सोबत ... : अंतीम भाग
थांब सुन्या.....! मी तुझ्याशी थोडं खोटं बोललोय ! मी तुला इथे वाघ बघायला नाही आणलय. इथे येण्याचं कारण काही वेगळं आहे. खरेतर मला कुणाचीतरी सोबत हवी होती कारण इथे एकट्याने यायची माझी हिंमत नव्हती, माझ्याकडे तेवढे धाडस नव्हते."
सोबत भाग १
आता पुढे ...
******************
पक्या नरमाईच्या सुरात बोलला. तसा सुन्या थबकला....
"पॅक्स, आर यु क्रेझी? एकतर गेले दोन दिवस सॉरी दोन दिवस आणि एक रात्र मी तुझ्याबरोबर इथे सडतोय तो फडतुस वाघ बघण्यासाठी. साल्या काल शुक्रवार, २२ तारीख ना, बिप्सची नवीन मुव्ही रिलीज होणार होती. तुझ्यामुळे मी माझा फर्स्ट डे.
मिसळपाव