Skip to main content

शी क्षण

लेखक vcdatrange
Published on बुधवार, 13/07/2016
आज पुन्हा भंडारदरा परिसरात भटकंती होती. पाऊस पडतोय छान... ओलावा जसा मुरायला लागला, तसा एका शाळेत शिरलो.. जि. प. शाळा, सहा वर्गखोल्यांसाठी पाच इमारत. त्यातल्या दोन वापरण्यास अयोग्य अशा अवस्थेतल्या. शाळेला शिक्षक चार, एका शिक्षिकेची गाडी चुकल्यामुळे त्या थोड्याश्या उशिरा येणार होत्या.(खिक) मुख्याध्यापक मिटिंगसाठी केंद्र शाळेत गेलेले उर्वरित दोघे मग सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवुन सामाजिक सलोखा अनुभवत होते.. शाळेला वेगवेगळ्या चार पद्धतीची स्वच्छता गृह आहेत. एकदम लेटेस्ट असलेले तयार (Prefabricated) बहुतेक अजुन निर्माण अवस्थेत असावे कारण सांगाडा उभा ठेवलाय पण पाइप जोडणी झालेली नाही. एका युनिटचा दरवाजा अजुन बसायचाय ( पोपट मेला नाही,त्याची मान कललीय. दरवाजा तुटुन गेला असं मी अजिबात म्हणणार नाही) अन विदेशी पद्धतीचे शैाचालय असल्यामुळे पाण्याची आवश्यकता नाही, म्हणुन विनाकारण व्यवस्था देखिल नाही.. शाळेत लाईट आहे पण सध्या आॅफिस पुरतीच मर्यादित आहे. वर्गखोल्यांमध्ये स्विचबोर्ड बसवुन झालेत, वायरिंग मात्र बाकी आहे. ही मुले कदाचित फोटोफोबिक असावित असे वाटल्याने त्यांच्या भल्यासाठीच थोडासा अंधारच रहावा वर्गात अशी योजना असावी. आता शैक्षणिक दर्जाच्या मुल्यमापनाचा प्रमाद हातुन घडु नये म्हणुन काढता पाय घेतला, पण एव्हाणा निर्माण झालेली ऊब अनुदानित आश्रमशाळेकडे घेवुन गेली.. प्रयोगशाळेच्या नावाखाली एकमेव मायक्रोस्कोप आणि रद्दीच्या गठ्यामागचा कॅाम्प्युटर अन् उघड्या ओल्यागार फरशीवर दिवसभर बसुन शी क्षण सहन करणा-या माझ्या चिल्यापिल्याच्या शारीरिक छळवणुकीच्या प्रत्यक्ष देखाव्याने पुरती हौस फिटली... बाकी अपु-या प्रकाशाने होणारी नजरेची हानि, वैयक्तिक स्वच्छता सांभाळणारी आरोग्ययंत्रणा यांची चिवतायगिरी पुन्हा कधीतरी........
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3396
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

:(

जि.प. शाळांची अवस्था खरोखर शोचनीय आहे...

:(

एकुण बजेटच्या १५ ते २०% रक्कम ही शिक्षणावर खर्च केली जाते आणि तरी देखिल शाळांची / शिक्षणाची अशी दुरावस्था पाहिली की संताप होतो. हे कधितरी थांबलेच पाहिजे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अगदी चिरफाड करून लक्तरे टांगणारा हेरंब कुलकर्णींचा लेख आला होता किस्त्रीम की माणूस च्या दिवाळी अंकात साधारण २०१३/१४ असावे. शाळेविषयी अनाक्र्षण आणि दडपण रहावे अशीच शाळेची व्यवस्था (दुर्गम भागात तर नक्की असते) अधाशी उदय प्रमाणे यात थेट काम करणार्या संस्थेबद्दल कुणाला माहीत असल्यास याच धाग्यात कळवावे. धन्यवाद

आपली स्वतःची मुलं जेव्हा एका चांगल्या शाळेत शिकत असतात आणि त्याशिवायही आपण अतिशय सतर्कतेने सतत बघत असतो की त्यांना शाळेत योग्य सोयी/सुविधा मिळते आहे ना, त्यांची निट काळजी घेतली जातेय ना. पण त्याचवेळी अश्या जि.प. शाळेत शिकणार्‍या मुलांबद्दल वाचलं/पाहिलं की सुचेनासं होतं. बाकी सोयी/सुवधी गेल्या तेल लावत पण :
उघड्या ओल्यागार फरशीवर दिवसभर बसुन शी क्षण सहन करणा-या माझ्या चिल्यापिल्याच्या शारीरिक छळवणुकीच्या प्रत्यक्ष देखाव्याने पुरती हौस फिटली
असं काही वाचलं की बैचेन होतं मन. निदान एक सतरंजी मिळावी बसायला मुलांना ही एक साधी आणि प्राथमिक गरज आहे. पण काय करणार आणि काही करायचं म्हटलं तर कुठे कुठे पुरणार आपण, अर्थात त्यामुळे काहीच करायचं नाही आणि केवळ बेचैन व्हायचं असंही नाही. अश्या कुठल्या सामजिक संस्थांचा भाग व्हायला नक्कीच आवडेल जिथे ह्या सुविधांसाठी काम केलं जातं.

अश्या कुठल्या सामजिक संस्थांचा भाग व्हायला नक्कीच आवडेल जिथे ह्या सुविधांसाठी काम केलं जातं. जिथे वस्तूंच्या स्वरूपात मदत केली jate

माझी मैत्रिण झेड पी च्या शाळेत शिक्षिका आहे तिने सान्गितले की शासनाने सान्गितलय की तुम्ही गावकर्‍यान्कडुन निधी उभारुन शौचालय बान्धुन घ्या. शासनाकडुन मुलाच्या गणवेषाला ३५ ₹ तर मुलीच्या गणवेषाला ५३₹ मिळतात कापड घेउन गावकर्‍यान्च्या मदतीने शिवुन घ्यायचे. काय होणारे यात ??

:(

In reply to by मितभाषी

हो. गावाचं नाव लिहावे. तसेच.. जि प शाळांची दुसरी चांगली बाजूही आहे. काही शाळा भणंग असतील तर काही शाळा इन्टरनॅशनलच्या तोंडात मारतील अशाही आहेत याची कल्पना असू द्यावी. सगळेच काही संपलेले नाही तर सुधारणेच्या दिशेने वेगात निघालेले जागोजागी रोज पाहत आहे.

:(

वाईट आहे! लेखन उत्तम! अतिशय आवडले! Sandy