जिगसॉ पझल्स

avyakta जनातलं, मनातलं
नमस्कार, मिपावर लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न!! जरा वेगळा विषय असावा असं वाटलं म्हणून हा जिगसॉ पझल्सचा विषय निवडला आहे, तो कसा वाटला ते नक्की सांगा. मी माझ्या मुलीला ती ७-८ वर्षांची असल्यापासून जिगसॉ पझल्स पूर्ण करायची सवय लावली आहे. आता ती १४ वर्षांची आहे, आत्तापर्यंत आम्ही ५०० पिसेस ची ४, ७५० पिसेस ची २ व १००० पिसेसचे एक पझल पूर्ण केली आहेत. जिगसॉ पझल्सपासून काय शिकता येईल हे दर्शविणारे स्फुट..अर्थात मूळ इंग्रजीतून.. Here is what I found written by Jacquie Sewell that sums up our thinking about jigsaw puzzles, Everything I needed to know about life I learned from a jigsaw puzzle! 1. Don’t force a fit. If something is meant to be, it will come together naturally. 2. When things aren’t going so well, take a break. Everything will look different when you return. 3. Be sure to look at the big picture. Getting hung up on the little pieces only leads to frustration. 4. Perseverance pays off. Every important puzzle went together bit by bit, piece by piece. 5. When one spot stops working, move to another. But be sure to come back later (see #4). 6. The creator of the puzzle gave you the picture as a guidebook. 7. Variety is the spice of life. It’s the different colors and patterns that make the puzzle interesting. 8. Working together with friends and family makes any task fun. 9. Establish the border first. Boundaries give a sense of security and order. 10. Don’t be afraid to try different combinations. Some matches are surprising. 11. Take time often to celebrate your successes (even little ones). 12. Anything worth doing takes time and effort. A great puzzle can’t be rushed. 13. When you finally reach the last piece, don’t be sad. Rejoice in the masterpiece you’ve made and enjoy a well-deserved rest. शेवटी आम्ही पुर्ण केलेल्या काही पझल्स चे फोटो. Neuchwanstein Castle - 500 pieces Neuchwanstein Castle - 500 पीएससी Vatican City - Italy - 500 Pieces Vatican City - Italy - 500 pieces San Francisco cable cars San Francisco cable cars - 500 Pieces Times Square New York Times Square New York - 500 Pieces Niagara Falls, USA Niagara Falls, USA - 750 Pieces Old Mills, Little Rock Old Mills, Little Rock - 750 Pieces Mykano Island, Greece Mykanos Island, Greece - 1000 Pieces धन्यवाद!!
वर्गीकरण
लेखनप्रकार

9 टिप्पण्या 2,469 दृश्ये

Comments

चतुरंग नवीन

जिगसॉ पझल्स खरंच छान प्रकार आहे. तुम्ही तुमच्या मुलीसाठी सातत्याने अनेक वर्षे हे करत आला आहात हे कौतुकास्पद आहे! :) www.jigzone.com या साईटवर अनेक कोडी आहेत. वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या संख्येच्या तुकड्यात असे विविध प्रकार आहेत. खूप चांगलं वाटतं खेळायला. अर्थात प्रत्यक्ष हाताने कोडी सोडवण्यातला आनंद काही निराळाच! टॉवर ऑफ लंडन, आयफेल टॉवर, कॅसल अशी त्रिमित कोडी देखील मिळतात. ती सोडवायला जास्त कठिण असावीत. (कोड्यातला)रंगा

avyakta नवीन

In reply to by चतुरंग

साईट मस्तच. अशीच नॅशनल जिओग्राफिक ची पण वेब साईट आहे, http://www.nationalgeographic.com/games/photo-puzzle-jigsaw/ . "अर्थात प्रत्यक्ष हाताने कोडी सोडवण्यातला आनंद काही निराळाच!" - हे मात्र अगदी खरे आहे.

सुधांशुनूलकर नवीन

पहिलाच धागा सुंदर आहे. जिग्सॉजचे फोटोही छान आहेत. काकांनी परदेशातून आणलेल्या (बर्‍याच) जिग्सॉजमुळे लहानपणी तीस-पस्तीस वर्षांपूर्वी या प्रकाराशी ओळख झाली. जमायला लागलं. सगळं कुटुंब एकत्र बसून तुकडे लावायचो. मग शेजारी, मित्रही सामील झाले. एक गंमत - जिग्सॉ पूर्ण करण्यासाठी शेवटचा तुकडा आपण लावावा, म्हणून एक तुकडा लपवून ठेवायचा. नंतर ही युक्ती सर्वांनीच वापरायला सुरुवात केली. त्यामुळे सगळे तुकडे संपले, तरी चार-पाच तुकड्यांची जागा रिकामी दिसायची. मग हळूहळू एक एक जण आपण लपवलेला तुकडा गुपचूप लावून टाकायचे. २५००, ३०००, ३५०० तुकड्यांचे जिग्सॉ होते, तेही लावले. गेल्या दहा वर्षांत सगळे जिग्सॉ कुणाकुणाला देऊन टाकले. जाता जाता सहज आठवलं - शेवटचा जिग्सॉ मायकॅनॉस (उच्चाराची चूभूदेघे) बंदराच्या मूळ चित्राचं मोठं पोस्टर एका ग्रीक बोटीच्या कॅप्टनने माझ्या वडिलांना दिलं होतं. पुलेशु

avyakta नवीन

In reply to by सुधांशुनूलकर

धन्यवाद!! गम्मत आवडली, आमच्याकडे पण शेवटचा तुकडा लावायचा मान मुलीचाच असतो. अर्थात जवळजवळ सगळे पझल तीच लावते. 1000 पेक्षा जास्त तुकड्यांचे पझल्स अजून लावलेले नाहीत, बघू पुढे!! माझ्या माहितीत 1000 तुकड्यांचे पझल 2-2.5 तासात लावणाऱ्या व्यक्ती आहेत. मायकॅनॉस बंदराचे पोस्टर --- सहीचा!!

जयन्त बा शिम्पि नवीन

एका छान व मेंदुला चालना देणार्‍या , गोष्टीतुन , मिपावर " व्यक्त " झालात , याबद्दल आभार. अमेरिकेत गेलेल्या व तेथे ज्यांचा वेळ जात नाही , अशा टिपिकल आई-बाबांसाठी हे " वेळखावू " काम त्यांना मनापासून आवडेल, असे वाटते.