Skip to main content

डॉ खरे आणि माझे जुनेच कन्फ्युजन

लेखक मन यांनी मंगळवार, 02/04/2013 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. खरे ह्यांचे मिसळपावावरील लिखाण वाचून पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.) . त्यासंदर्भात टेक्स्टबुक बाह्य वाचन करताना पडलेला प्रश्न. "ग्रामर्थं कुटुंबम् त्यजेत् | राष्ट्रार्थम् ग्रामम् त्यजेत ||" असे म्हणे चाणक्य म्हणून गेलाय.

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २--पुढे

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 02/04/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
त्या स्त्रीला ३/४ (तीन चतुर्थांश) योनी नव्हतीच. त्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे चालू होते हे त्या स्त्रीला विचारले तर ती म्हणाली व्यवस्थित चालू आहे. त्या नवर्याला सम्भोगाबद्दल अज्ञान असावे किंवा ती स्त्री खोटे बोलत होती. त्या स्त्री कडून हे तत्वज्ञान ऐकून घेतले माझा रिपोर्ट लिहिला आणी तिच्या हातात ठेवला. दार उघडले तर तिचा नवरा बाहेर उभा होता आणि त्याने लगेच विचारले कि साहेब मुल होईल ना? त्या गरीब माणसाकडे पाहून मला कसेसेच झाले. त्याची दुहेरी फसवणूक झाली होती आणि त्यातून त्याला तुला मुल होणे फार कठीण आहे हे सांगण्याचा मला तेंव्हा तरी धीर झाला नाही.

शोध....... माझा

लेखक ढंप्या यांनी मंगळवार, 02/04/2013 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळीनो, हा माझा मिपावर टंकण्याचा पहीलाच प्रयत्न आहे..... गोड मानून घ्या एवढीच विनंती.... हा रस्ता दूर जातसे, परत न येण्यासाठी...... सोबतीला कोणी नसे, साथ देण्यासाठी...... पण, मला चालावेच लागणार, काहीतरी शोधण्यासाठी...... मनात आहेत दुर्दम्य आकांक्षा, माझ्यातल्या मी साठी...... कोणी साथ द्या, अगर नका देउ...... मला चालावेच लागणार, काहीतरी शोधण्यासाठी...... माझ्यातल्या मी साठी......

संकल्प

लेखक राजा सोव्नी यांनी मंगळवार, 02/04/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यु हा अंतिम नाही ,नंतरही करता येते बरेच काही, करोनी डोळे दान अंधांची वाढवावी शान, कुणा द्यावे चाम ,जळलेल्या चे होईल काम, किडनी द्यावी कुणा,आयुष्य जगेल दुणा, दान करोनी वेगवेगळे भाग,वाचवावे जिवलग, करोनी शरीर दान मेल्यावरही व्हावे महान , करा मनाचा कायाकल्प ,धरा मनी देह दाना चा संकल्प.
काव्यरस

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/04/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.

कूस-कूस -ब्रोकोली सलाड

लेखक कच्ची कैरी यांनी मंगळवार, 02/04/2013 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
couscous salad >साहित्य- १) कूस कूस (couscous )-१/२ कप २) चिकन स्टॉक किंवा पाणी - १/२ कप ३) उकडलेली ब्रोकोली-१ कप ४) बारीक चिरलेले गजर- १/२ कप ५) बारीक चिरलेली काकडी- १/२ कप ६) सुकलेल्या क्रेनबेरीज (dried craneberries )-१ ते २ टेबल स्पून ७) बेसिलची पाने - ४ ते ५ ८) लिंबाचा रस - २ टेबल स्पून ९) ऑलिव ओईल -२ टेबल स्पून १०) मिरपूड-१/४ टी स्पून ११) मीठ चवीनुसार १२) बारीक चिरलेला लसुन-१ टी स्पून

<नाव सुचले नाही>

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 02/04/2013 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता तु घाईत होतीस अन् , त्यांना वेळ पाहिजे होता तू गेलीस परंतु , हा वसंत ईथेच आहे मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता रोजचेच आहे, हे ही धुके परंतु सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता एकटाच येत गेलो , हरेक मैफिलीतून मी ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
काव्यरस

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 02/04/2013 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हि १९९१-९२ ची गोष्ट आहे. मी पुण्यात एम डी करीत होतो. माझे लग्न झालेले नव्हते. सरकारी नोकरी होती. खिशात पैसे होते आणि घरची जबाबदारी हि नव्हती आई वडील आणि थोरला भाऊ नोकरी करीत होते. पुण्यात सायंकाळी वैशाली किंवा रुपाली मध्ये पुणेकर भाषेत पडीक असायचो.बरोबर अभियांत्रिकीतील मित्र जे असेच नोकरी संपल्यावर हिरवळ पाहण्यासाठी हजर असत. एकदा एक मित्र म्हणाला कि अरे मी ज्या पंपावर पेट्रोल भरतो तिथे काम करणारा एक मुलगा जर बरा नाहीये बघतोस काय? मग तो आणि मी कर्वे रोड वर माडीवाले कॉलनीच्या जवळपास कोणतातरी पेट्रोल पंप होता तेथे गेलो. तिथे एक राजू नावाचा किडकिडीत मुलगा (२५-२६ वयाचा) त्याने दाखवला.

वैजनाथ-आरोग्यभवानी

लेखक श्रीमान यांनी मंगळवार, 02/04/2013 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
दत्त संप्रदायात नरसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणांमधे औदुंबर, नरसोबावाडी आणि गानगापूर या ठिकाणांचा प्रामुख्याने समावेश होतो. गुरुचरित्रात उल्लेख असणार्या ठिकाणांमधे गुप्तरुपाने गुरुंचे वास्तव्य जेथे १२ वर्षे होते अशा ठिकाणाची माहिती मात्र फारशी प्रचलित नाही. हे ठिकाण आह्रे कोल्हापूर - बेळगाव सिमेवरील देवरवाडी गावातील वैजनाथ आरोग्यभवानी मंदिर. गुरुचरित्र पाठ करताना आज अनेक वर्षे त्यात पुढिल श्लोक वाचनात येई. ऐसेपरी सांगोनी !! श्रीगुरु निघाले तेथोनी !! जेथे असे आरोग्यभवानी !! वैजनाथ महाक्षेत्र !! (अध्याय १४) आज पर्यंत हे ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ असावे असेच वाटत होते.