Skip to main content

आवर्त

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/09/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चरचरीत पंज्याला सुखावणारा तुझा चिमुकला मऊसूत तळवा तुला भान देखील नाही बोचऱ्या स्पर्शाचे गाढ झोपेत मंद हसरा तुझा चेहरा इकडे प्रेम आणि तिकडे आधार यांच्या आश्वासक सोबतीत विसावलाय, दिवसभराचे उनाडणे विसरून तुझ्या निर्व्याज निजेची गुंगी मलाही चढू लागली आहे हळूहळू खूप वर्षापूर्वी माझ्या शेजारी अशीच होती शांत निजलेली दोन छोटी पाउले. मला टक्क जागे ठेवून माझी शर्यत सुरू झाली होती त्यांना जिंकविण्याची ती कोमल पाउले, हजारो मैलांचा प्रवास समोर होता त्यांच्या त्यांना बळ देऊ शकणार कां मी? दिशा कशी दाखविणार? कुठे भरकटणार नाहीत नां ती? बिन उत्तराचे प्रश्न पांघरून मी तळमळत, चिमुकली दोन पाउले अ
काव्यरस

रंगल्या रात्री अश्या

लेखक भैड्या यांनी रविवार, 13/09/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
रंगल्या रात्री अश्या गोलघुमट टक्कल जश्या तो विजेचा खांब तरर्राट उभा असा या सडकेच्या तोंडावरती देऊन टाक भसाभसा दुरून पहा ते कुत्रे सांडांच्या खांद्यावरचे लावलाय लळा तु त्यास आज असा कसा? बुंगाट ढेकर देऊन ऊठ त्या पानावरुन घेऊन जा घागरी अनं हलव तो हापसा आम्ही सुर्याची लेकरे कोवळ्या ऊन्हात निपजितो अन घेऊन या घागरी आज सकाळीच हापसितो दे दे मला तो बंजरखंड मशेरी त्यावर मी भाजितो आज सकाळी टकलावर हात मी फिरवितो

चला अंताक्षरी खेळूया....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 13/09/2015 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
जुनाच पण सदाबहार खेळ !! इच्छुकांनी सहभागी व्हावे...... मेरे मेहबूब कयामत होगी.... आज रुसवा तेरी गलियोमे मोहब्बत होगी... मे री न ज रे तो गि ला क र ती है.... तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी.... पुढचे अक्षर "ग"....
काव्यरस

लखलाभ!

लेखक रातराणी यांनी रविवार, 13/09/2015 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
तू ये वाचली आणि त्यातला आव्हानाचा टोन भयंकर आवडला. त्यात आज आमच्या राशीत जिलबी पाडू योग आलेला दिसत असल्याने आम्ही लगेच वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. चू. भू. द्या. घ्या. रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय, आणि जर तरच्या लाटांवर हेलकावे खाणारी तुझी नौका, तुझा किनारा असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे! माझी नौका तारून न्यायला क्षितीजाच्याही पार! पेन्सील वापरायची तुझी जुनी सवय, कारण झालेल्या चुका खोडता येतात, बरोबर उत्तर लिहण्यासाठी तुझी कोरी वही असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे!
काव्यरस

शिंदळ : आक्रमकांची नवी फळी

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 13/09/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
( १.यल्लम्माच्या आवारातल्या कथा आता 'शिंदळ' याच नावानं टंकत जाईन, प्रत्येक कथा स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न असेल, अर्थात वाचकांना आवडले तरचं, उगाच मिपाची बँडविड्थ खर्ची नको- आभार २. केवळ एक पार्श्वभुमी म्हणुन 'शिंदळ' ही कथा वाचा. www.misalpav.com/node/32762 ) शिंदळ : आक्रमकांची नवी फळी यल्लम्माचं देऊळ गर्द अंधारात उभं होतं. देवळाच्या चहुबाजुंनी प्रदक्षिणेसाठी कठडा होता. देवळासारखाच लहान. त्यावरच दत्ता पहुडला होता. देवीची ओवाळणी लुटणारे इतर लहानगे चोर कधीच घरी परतले होते.

चाय पे चर्चा/ आवळ्याचे तेल देशी/ विदेशी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 13/09/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली. चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली.

खुलेआम अफ़गाण जलेबी धागा- आपला आवडता स्तंभ कोणता ?

लेखक मारवा यांनी रविवार, 13/09/2015 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
जलेबी धागा हि अतिशय उपयुक्त संकल्पना आहे. जलेबी खाणे जलेबी पाडणे या अत्यंत मधुर गोष्टी आहेत. या गोड उपक्रमाला जाहिर व जोरदार पाठींबा म्हणुन मी हा धागा काढत आहे. तसा प्रत्येक धागा हि जलेबी च असते असे माझे मत आहे. तर यात लपवाछपवी कशाला उगाच ? म्हणुन मी आज सर्व जलेबी धागालेखकांना विनंती करतो की त्यांनी उजळ माथ्याने समाजात वावरल पाहिजे, जलेबी चा प्रचार प्रसार हा झालाच पाहीजे.

CDC सुपर संगणकाची माहिती थोड्याशा तपशिलात

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/09/2015 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
CDC-3600 संगणकाच्या तंत्रज्ञानासंबंधी माहिती अगदी तपशीलवार देता येईल, पण तपशीलवार माहिती क्लिष्ट असल्याने ती वाचण्यात ज्यांना स्वारस्य नसेल, त्यांना लक्षात घेऊन सर्वांनाच माहिती वाचायला रोचक होईल असं लिहिण्याचा मी प्रयत्न करीन. CDC-3600 ह्या मूलभूत सिस्टीममधे मध्यवर्ती प्रोसेसर, input/output चॅनल, मॅग्नॅटिक कोर स्टोअरेज, कन्सोल, टेप युनिट्स, कार्ड रिडर आणि प्रिंटर ह्या गोष्टी आहेत. संगणकाचं एकूण काम ह्या गोष्टीचा वापर करून होतं. मॅग्नेटिक कोर मेमरी आणि स्टोअरेज कॅबिनेट्स. कोर मेमरीमधे ३२ हजार वर्ड्स (३२,७६८ वर्ड्स) स्टोअर करता येतात.

(तुझे पाशवी बोलणे ते अवेळी)

लेखक चतुरंग यांनी रविवार, 13/09/2015 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल कुलकर्णींची सुरेख गजल 'तुझे मजवरी भाळणे ते अवेळी वाचली आणि लगोलग वेगळ्याच अवेळा आठवल्या. सादर आहे ... ;) तुझे पाशवी बोलणे ते अवेळी तुझे चक्रमी हासणे ते अवेळी जसे नासिकेचे अकाली बरसणे तुझे काहिही बरळणे ते अवेळी लपे 'चंद्र' केसांमध्ये तातडीने तुझे वीग शाकारणे ते अवेळी नको आप्त, वीकांत हा फक्त माझा तुझे तात का 'बैसणे' ते अवेळी? नको स्वर्ग, मी कुंभिपाकीच जातो तुझे रातचे घोरणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे हालती पाळणे ते अवेळी!! 'लगावली' : अगागा अगागा अगागा अगागा वृत्त : भुजंगप्रपात -चतुरंग
काव्यरस