Skip to main content

जिना यहा मरना यहा....

लेखक चिनार यांनी शनिवार, 06/08/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
राम्याचा दिनक्रम तसा ठरलेला होता. सकाळी उजाडण्याआधी उठायचं. आवरून झाल्यावर, अंबादेवी संस्थानाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडायचे, हळूहळू इतर कक्ष उघडायचे. मग मंदिराचा पूर्ण परिसर, सर्व कक्ष,सभामंडप,महाप्रसादाचा कक्ष,गाभाऱ्यासमोरचे प्रार्थनाकक्ष झाडून स्वच्छ करायचे. भक्तांसाठी लागणारे पाणी भरून ठेवायचे, देवीच्या गाभाऱ्यात लागणारे पाणी आवारातल्या विहिरीतून शेंदून ठेवायचे. गाभाऱ्यातील साफसफाई त्याला सांगितली तरच तो करायचा. गाभाऱ्यात स्वतःहुन तो कधीही जात नव्हता. अर्थात त्याच्यावर असे कोणतेही बंधन नव्हते. पण गाभाऱ्यात जाताना नेहमीच त्याला एक अनामिक भीती वाटायची.

हरवलेलं विश्व (भाग २)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 06/08/2016 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
होणा-या अनाऊन्समेंटमुळे जयूची झोपमोड झाली. विमान कैरो विमानतळावर उतरत होते. जाग आल्यावर क्षणभरासाठी जयु गोंधळली आणि मग एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यावर तिच्या चेहे-यावर मंद स्मित तरळल. आयुष्यात पहिल्यांदाच ती अशी पूर्णपणे एकटी बाहेर पडली होती. आणि ते ही परदेशात. ती सुशुक्षित होती त्यामुळे ती एकटी फिरू शकेल याचा तिला आत्मविश्वास होता... आणि म्हणूनच ती स्वतःवरच खूप खुश होती. विमानातून उतरून तिने स्वतःचं सामान ताब्यात घेतल आणि बाहेर आली. तिच्यासाठी तिथे एक स्पेशल टॅक्सी उभीच होती. साधारण सकाळचे 8/8.30 झाले होते. पण वातावरण चांगलच तापायला लागल होत.

चंद्र चांदण्या समुद्र पाऊस

लेखक रातराणी यांनी शनिवार, 06/08/2016 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र चांदण्या समुद्र पाऊस सगळ्या कविता झाल्या करून मग पाटी कोरी केली आणि खूप वाट पाहिली पण काहीच सुचेना मग एक चंद्र काढला आभाळासारख्या पाटीवर उठून दिसला मग त्याला सोबत म्हणून चार चांदण्या भरतीच्या लाटा आदळल्या खडकांवर मग लगोलग पाऊसही बरसला ओलेत्या वाळूत तुझं नावही लिहिलं तुला आवडतात म्हणून सगळ्यांना आणलं होतं सोबत चंद्र चांदण्या समुद्र पाऊस पण नेमकी तू आली नाहीस तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला एवढंचं कळवलंस मी त्या मेंदीत चंद्र असेल का? चांदण्या असतील का? समुद्राच्या लाटांसारखी नक्षी असेल का? तुझ्या डोळ्यातल्या पावसाने मेंदी ओलीचं राहिली का?
काव्यरस

एक ओपन व्यथा ८

लेखक वटवट यांनी शनिवार, 06/08/2016 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054 एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086 एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148 एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475 एक ओपन व्यथा ५ - http://www.misalpav.com/node/36610 एक ओपन व्यथा ६ - http://www.misalpav.com/node

एक आगळीवेगळी मुलाकात - डास राणी सोबत

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/08/2016 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ५.८.२०१६ रात्रीचे दहा वाजले होते. रियो ऑलम्पिकचा उद्घाटन समारोह उद्या सकाळी चार वाजता आहे, म्हंटले जरा लवकर झोपावे. पण माझ्या मनात एक तर नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अचानक वीज गेली. आमचे इमानदार सत्यवादी मुख्यमंत्री म्हणतात दिल्लीत विजेची कमतरता नाही. पण जो पर्यंत नमो प्रधानमंत्री आहे, दिल्लीची जनता चैनीत झोपू हि शकणार नाही. नमोच्या इशार्यावर BSESवाले अशी बदमाशी करतात. आपल्या इमानदार माणसाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवलाच पाहिचे. वीज गेली. पंखा हि बंद झाला. इमरजेन्सी लाईट लाऊन वीज येण्याची वाट पाहू लागलो. एक तर पावसाळी महिना आणि त्यात भरपूर उमस. सौ.

