Skip to main content

द स्केअरक्रो - भाग ‍२०

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 23/08/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग १९ द स्केअरक्रो भाग २० (मूळ लेखक मायकेल कॉनेली) न्यूजरूममधून बाहेर पडून मी माझ्या गाडीत बसलो, तेव्हा मला जरा बरं वाटलं. एकेकाळी हीच न्यूजरूम सोडून घरी जायलाही मी तयार नसायचो. कधी घरी गेलोच, तर दुसरा दिवस कधी उजाडतोय आणि मी कधी ऑफिसला जातोय असं व्हायचं मला. पण ते दिवस आता इतिहासजमा झाले होते. क्रेमर आणि त्याच्यासारख्या कॉर्पोरेट लांडग्यांनी तिथे उच्छाद मांडला होता. मला तिथून बाहेर पडायलाच हवं होतं. मी सरळ फ्रीवेवर गेलो आणि तिथून समुद्राच्या दिशेने. सगळी वाहतूक यावेळी उलट दिशेला चालली होती.

निरोप

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 23/08/2015 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
थकल्या दोन चरणांवरती हलका झुकला माथा 'सुखी रहा'च्या शब्दांपाशी निरोप अडला साधा! अनुबंधांची कि जन्मांतरीची अशीच असते रेषा परतो, अथवा जावो दिगंता चिवट असते आशा. वाटला तितका सोपा नव्हता वृद्ध अनोळखी धागा जुन्यापान्या झाडांचाच खोल असतो ठिकाणा!

दस रुपय

लेखक सिध्दार्थ यांनी रविवार, 23/08/2015 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्दकथा स्पर्धेत मी देखील एक कथा दिली होती. त्या कथेचा पुढचा भाग शतशब्दकथा रुपात न देता संपूर्ण कथा हिते देत आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> सन 1975 च्या आसपासचा काळ संध्याकाळची ७ वाजेच्या आसपासची वेळ होती. अंधार पडू लागला होता. तिने गुरांना गावाकडे नेण्यास सुरुवात केली.

आशुची राउंड - भाग २ व शेवटचा .

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 23/08/2015 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
आशु मोठ्या खुशीत घरी येउन पोचला व त्याने गाडी पार्क केली .आजची राउंड त्याला चांगलीच फायदेशीर ठरली होती . दुसरया दिवशी कॉलेजला गेल्यावर त्याने आपल्या सर्व मित्रांना कालची घटना मोठ्या रुबाबात वर्णन करुन सांगितली .

आशुची राउंड - भाग १

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 23/08/2015 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
आशु आज भलताच खुशीत होता . नुकतीच त्याच्या बाबांनी एका प्रसिद्ध कंपनीची अलिकडेच लाँच झालेली फोर व्हीलर घेतली होती . आज रविवारचा सुट्टीचा दिवस . त्यामुळे आशुने हट्ट धरला होता 'आज मी नव्या गाडीवरुन एक राउंड मारुन येणार '. अखेर आई बाबांनी त्याला परवानगी दिली. तरीही निघताना आईने त्याला बजावले ' आशु , गाडी जपुन चालव . आणि फार लांब जाउ नकोस'. आशुनेही प्रॉमिस दिले 'हो आई .मी विजय चौकापर्यंत जाउन परत येईन.' आशुच्या कॉलेजमधले बरेच व काही खास क्लासमेटस विजय चौक परिसरात राहात होते. त्यामुळेच आशुने तिकडे जाउन यायचे ठरवले होते . विजय चौकापर्यंत येउन आशुने आता घरी परतण्यासाठी गाडी वळवली.

