/03/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
कातर क्षण, अस्थिर मन द्यावे झोकून, तुझ्या मिठीत गुंतता हृदय, निष्काम प्रेममय अविरत लय, तुझ्या मिठीत अनावर प्रीती, ओढ सांगाती प्रेमधारा वर्षति, तुझ्या मिठीत श्वास गुंफले, द्वैत सरले भानही नुरले, तुझ्या मिठीत काहूर थमले, मन सावरले मेघही बरसले, तुझ्या मिठीत आधार भावनिक, बळ आत्मिक आश्वासन प्रेरक, तुझ्या मिठीत

कुणास्तव.. कुणीतरी.. (कथा)

लेखक मी_देव यांनी मंगळवार, 19/03/2013 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
भर दुपारची वेळ. डोक्यावर तळपता सुर्य आग ओकत होता. शिवाने आपला मोर्चा एका वस्तीकडे वळवला. शिवा… मध्यम वयाचा, गरीबीनी गांजलेला इसम. सतत उन्हातान्हात फिरल्यामुळे रापलेला निबर वर्ण, पायात जुनाट स्लिपर्स, अंगात कळकट्ट कपडे, डोक्यावर जीर्ण टोपी, हाताशी मोडकळीला आलेली सायकल, सायकलच्या हॅंडलला दोन्ही बाजूला लटकवलेली गोणती, कॅरियरला बांधेलेली ट्यूब आणि तोंडात ठराविक पद्धतीने घालायची साद “ए भंगार बाटली रद्दीSSSSS” आज काही मनासारखी भंगार खरेदी झाली नव्हती. संध्याकाळी आदिलशेठला काय विकणार, आणि गाठीशी पैसा कसा साठणार हिच चिंता.

घराच्या उंब-याला सांग फिरुनी

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 19/03/2013 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या उंब-याला सांग फिरुनी घराच्या उंब-याशी थांब फिरुनी पुन्हा ती ओळखीची रात येता तिला सोडून येते लांब फिरुनी किती चालून गेले वाट वेडी खुणेचा येतसे का खांब फिरुनी मनी गर्दी कशाला आठवांनो इथे ना हासरी ती रांग फिरुनी थवे गं दाटले या आसवांचे जराशी काजळा तू पांग फिरुनी (*पांगणे) - संध्या १९ मार्च २०१३

जॉली एल एल बी

लेखक जयवी यांनी मंगळवार, 19/03/2013 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी ह्या सिनेमाबद्दल बोलणं झालं आणि सिनेमा बघायचाच असं ठरलं. तसा आज सिनेमा बघूनही झाला. आवडला !! एक कलाकृती म्ह्णून सिनेमा आवडलाच ! कथानक काही वेगळं नव्हतं खरं तर. नेहेमीचेच गरीबांवरचे अत्याचार आणि कायदा आंधळा असल्याचा फायदा घेणारे धूर्त वकील आणि त्याविरुद्ध लढा देणारा नायक !! सोबत एक छान नायिका, साथ देणारे त्याचे मित्र आणि शेवटी त्याला मिळणारा विजय. अगदी नेहेमीच्याच वळणाने जाणारी स्टोरी. पण तरीही काहीतरी वेगळं होतं !! मला वाटतं, सिनेमा ज्या सहजतेने पुढे सरकत जातो त्यामुळे कथेत पुढे काय होणार हे आधीच समजत असूनही आपण पुढे काय होणार ह्याची वाट बघतो.