Skip to main content

गाय आणि वासरु

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 31/03/2013 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
मन गाय प्रेम तिचे वासरू, मन गाय दुख: तिचे वासरू, मन गाय वासना तिचे वासरू, मन गाय दंभ तिचे वासरू, मन गाय क्षमा तिचे वासरू, मन शांत तुम्ही फुलपाखरू.

ईस्टर स्पेशल- चॉकलेट एग नेस्ट

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 31/03/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी डार्क चॉकलेट तुकडे करुन घेणे १/२ वाटी श्रेडेड व्हिट (तुम्ही कॉर्नफ्लेक्स्,ओट्सचा वापर पण करु शकता) १/४ वाटी डेसीकेटेड कोकोनट (हलके भाजून घेतलेले) रेडीमेड चॉकलेट एग्ज्(बाजारात मिळतात) मफिन फॉईल केसेस/कप्स/पेपर कप्स/ट्रे (मी सिलिकॉन कप्स व मोल्ड वापरले आहे) . पाकृ: एका बाऊलमध्ये श्रेडेड व्हिट घेऊन

किंग फिश सिझलर

लेखक प्रतिज्ञा यांनी रविवार, 31/03/2013 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- सुरमई माश्याचे तुकडे, वाफवलेल्या बटाट्याचा लगदा, तिखट, मीठ, मिरपूड, मोहरी पेस्ट (बाजारात मिळते ती ), टोमाटो केचअप, बटर, अद्रक लसून पेस्ट, मैदा, लीम्बुरस, केळीच पान, सिझलर प्लेट, तेल, विविध भाज्या (गाजर, फरसबी, बेबीकॉर्न, पत्ताकोबी, मशरुम्स ई.) कृती:- प्रथम माशे भरपूर पाण्याने साफ करून त्यावर लीम्बुरस, मीठ, मिरपूड, अद्रक लसून पेस्ट, टोमाटो केचअप, मोहरी पेस्ट व थोड तेल घालून १० मिनिट मेरीनेट करायला ठेवा. इकडे बटाट्याचा लगद्यात तिखट, मीठ, मिरपूड घालून चपटे गोळे बनवून या टिक्क्या मैद्यात घोळवून तेलावर खरपूस तळून घ्या.

अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद

लेखक साळसकर यांनी रविवार, 31/03/2013 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे "मीच तुझी रे चारोळी" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. "तुला रं गण्या कधीपासून हा छंद?" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, "अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं.. ऐन दुपारी.. नदी किनारी.. फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी.. तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने.. घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे.. "चांगली भरारी आहे राव, भिडली अगदी मनाला.

घरगुती फेसपॅक व अन्य टीप्स

लेखक शुचि यांनी रविवार, 31/03/2013 05:51 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाला त्वचेसाठी पोषक अशा घरगुती फेसपॅक ची माहीती आहे का? मला माहीत असलेले ३ फेसपॅक पुढीलप्रमाणे- (१) कोरड्या त्वचेसाठी - व्यवस्थित फेटलेले अंडे + २ चमचे ओटमील हा फेसपॅक १०-१५ मिनीटे ठेवला तर अंड्यामुळे त्वचा छान ओढली जाते व एज-डिफाइंग क्रीमचा इफेक्ट मिळतो असा अनुभव. (२) एक चमचा मध व साय न काढलेले नीरसे दूध - त्वचा मुलायम होते हा अनुभव (३) लिंबाचा अथवा संत्र्याचा रस व मध - लिंबू/संत्र्याच्या रसाने त्वचा कोरडी झाली. हा फेसपॅक फारसा आवडला नाही. या धाग्यावर आपण आरोग्याची अथवा त्वचेची अन्य कोणती व कशी काळजी घेता, केसांची निगा कशी राखता वगैरेबद्दल उहापोह होणे अपेक्षित जसे भरपूर पाणी पीते/पीतो.

अश्वत्थामा

लेखक सुयशतात्या यांनी रविवार, 31/03/2013 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
या अश्वत्थामम्याला कुठे शोधू तो एक पुण्यश्लोक माणूस निर्दयी राजकारणी म्हणून हिणवलेला एक न्यायी म्हणून नावाजलेला मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या संधीशोधू राजकारण्या लोकांन मध्ये ऊराशी खोल जखम झालेला एकटे पणाशी नाते जोडून विरक्त झालेला मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या विरक्ततेच्या पांघ्ररूणात लपलेल्या ढोंगी लोकांन मध्ये रक्तपाताशी जवळचे नाते सांगणारा कठोर म्हणून नावाजलेला मी नाही शोधू शकत त्याला आजकालच्या संरक्षणाशी नाते असलेल्या ढोंगी लोकांन मध्ये अमरतेचा शाप असणारा भळभळणारी जखम बाळगणारा सांगा ना कूठे शोधू या पुण्यश्लोक माणसाला......
काव्यरस

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ११ : ओस्लो नगरी (२)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 30/03/2013 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

नजर

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 30/03/2013 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत कुणा भक्ती ,नजरेत कुणा विरक्ती , नजरेत कुणा धोका,नजरेत कुणा मोका, नजरेत कुणा वासना,नजरेत कुणा कामना, नजरेत कुणा युक्ती,नजरेत कुणा सक्ती. नजरेत कुणा संस्कार,नजरेत कुणा दुत्कार, नजरेत कुणा जरब,नजर कुणाची खराब, नजरेत कुणा लगट ,नजरेत प्रेम प्रगट , नजरेत कुणा व्यथा,नजरेत कुणा कथा, नजरेत प्रगटे ज्ञान ,नजर मनाची शान.
काव्यरस

हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 30/03/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
अग्ने नय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुयानि विद्वान्. युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो भूयिष्ठां तेनमउक्तिं विधेम. [ईशोपानिषद (मंत्र १8)] शाब्दिक अर्थ: हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. ही विनंती. अग्निदेव सर्वज्ञ आहेत, ते सर्वकाही जाणतात, त्यांच्या पासून काही ही लपलेले नाही. साधकच्या हातून घडलेल्या वाईट कृत्यांमुळे मुक्तीचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे. पापांच्या परिणामांपासून मुक्त करण्यासाठी साधक अग्निदेवाची विनंती करीत आहे.

कविता

लेखक इरसाल यांनी शनिवार, 30/03/2013 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
मला जेव्हा वाटले सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात मी विकट गडावर चढायला सुरुवात केली, अंड्याचे फंडे चा छंद जेव्हा उत्तर ध्रुवीय प्रदेशा च्या सफरीवर गेलो तेव्हाच लागला पण सहाशेपन्नास रुपये, पिडा - चोर अन शीलाकी बुद्धिमानीने जेव्हा गृहखात्याची इमेज खराब व्हायला लागली व दुबईची काळी बाजू, ती का झाली तर बॉईल्ड एग्ज मधुन निघणार्‍या एच टु एस ह्या वायुने, आता टोमॅटोपुरीने जर डुक्कर आणि दारुडा नवीन वर्षाचा संकल्प करत असतील तर एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची त्यात दारू - म्हणजे काय रे भाऊ विचाराल म्हणजे तुम्ही गुंडाच....झालं आपलं कालाय तस्मे नमः या उप्पर जर तुमच्या अ‍ॅन्ड्रॉ