रंजनाकडून चिंतनाकडे नेणारा लेखकराजा
लेखनविषय:
लेखनप्रकार
वयाच्या विशीत जेव्हा आपण काही पुस्तके वाचतो आणि ती आवडतात तेव्हा त्यांचे लेखक आपल्या मनावर गारुड करतात आणि त्यातले काही तर कायमचा ठसा उमटवतात. वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत इंग्लिश साहित्याशी काही संबंधच आला नव्हता. नंतर मेडिकलला गेल्यानंतर ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झालो. खरं म्हणजे त्याचा उद्देश अभ्यासाच्या पुस्तकांसाठी होता. परंतु पहिल्याच दिवशी तिथे पाऊल टाकताच लक्षात आले की, अरेच्चा, इथे इंग्लिश गोष्टीची पुस्तके सुद्धा आहेत तर !
मिसळपाव