अवधूत (भाग-१)

लेखक मांत्रिक यांनी रविवार, 23/08/2015 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
शारद पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या दुधाळ प्रकाशाने सारं जग भरून गेलेलं होतं. त्या प्रकाशात तारका मात्र फार क्षीण दिसत होत्या. नेहमीच्या सरावाने त्याची पावले त्या दुधाळ प्रकाशात गडवाटेवर पडत होती. जवळपास ११ वर्षांपासूनचा परिचित रस्ता. कधीही मनात लहर येईल तेव्हा जायचं जगदंबेच्या भेटीला गड चढून. हवेत मंदसा प्रसन्न गारवा. वर्षाकाळात तरारून उगवलेल्या गवताचा आणि रानफुलांचा मादक सुगंध मात्र सगळीकडे दरवळत होता. कधी कुठे तरी एखाद्या चुकार रात्रिंचराची फडफड नाहीतर बाकी सर्व शांत शांत. मागे वळून पाहिलं तर खाली गावात घरोघरी लागलेल्या दिव्यांची नाजुकशी रांगोळी.

नूपुरताईंना पत्र

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 23/08/2015 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
नूपुरताई, नमस्कार. तुम्ही मला ओळखत नसला तरी मी तुम्हाला ओळखतो. मराठी असलात, तरी तुम्ही इंग्रजी वळणाच्या कुटुंबात वाढलेल्या आहात. त्यामुळे माझं हे पत्र -छोटं असलं तरी- वाचताना जरा त्रासच होईल. बरं, इतर कुणाकडून वाचून घेता येण्यासारखंही नाही. कारण तुम्ही जिथं आहात तिथून दूरदूरपर्यंत कुणी मराठी बोलणारा-वाचणारा सापडताना कठीण आहे. पण वाचनाची सवय नसल्यानं होणारा त्रास तुम्हाला फारसा जाणवायचा नाही. कारण ज्या क्रूर अग्निदिव्यातून तुम्ही जाताय, त्यापुढे हे सर्व क्षुल्लक आहे. तुम्हाला गेल्या सात-आठ वर्षांपासून ओळखत असलो, तरी पत्र लिहावं असं मात्र आजच वाटलं.

[शतशब्दकथा स्पर्धा] वन नाईट इन द ट्रेन - उत्तरार्ध

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 22/08/2015 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध ती चमकून वळली. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तिला खुदकन हसू आलं. तिनं खुलासा करताच तोही हसू लागला. त्यानंतरच्या तासाभरात ती दोघं नक्की काय बोलली कोण जाणे पण आयुष्यात प्रथमच ती इतकी मोकळी होत होती. स्टेशनवर उतरून थॅन्क्स म्हणून ती वळणार इतक्यात … " जस्ट इन केस " म्हणत कुठल्याशा कार्डवर त्यानं नंबर लिहून दिला आणि ट्रेन सुटलीच. झालं ते इतकंच. कधीतरी खूप उदास एकटं वाटतं, कधी माणुसकीवरचा विश्वास डळमळतो तेव्हा रेशमी साड्यांच्या बासनात जपून ठेवलेलं एक कार्ड मी काढते.

मांझी- द माऊण्टन मॅन

लेखक बाप्पू यांनी शनिवार, 22/08/2015 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसानंतर चित्रपट गृहात एखादा चित्रपट पाहण्याचा योग आला. आणि खूप दिवसांनी एक दर्जेदार चित्रपट पाहिल्याचे समाधान देखील मिळाले. चित्रपट होता मांझी- द माऊण्टन मॅन Manzi चित्रपट सुरु होतो.. आणि पहिल्या मिनटालाच कळते कि हि एका गरीब माणसाची आणि अजस्त्र अश्या डोंगराची लढाई आहे. १९६० च्या आसपास या बिहार मधील गेहेलोर गावामध्ये दशरथ मांझी नावाचा एक युवक एका डोंगराशी एकटा लढू लागतो. ते हि फक्त हातोडी आणि छनी च्या सहाय्याने.

आठवन

लेखक सुमित_सौन्देकर यांनी शनिवार, 22/08/2015 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुरु होऊदे अबोल गोष्टी पुन्हा येऊदे जुना शहारा हळू चोरट्या नजरे मागुन पुन्हा करावा कुणी पहारा पुन्हा येऊदे रात्र बिलोरी स्वप्नाला जी साद घालते पुन्हा वाटूदे शणास मजला कुणी पाहूनी मला भाळते पुन्हा हाथ या हाथि यावा पुन्हा साथीने रात्र सरावी कुणी मिटोनि हळूच डोळे मुक्या मिठिची आस धरावि