ओल्या काजूगरांची भाजी
मी माहेरची भंडारी.एरवी आठवड्यातून ५ दिवस तरी मासे हवेतच.पण श्रावण सुरु झाला की,सगळ्या देवांचे सप्ते असतात देवळात. ( सप्ते हे सप्ताचे अनेकवचन.सप्ता=साप्ताह.या सात दिवसात अखंड जागरण असते यासाठी प्रत्येक वाडीचे नंबर लागलेले असतात.वेळ ठरवून दिलेली असते.) श्रावणात येणाऱ्या प्रत्येक देवाच्या पहिल्या वारापासून हे सप्ते सुरु होतात.
भैरी म्हणजे कालभैरव.रत्नागिरीतले जागरूक देवस्थान.भैरी हे त्याचे प्रेमाचे नाव.भैरी, शंकर आणि दत्ताचा सप्ता संपेपर्यंत मात्र आमच्या घरी सगळे शिवराक.
मिसळपाव
