देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे. पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले. अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले.
कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले. त्यांच्या आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अनमोल सहकार्याने देश स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर महात्माजींनी कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असा सल्ला दिला होता. पण देशाला स्वातंत्र्य पर्यंत आणल्यावर असे निर्नायकी अवस्थेत सोडणे चुकीचे होते. कॉंग्रेस जणांनी महात्माजींचा हा सल्ला झुगारला. खुद्द महात्माजींचा सल्ला झुगारून आपल्यात पक्षांतर्गत लोकशाही आहे हे कॉंग्रेस ने सिद्ध केले.
१९४८ साली महात्माजींचा निर्घुण खून करण्यात आला त्यानंतर स्वतंत्र भारतात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवली ती कॉंग्रेसने आज भारतात एकही असे गाव नाही जेथे कॉंग्रेस पक्ष नाही . देशातील सर्वसामान्य, धर्मनिरपेक्ष,गोरगरीब, दलित मागासवर्गीय ह्यांना हा पक्ष आपला वाटतो. आणि कॉंग्रेस च्या नेत्यांनीही ह्या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही. देश आज जो विकासपथावर आहे त्याचे मुख्य कारण कॉंग्रेसने सत्ता जनतेसाठी राबवली. जाती धर्माच्या नावावर कधीही राजकारण केले नाही. सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना.
आता जी २०१४ ची निवडणूक होत आहे त्यात कॉंग्रेस च सत्तेवर येईल ह्यात शंका नाही मात्र दुर्दैर्वाने कॉंग्रेस सत्तेवर आली नाही तर देशाकडे नेतृत्व करण्यासाठी कुठले पर्याय आहेत जे आपल्या नेतृत्वाने देशाला सावरू शकतील. माझ्या मते कॉंग्रेस चे सरकार आले नाही तर तीन नेते असे आहेत ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले तरी देशाचा विकास करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची क्षमता आहे.
त्यातील पहिले नाव आहे शरद पवार साहेबांचे.शरद पवार ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचा आतापर्यंतचा सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगतीपथावर वाटचाल केली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला आणि धडाडीने काम करण्याची क्षमता असलेला नेता. अल्पसंख्यांक, स्त्रिया, शेतकरी ह्यांच्या समस्येची जाण असणारा आणि ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार जर प्रधानमंत्री झाले तर ते भरीव कामगिरी करू शकतात ती क्षमता त्यांच्यात आहे.
दुसरा नेता म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्य मंत्री मायावतीजी. त्यांनी उत्तर प्रदेशात जो सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग करून सत्ता खेचून आणली होती ते आश्चर्यजनक होते. केडर बेस पार्टी म्हणून ब स पा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तसेच देशातील दलित व अल्पसंख्याकामध्ये मायावतीजी ह्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. शतकानु शतके सामाजिक विषमतेखाली पिचणाऱ्या समाजाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्तेवर आणून दाखवणे हे मायावतींचे ऐतिहासिक कर्तुत्व आहे. जर उत्तर प्रदेशात त्यांचा पक्ष ४० जागा पर्यंत मजल मारू शकला तर त्या सत्ता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका अदा करू शकतात.
तिसरा नेता म्हणजे मुलायम सिंग यादव. जयप्रकाश नारायण सारख्या कर्तुत्ववान नेत्याचा मुशीत तयार झालेला कर्तुत्ववान नेता. नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार. ज्यावेळी लोकपाल बिल आणून घटनेचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा मुलायम सिंग आणि लालूप्रसाद यादव हे ह्या बिलाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश विकास करत आहे.
मात्र दुर्दैवाने ह्यांच्या पैकी कोणीही सत्तेवर आले नाही तर मात्र देश निर्नायकी अवस्थेपर्यंत पोहोचण्याची स्तिथी आहे भारताचा दुसरा पाकिस्तान होईल अशी साधार भीती वाटते. आज आपण मोकळ्या वातावरणात राहत आहोत. लोकशाहीचे फायदे उपभोगत आहोत. पण नंतर मात्र पाक, अफगाणिस्थान इथे जशे फतवे निघतात तसे फतव्याचे राजकारण होण्याची शक्यता आहे.
आधुनिक लोकशाहीत मंगळावर स्वारी करणारा आपला देश पुराणकाळात जाण्याची शक्यता वाटते
वाचने
17707
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
---^---
. +1 :) :)
In reply to ---^--- by विद्युत् बालक
खरंच काय हो ?
सचिन राव
स्मायली
:)
In reply to स्मायली by क्लिंटन
पवार जाणते आहेत हो पण ????????????????
मुखवटा
+१
In reply to मुखवटा by सिद्धेश महजन
भ्रष्टाचाराचा एकही आरोप
छान लेख.
हसावे कि रडावे ते कळत नाहीये.
सत्तेवर कोणाला यायला हवे.........??????????
(No subject)
आजचा सवाल- सचीनभौची सेंच्युरी
वटवटवाघुळे
In reply to आजचा सवाल- सचीनभौची सेंच्युरी by जेपी
लेख आवडला
सत्ता येणार ती राहुलजी आणि
तुमच नॉलेज मायनिंग करणारे
In reply to सत्ता येणार ती राहुलजी आणि by ग्रेटथिन्कर
ग्रेटथिंकरांची विनोदबुद्धी
चायला....खुप दिवसांनी अतिशय
कोणी सत्तेवर यावे हे सांगणारे
नाव मुलायम असले तरी
नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगारमित्रानो , आपण एक खेळ खेळूया तुमच्या मता प्रमाणे ह्या लेखातील सर्वात इनोदी विधान सांगा !आम्च्या मताप्रमाने
(No subject)
काँग्रेसशिवाय साधारण ८-१०
फक्त अपवाद संसदेवर झालेला
In reply to काँग्रेसशिवाय साधारण ८-१० by सचीन
ज्जे बात!
In reply to काँग्रेसशिवाय साधारण ८-१० by सचीन
>>> फक्त अपवाद संसदेवर झालेला
In reply to काँग्रेसशिवाय साधारण ८-१० by सचीन
सत्ता येणार ती राहुलजी आणि
छान, काँग्रेसच योग्य पर्याय
In reply to सत्ता येणार ती राहुलजी आणि by सचीन
कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर
>>> कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर
In reply to कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर by सचीन
मला आधी हे सांगा की हा शरद
अॅलर्ट
>>> देशाला कॉंग्रेस शिवाय
गुर्जी साहेब ,
In reply to >>> देशाला कॉंग्रेस शिवाय by श्रीगुरुजी
भाजपच्या सतरंज्या
In reply to गुर्जी साहेब , by विद्युत् बालक
२०१४ मध्येही यांच्या
>>> गेली ११ वर्षे जनता
भाजपच्या काळात रामराज्यच होते
In reply to >>> गेली ११ वर्षे जनता by श्रीगुरुजी
सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने
तुम्ही बालीश प्रश्न विचारू
In reply to सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने by सचीन
आला का लायनीवर ?
In reply to सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने by सचीन
>>> गुरुजी तुमच्या कडेच हे
In reply to सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने by सचीन
कशाला कॉंग्रेसच्या बगल
सध्या शरद पवारची अवस्था एक
डोळे दिपवणारा लेख
शरद पवार हे धर्मनिरपेक्ष
धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते
In reply to शरद पवार हे धर्मनिरपेक्ष by सचीन
धर्मनिरपेक्ष वृतीचे नेतेम्हणजे काय हो? मुस्लिम नेत्यांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी झोडणे कि गल्लीत कोणी विचारेना व दिल्लीत कोणी भिक घालेना म्हणून परत दिल्लीश्वरांचे बूट पोलिश करणे?>>> शरद पवार हे धर्मनिरपेक्ष
In reply to शरद पवार हे धर्मनिरपेक्ष by सचीन
तेरी दिवसाच्या सत्तेसाठी
In reply to शरद पवार हे धर्मनिरपेक्ष by सचीन
कधी वेळ मिळाला तर देशाची
>>> काँगेसच्या राज्यात गेल्या
In reply to कधी वेळ मिळाला तर देशाची by सचीन
बालका धर्मनिरपेक्ष नेता तो
बरोबर, या देशावर मुस्लिम
In reply to बालका धर्मनिरपेक्ष नेता तो by सचीन
मला एकच प्रश्न पडतो आहे~
>>> मला एकच प्रश्न पडतो आहे~
In reply to मला एकच प्रश्न पडतो आहे~ by अत्रुप्त आत्मा
सचिन राव बहुतेक पवारांच्या
In reply to >>> मला एकच प्रश्न पडतो आहे~ by श्रीगुरुजी
सदर लेखन हे ,उपजत बावळटपणा
In reply to >>> मला एकच प्रश्न पडतो आहे~ by श्रीगुरुजी
निशःब्द
तिमा ताई !
In reply to निशःब्द by तिमा
खाली
In reply to तिमा ताई ! by विद्युत् बालक
आजकाल पुरुष असून स्त्रियान
In reply to खाली by तिमा
विद्युत बालक साहेब,
In reply to आजकाल पुरुष असून स्त्रियान by विद्युत् बालक
आयला
In reply to विद्युत बालक साहेब, by बॅटमॅन
तिमा ताई =)) =))
In reply to तिमा ताई ! by विद्युत् बालक
अर्थात अधोगतीच. आणि हे
>>> हा प्रश्न मी बाप्पुना
In reply to अर्थात अधोगतीच. आणि हे by सचीन
शांतीयात्रा काढण्याच्या मुर्ख
In reply to >>> हा प्रश्न मी बाप्पुना by श्रीगुरुजी
टिपर्या!
सन्मानाने मानाचे पागोटे देऊन
काय मुद्दाम करताय का उपजतच
In reply to सन्मानाने मानाचे पागोटे देऊन by सचीन
>>> गुरुजी मेजवानीचे जावून
In reply to सन्मानाने मानाचे पागोटे देऊन by सचीन
नाही गुप्तहेरा सारखी सारी
>>> तुम्ही गुरुजी आम्ही ढ पोर
आयला, सचीन ....72 झाले हं,
यांचे राज्य येणार ...
अंधश्रद्धा!!!!!
एक मात्र खरे
जनता बुद्धू नाहीये कॉंग्रेसने
In reply to एक मात्र खरे by सचिन कुलकर्णी
वाचनमात्र