मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आशुची राउंड - भाग २ व शेवटचा .

सिरुसेरि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आशु मोठ्या खुशीत घरी येउन पोचला व त्याने गाडी पार्क केली .आजची राउंड त्याला चांगलीच फायदेशीर ठरली होती . दुसरया दिवशी कॉलेजला गेल्यावर त्याने आपल्या सर्व मित्रांना कालची घटना मोठ्या रुबाबात वर्णन करुन सांगितली . मित्रांनीही मग त्याला गोड बोलून आणखी हरभरयाच्या झाडावर चढवले . ' काय राव , आधीच नविन गाडी , त्यात , तु तर आता सरांचा खास आदमी झाला कि बे' 'आता काय सबमिशन , टर्म वर्क सगळीकडे एकदम जोर आहे गडयाचा , काटाच किर्रर ' 'अबे, जरा आपल्या गरीब दोस्तांना चहा पाणी तर दे , काढ कुट्टा ' अशा रितीने सर्वांनी आपली त्या दिवसाची चहा नाश्त्याची सोय करून घेतली . पुढे दोन दिवसांनी आशुच्या वर्गाचे मंथली सबमिशन होते . यांमध्ये मागच्या महिन्यात झालेल्या ४ प्रॅक्टिकलसचे रिपोर्टस देशमुख सर तपासणार होते . आशु एकदम निवांत होता . त्याचे रिपोर्टसही तयार होते व तो आता सरांचा खास विद्यार्थी होता . त्यामुळे तो आरामात आपला नंबर येण्याची वाट पाहत होता . 'आपुन तो सरका खासमखास है . अपनेको क्या डर' हे त्याचे आपल्या मित्रांना ऐकवून झाले होते . त्याचा नंबर आल्यावर तो आपली रिपोर्टसची फाईल घेउन हसतमुख चेहरयाने देशमुख सरांच्या केबिनमध्ये शिरला . दहा मिनीटांनी आशु चिमणीएवढे तोंड करुन बाहेर आला . त्याचा चेहरा चांगलाच उतरला होता . देशमुख सरांनी त्याच्या ४ ही रिपोर्टसमध्ये ढिगभर चुका काढल्या होत्या . व ४ ही रिपोर्टसना रिपीटचा शेरा देउन सात दिवसांत ते ४ ही रिपोर्टस नव्याने सबमिट करण्याची तंबीही दिली होती . हा सर्व प्रकार कळल्यावर त्याच्या मित्रांना आतुन आनंदाच्या उकळ्या फुटल्या . पण वरकरणी हसु दाबत ते आशुला धीर देउ लागले . 'अरे अजुन सात दिवस आहेत ना , मग डरतो कशाला ' '२ नाईट मार यार , होउन जाईल सगळं .लढ बाप्पु' . हे त्यांचे धीराचे बोल व सल्ले ऐकताना आशुच्या मनात मात्र एकच विचार राहुन राहुन येत होता . ' च्यामारी , आपल्याला रविवारची राउंड चांगलीच महागात पडली तर ' . -- कथा व भाग २ समाप्त .

वाचने 4221 वाचनखूण प्रतिक्रिया 8

अशोक पतिल 23/08/2015 - 17:56
कॉलेज चे दिवस आठ्वले . छान लिहलेय .

सिरुसेरि 23/08/2015 - 19:30
बरोबर! थोडक्यात गोडी .

आशु जोग 23/08/2015 - 20:29
बर बर

सिरुसेरि 23/08/2015 - 21:11
सुचना - या कथेतील आशु व इतर पात्रे काल्पनीक असुन त्यांचा 'आशु जोग' यांच्याशी काहीही संबध नाही . असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा .