Skip to main content

भाई नाहीतर भाभी!

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 21/02/2014 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
जातिवंत भ्रष्टाचारी, नराधम, असंस्कृत, गलिच्छ लालूप्रसाद यांनी भ्रष्टाचाराच्या आणि घराणेशाहीच्या कलंकांना एक नवी उंची गाठून दिली यात मला तरी शंका वाटत नाही. स्वतःला तुरुंगात (अर्थात व्ह्यायपी कोठडीत जिथे तुरुंग अधिक्षक स्वतः तंबाखू मळून द्यायचे म्हणतात!) डांबल्यावर न डगमगता आपल्या अर्धांगीला मुख्यमंत्री बनवले. पुण्याचे सुप्रसिद्ध भ्रष्टाचारी सुरेशभाई कलमाडी हेही लोकसभा लढवण्यास उत्सुक आहेत. पण काँग्रेसने त्यांना पक्षातून निलं बित केले आहे. त्यामुळे तसे होणे अवघड वाटते आहे. मग आता त्यांची भार्या मीराभाभी अर्थात पुण्याच्या राबडीदेवी आता इच्छुकांच्या रिंगणात उतरल्या आहेत.

जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १ : संक्षिप्त इतिहास

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 21/02/2014 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== जगप्रसिद्ध प्राचीन हिंदू मंदिरांचा देश, कंबोडिया : १... २... ३... ४... ५... ६... ७...

दिपक कुवैत ह्यांच्या सोबत डोंबिवली कट्टा.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 20/02/2014 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, आधी कळवल्या प्रमाणे, श्री.दिपक कुवैत ह्यांच्या बरोबर कट्टा करायचे ठरले आहे. तारीख मात्र १ मार्च किंवा २ मार्च असेल. बहुदा २ मार्च असलेली बरी , असे मला वाटते. कारण १ मार्चला वल्लींबरोबर घारापुरी लेणी बघीतल्या नंतर त्याच दिवशी कट्टा करण्यापेक्षा दुसरा दिवस असलेला बरा, असे माझे मत आहे. ठिकाण : नंदी पॅलेस खर्च : आपापला (दिपक कुवैत स्पॉन्सर करत असतील, तर फार उत्तम) खाणे-पिणे : सामिष आणि उचित पेयांसकट वेळ : संध्याकाळी ठीक ७:३० (जास्त उशीर केला, तर जागेची मारामार आणि उगाच २/३ तास तिष्ठत बसावे लागते.) चला तर मग, तारीख ठरवा.

तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ????

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 20/02/2014 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
तेलंगणा नंतर स्वतंत्र विदर्भ मागणीस जोर येणार का ???? फेस्बुकावर तर स्वतंत्र विदर्भ मागणीस समर्थन चालू आहे। शिवसेना आणि मनसेने निव्वळ आपली राजकीय गोची होईल म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मितीला विरोध करू नये...मुंबईत बसून गडचिरोलीची समस्या सोडविता येत नाही...असे एक मत आहे तर पूर्वी नेहरूंनी बेरारात घातले, मग अत्रे, डांगे यांनी महाराष्ट्रात घातले परंतु विदर्भातील शेतकर्याची उपेक्षा मात्र थांबली नाही...धरणे झालीत परंतु कालवे, नाही...कापूस विदर्भात आणि सुतगिरण्या मात्र पश्चिम महाराष्ट्रात...नामशेष होत चाललेल्या कापूस आणि संत्रा लागवड क्षेत्राकडे कोणत्या जाणत्या राजाने आजवर लक्ष दिले??

जेव्हा फारुकी हरवतो...

