Skip to main content

कविता - एक खेळ

लेखक जेपी यांनी सोमवार, 02/12/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला कविता करन कधी जमलच नाही . पण कविता वाचायला भारी आवडत. काही गोड प्रसंगी इतरांच्या कविता स्वतच्या नावावर खपवायचा प्रयत्न हि केला . पूर्वी एका वर्तमान पत्रात कवितेचा एक खेळ यायचा . तोच खेळ येथे देत आहे . या खेळाचे नियम फार सोपे आहेत . मी तुम्हाला काव्याच्या दोन पंगती देत आहे . तुम्ही प्रतिसादात कमीतकमी दोन जास्तीतजास्त चार ओळी लिहा . नवरसा पेकी कुठल्या हि रसाच्या आसु द्या . फक्त वरच्याशी जुळणाऱ्या आणि खालच्याला पूरक आसु द्या . मी खाली माझ्या दोन ओळी देत आहे . " माझ्या मनात तुझे येणे -जाणे, कठीणनच आहे शब्दात पकडणे "

मरीन ड्राईव्ह!!

लेखक वडापाव यांनी रविवार, 01/12/2013 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
मरीन ड्राईव्हला गेलो होतो(अर्थातच एकटा गेलो नव्हतो, पण ते महत्त्वाचं नाहीये). मरीन लाईन्स स्टेशनवर उतरून रस्ता ओलांडून कठड्यावर चढलो. वेळ गर्दीची नव्हती. त्यामुळे बसायला जागा भरपूर होती. पण बसावं, असं त्या अखंड कठड्यावरच्या एकाही ठिकाणी वाटलं नाही. आम्ही नुसतेच बसण्याजोगी जागा शोधत त्या कठड्यावरून फिरत होतो बराच वेळ. कोणी म्हणेल, की अरे मरीन ड्राईव्हचा एवढा लांबलचक कठडा, समोर एवढा अथांग समुद्र आणि बसण्याजोगी जागा नाही म्हणतोस?? बसण्याजोगी म्हणजे कठड्यावरची अशी जागा ज्यावर पिंक टाकल्याच्या खुणा नसतील आणि ज्याच्या पुढ्यात, खाली कचरा पडलेला नसेल अशी.

एक आकांत : गाणार्‍याचे पोर

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 01/12/2013 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
एका पेक्षा अनेक लग्न, बहुपत्नीत्व ह्याला उघड मान्यता नसली तरी त्यात फार वावगे नं मानणार्‍या पिढीतील पुढच्या पिढीतील एक तरुण...आपल्या अंगातील असामान्य कलागुणाची नुकतीच ओळख होऊ लागलेली...अत्यंत लहान वयात कमालीचे खडतर दिवस काढून, १२ गावचे पाणी पिऊन आलेली अकाली समज... त्यात स्वतःच्याच मामे बहिणीशी लग्न...

प्रेम-एक काव्यगुण

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 01/12/2013 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाच्या उगमी येथे, सहजी कवित्व झरते जे बोलत जातो मी ही ते ते कवित्व होते जरूरी ना काव्यगुणांची श्वासासम सहजी येते कुणी न करताही तेथे ती-कविता होऊन जाते उस्फूर्तता ही कैशी?, प्रतिभेशी नाही घेणे ते देवाजीच्या घरचे सहजाचे साधे लेणे. कधी हात तिचे दिसतात मज मेहेंदी दिसून येते स्पर्शाची अठवण का ही? मग मनात उरुनी जाते? शरीराचा गंध तसाही मज वेडाऊनच जाई शब्दांचे सरते काम अन कविता केवळ राही प्रेमाच्या गावापाशी मी भिऊनी उभा आहे. आकर्षणी सीमा रेषा हलकीच मधेही आहे. हे नकळत कैसे कोडे ठरवून मनाला पडते? सुटकेची आली वेळ तरी सुटका कोठे घडते???
काव्यरस

हात

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 01/12/2013 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
भीक मागती हात आहे घाम गाळती हात आहे चोर-भामटे हात आहे प्रेमाचा ही हात आहे. सत्य केवळ एक आहे चहुकडे हात आहे. हाताविना न उजळे शेती, धंदा आणि सत्ता हाताची निगा राखा हाताची कृपा भोगा.

सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी

लेखक वैभवकुमारन यांनी रविवार, 01/12/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
धडधडत नाही पहिल्यासारखी हृदयाची नाडी निष्करश्यांची मज आता पडत नाहित कोडी झोपाण्यावर जगण्याच्या नाहीत काळ्या धाडी स्वन्पेही माझ्याशी आता करत नाहीत खोडी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी वाटच साला चुकली ती, पण नाही मनी अढी त्या निखाऱ्याच्या झोतात मी टाकली होती उडी भाजले तंव कळले मजला ते वेळच होती वेडी वाटच साला चुकली म्हणून सोडून दिली होडी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्याची मी गोडी पीकत नाहीत पहिल्यासारख्या काळजात फोडी डोळयाचीही कड सये होत नाही ओली आता दुनिया कशी रंगारंग , नभी सप्तरंगी होळी स्वतःवर प्रेम स्वतःशी , नाही रीकामी झोळी सये शीकलो आहे तुझ्यावाचून जगण्या

आमचे अग्निहोत्र !!!

लेखक विदेशी वचाळ यांनी शनिवार, 30/11/2013 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल गॅस लाच लाइटर असतो ते बरे आहे बुआ. काही दिवसांपूर्वी गॅस चा लाइटर सापडला नाही म्हणून शेजारणीने "सुमे जा ग जरा माझा लाइटर घेऊन ये पर्स मधून" असे फर्मावल्याचे आठवते. त्या पुर्वी, शेजारच्या, निर्मला ताई, त्या एकदा म्हणाल्या होत्या, अरे जरे जरा बाबांचा लाइटर घेऊन म्हणून. त्याचा आधीच्या सगूणा बाई "शिंदळीची काडेपेटी कुठे गेली काही कळत नाय!. ए पोर्‍या बापाची काडेपेटी आणा रे" असे म्हणाल्याचे ऐकिवात आहे. पण त्याचा पूर्वीच्या बायका आग कशी लावत असत बरे? म्हणजे स्वयंपाक करताना हो! (बाकी आग लावायाच्या पद्धती बदलल्या नसाव्यात असे वाटते.

सत्तेवर कोण यायला हवे

लेखक सचीन यांनी शनिवार, 30/11/2013 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले. कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले.