Skip to main content

घराच्या उंब-याला सांग फिरुनी

लेखक सांजसंध्या यांनी मंगळवार, 19/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या उंब-याला सांग फिरुनी घराच्या उंब-याशी थांब फिरुनी पुन्हा ती ओळखीची रात येता तिला सोडून येते लांब फिरुनी किती चालून गेले वाट वेडी खुणेचा येतसे का खांब फिरुनी मनी गर्दी कशाला आठवांनो इथे ना हासरी ती रांग फिरुनी थवे गं दाटले या आसवांचे जराशी काजळा तू पांग फिरुनी (*पांगणे) - संध्या १९ मार्च २०१३
लेखनविषय:

वाचने 1675
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुरेख. कविता एकदम आवडली आहे. आणखी येऊ द्या.

सुरेख रचना.