Skip to main content

शिर्षकविहीन (शतशब्दकथा) - उत्तरार्ध..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 21/08/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकविहीन.. ************************************************************************************** गळ्यातून उसळणार्‍या रक्ताला कसंबसं थोपवत ती कोसळली. तिच्यावर झुकून अश्रु ढाळणार्‍या त्याच्याकडे बघत गुरगुरली, "आय लव्ह यु टू, नासीर! पण सर्वस्व नव्हता कधीच तू माझं ! सॉरी हनी..." त्याच्या विस्फारत्या डोळ्यांत बघतच तीनं तो सुरा हिसकला, आणि पुर्ण ताकदीनीशी त्याच्या छाताडात खुपसला. पार आतवर शिरला त्याच्या हृद्यात तो घाव.... तिच्यासारखाच ! अंगावर कोसळणार्‍या नासीरला बाजुला ढकलत ती खुरडायला लागली. किचनेमध्ये लपवलेला ट्रान्समिटर ऑन करुन बोलली, "यँकी चार्ली हिअर. टारगेट ब्रिच्ड. क्लिअर टु अटॅक.." अंगातली सगळी शक्ती ओरपून घेत तीनं गॅसची नळी ओढून तोडली. थकल्या डोळ्यांसमोर सगळा इतिहास तरळत असतांनाच तीने लायटरचा खटका दाबला. तिच्या विझत्या नजरेत त्या छुप्या बेसकँपमधला आगडोंब भडकत होता..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10673
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

निव्वळ अप्रतिम

आवडली...

आवडली!

पहिल्या सीक्वल पेक्षा हा सीक्वल मला जास्तं योग्य वाटतोय.

मस्त सिक्वेल चांगलाय पण एखाद्याचा गळा चिरलेला असताना ती एव्हढ सगळ करेल? बाक़ी हां उत्तरार्ध मस्त आहे

+१

+१

+१

मस्तं !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद, डॉक्टरसाहेब.. मी तुमच्या शशकच्या सिक्वलची वाट बघतोय..

+१

+१