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 20/02/2014 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
फारुकी म्युनशनला एका कॉन्फरन्ससाठी येणार आणि मग पुढे चार दिवस फ्रांकफुर्टात आमच्याकडे मुक्काम करणार असे समजल्यापासून आम्ही फार आनंदलो होतो कारण आता गाणी, किस्से,गप्पागोष्टी ह्यात आमचे चार दिवस मजेत जाणार याची खात्रीच! मुंबापुरीतल्या एका कॉलेजातला हा संख्याशास्त्री पुलंपासून गंगाधर गाडगीळांपर्यंत सगळ्यांवर अधिकारवाणीने बोलतो.. नौशादसाब आणि लता ही त्याची दैवतं.. त्याचबरोबर भाभी पाठवणार असलेल्या मठऱ्या, शक्करपारे, मिठाई यावरही डोळा होताच .. :) फारुकीची यायची तारीख उजाडली. आज संध्याकाळपर्यंत त्याचा म्युनशनहून फोन येईल असा अंदाज होताच आणि फोन वाजला..

म्हणून नथुराम उजवा ठरतो.....

लेखक महेश_कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/02/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात.

येत्या मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने मराठी गायक "अजित कडकडे" यांच्या बद्दल सामुहीक लेखन

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 20/02/2014 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार; माझ्या अलिकडील मिपा वास्तव्यात मिपाकर अमेय यांच्याकडून मराठी विकिपीडियाकरीता विकिमिडिया कॉमन्सवर मराठी गायक अजित कडकडे यांच प्राप्त झालेल छायाचित्र अशात लावल आहे. छायाचित्र लावताना मराठी आणि इंग्रजी दोन्ही विकिपीडियावर अजित कडकडेंबद्दल फारतर एक परिच्छेदभर माहिती आहे अस लक्षात आलं.

(हिवाळ्यातील रात्रीभोजनासाठी ) ओल्या हळदीची लज्जतदार भाजी

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 20/02/2014 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री ८ -९ च्या दरम्यानची वेळ असावी छान भूक असावी पंजाबी डिशेस खूप खाऊन कंटाळा आला आहे आणि मराठी जेवणही खूप दिवसात केल नाही (मीस केलयं) आणि त्यात पंजाबी कुटूंबा सोबत गरमा गरम भाता सोबत पंजाबी कढी मिळावी. ते कढी म्हणत असले तरी थोड्याशा फरकान असतं ते आपल्या कडच पिठलच पण त्याच वेगळेपण म्हणजे त्यातली कांदाभजी. पिठल भात एकत्र करतोय आणि त्यात कांदाभजींचा आस्वाद सहाजपणे मिसळतोय आहा !

सत्ता कूणाची ?

लेखक धर्मराजमुटके यांनी बुधवार, 19/02/2014 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
आताच विविध वर्तमानपत्रांमधे वाचलेल्या बातम्यांवरुन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तीन मारेकऱयांची फाशी रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्यानंतर तामिळनाडू सरकारने या हत्येप्रकरणातील सर्व सात दोषींची सुटका करण्याचा निर्णय घेतला अशी बातमी वाचनात आली. देशाचे माजी पंतप्रधान व त्यावेळचे काँग्रेसचे सर्वोच्च नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा देण्यास काँग्रेसप्रणीत केंद्र सरकार अपयशी ठरली आहे असे स्पष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेस पक्ष आपल्या सर्वोच्च नेत्याला, सोनिया गांधी आपल्या पतीला आणि राहूल गांधी आपल्या पित्याला न्याय मिळावा म्ह्णून काहीही करु शकले नाहित.

...आपुले मरण पाहिले म्या डोळा…....!!!!!!

लेखक विनोद१८ यांनी बुधवार, 19/02/2014 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, नुकताच माझ्या वाचनात दै. लोकसत्ता मधला एक अतिशय सुन्दर असा लेख आला. डॉ. ऋजुता पाटील-कुशलकर यानी आपले जीवघेण्या आजारातील अनुभव कथन केले आहे, त्याचा दर्जा उच्च आहे, विचार करायला लावणारा आहे म्हणुनच मिपावर प्रत्येकाने तो वाचावा असा आग्रह आहे. त्याची लिन्क खाली दिली आहे. http://www.loksatta.com/chaturang-news/the-deathbed-experience-373284/4… तो वाचुन प्रतिक्रिया काय द्यावी हे सुचत नाही, फक्त डॉ.