एका नव्या इतिहासाची सुरुवात -४
पूर्वसूत्र : एका नव्या इतिहासाची सुरुवात -१
एका नव्या इतिहासाची सुरुवात -२
एका नव्या इतिहासाची सुरुवात -३
शांतन्यला अर्थातच सर्व काही सांगणे शक्य नव्हते. सांगूनही त्याचा विश्वास बसला असता का, शंकाच होती.
सात दिवस ! सात दिवसात तयारी करायची होती ! जन्मोजन्मीचा निरोप घ्यायचा होता. तिच्या शोकाला पारावारच नव्हता. आजवर त्याच्या संगतीत घालवलेले अतीव सुखाचे क्षण तिच्या अंतरात, वादळात विखुरलेल्या पानांप्रमाणे भिरभिरत होते.
मिसळपाव