कठोपनिषद (१)

लेखक शरद यांनी शनिवार, 06/08/2016 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

जिगसॉ पझल्स

लेखक avyakta यांनी शनिवार, 06/08/2016 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपावर लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न!! जरा वेगळा विषय असावा असं वाटलं म्हणून हा जिगसॉ पझल्सचा विषय निवडला आहे, तो कसा वाटला ते नक्की सांगा. मी माझ्या मुलीला ती ७-८ वर्षांची असल्यापासून जिगसॉ पझल्स पूर्ण करायची सवय लावली आहे. आता ती १४ वर्षांची आहे, आत्तापर्यंत आम्ही ५०० पिसेस ची ४, ७५० पिसेस ची २ व १००० पिसेसचे एक पझल पूर्ण केली आहेत. जिगसॉ पझल्सपासून काय शिकता येईल हे दर्शविणारे स्फुट..अर्थात मूळ इंग्रजीतून..

माझ्या आंतर जालीय इ-नामकरण विधीचे इमंत्रण

लेखक लीना कनाटा यांनी शनिवार, 06/08/2016 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आमच्या येथे श्री मिपा क्रुपेने.......... बरेच वर्ष मिपावर वाचन मात्र राहिल्यानंतर हळूहळू अंगात लेखकूचा संचार व्हायला लागला आणि मिपाचे सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला. हे म्हणजे काठावर बसून पाण्यात मौजमजा व दंगामस्ती करणाऱ्यांकडे बघून शेवटी भोपळा बांधून पाण्यात उडी घेण्यासारखेच होते. विचार केला, थोडे हात पाय मारून ...... आपलं. ...... कळफलक बडवून तर बघू जमतंय का. आणि काही मदत लागलीच तर तुमच्या सारखे सुहृद मिपाकर आहेतच मदतीला, तरंगायला नक्कीच मदत करतील, किमान बुडू तर देणार नाहीत. मग निर्णय पक्का झाला. परंतु तत्पूर्वी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे गरजेचे होते.

बेधुंद (भाग - १४ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 06/08/2016 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
(बऱ्याच दिवसानंतर ... ! मलाच माहित नाही की हा भाग टाकायला एवढा उशीर का लागला ? ) धन्यवाद - एखादे पुस्तक वाचतोय/ वाचतेय असे वाटतेय अशा संदेशाबद्दल ! तरीही ' मिपा ' वर असल्याने ह्या भागाच्या आधुनिक शॉर्ट 'हिंग्लिश' ने होणाऱ्या शेवटामुळे ( अती ) शहाण्यांच्या प्रतिकियासाठी शुभेच्छा ! ) ............. नित्याशी बोलणं झाल्यावर आंधळ्या मनानं , अक्षा सरळ बसमध्ये बसला अन घरी आला ! घरी आल्याने आई खुश होती अन सहजकीचं त्याच्या आवडीचे जेवण बनवले होते .

क्षण...

लेखक राघव यांनी शुक्रवार, 05/08/2016 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण कोवळ्या उन्हाचा लेवून नीळकंठी.. अवकाश व्यापणारी दृष्टी कुठून येते? जन्मांत गांठ जुळण्या क्षणमात्रही पुरेसा.. मग रुक्ष भावनांची गर्दी कुठून येते? स्वप्नांस जागवी जो.. क्षण तोच अंतरंगी निमिषात सर्वव्यापी ऊर्मी कुठून येते? अवशेष संस्कृतीचे दिसतात जागजागी.. क्षणात शेवटाची प्रगती कुठून येते? -- एका क्षणात सारे लाघव्य संपलेले.. शब्दांस धार माझ्या इतकी कुठून येते? राघव