जाळं
रात्रीचे दोन तरी वाजले असतील. मला अजूनही झोप येत नव्हती. हातात पुस्तक घेऊन मी उगाच पानं चाळत होतो. खिडकी उघडीच होती. झोप येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.
तितक्यात एक पाकोळी फडफडत आली. माझ्या डोळ्यांसमोर एक क्षणभर फडफडून ती खोलीभर फिरू लागली. तिचा रंग, त्यावरचे ठिपके फारच आकर्षक होते. मी मजेने तिच्याकडे पाहू लागलो.
पण हा आनंद क्षणिक होता. काही वेळातच ती पाकोळी एका कोळ्याच्या जाळ्यात अडकली. पाकोळीने सुटण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु केला. तिची तडफड, तो शेवटचा संघर्ष पाहून माझे मन हेलावले. मी पटकन उठून तिचे पंख अलगद पकडले, तिला जाळ्यातून सोडवून, बाहेर सोडून दिले.
मिसळपाव