सर्वत्र काळोख पसरलेला होता पाऊलं कुठल्या दिशेनं पडत होती याचाही संदर्भ लागत नव्हता मी भ्रमिष्टा अवस्थेत चालत होतो, मला मन आहे विचारशक्ती आहे याचं भानचं नव्हतं! गत आयुष्यातील घटनांचा आढावा घेतांना खरचं वाटतं नव्हतं आपण इतकं काही भोगलय पण आता त्या आठवणी सुध्दा सोबत सोडतील, कळलच नाही चालता चालता घरा पर्यंत येऊन पोहोचलो मी घरात आलो बाजारातुन घेतलेलं सामानं घेतलं आई आणि भाऊ झोपलेले होते मी त्यांना अखेरचं डोळे भरुन पाहिलं आणि मागच्या पाईपने अवनीच्या रुममध्ये प्रवेश केला ती माझीच वाट पाहात होती मी आत आलो, तीने माझा धरुन मला गणपतीच्या मुर्ती जवळ आणलं आणि म्हणाली आपण यांच्याच साक्षीनं लग्न करु! मी मंगळसुत्र तीला घातलं नंतर कुंकू लावलं कारण काही क्षणांसाठी का होईना आम्हांला एकमेकांच व्हायचं होतं आणि त्यावर लग्न हाच पर्याय होता कारण लग्नानंतरची स्वप्न पुर्ण करायला आम्ही जिवंत नसू आणि जिवंत राहिलो तरी हा समाज आमची कुटुंब आम्हांला जगू नाही देणार, मी अवनीच्या हातात विषाची बाटली दिली,तीने विषन्न मनाने पाण्याच्या ग्लासात बाटली रिकामी केली, दोघांनी पाण्याचा ग्लास हातात घेऊन एका दमात प्यालो....! 'हातात हात गुंफले गेले' आम्ही दोघेही जिव सोडून ही ईहलोकातील वस्त्रे त्यागुन अनंतात विलीन झालो! आम्ही निघुन गेलो, खूप दूर! जिथे आम्हाला प्रेम करण्यापासुन कोणिचं नाही थांबवणार ह्या निर्दयी जगात आमच्या सारखे कित्येक जिवआत्महत्या करतात फक्त प्रेमाखातर....
वाचने
3739
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचक वर्ग आमच्यावर रुसलेला
भाग्यश्री ,
तेच म्हणतोय नको त्या धाग्यावर
छान लिहिलंय भाग्यश्री
तुमच्या प्रोत्साहनाबद्दल
पिच्चर
काय लिहिलंय!
सर्व भाग वाचा की, मग कळेल....
सर्व भाग वाचलेत. छान लिहिले