Skip to main content

स्वप्नातले कोंकण

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 28/10/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नातले कोंकण साधेच घर माझे , छोटेसे अंगण त्यात अवतरले, सारे वृक्षगण अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन अंगणात माझ्या, कर्दळीचे पान घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान नैवेद्याला सजते, केळीचे पान परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण शंकरास वाहते, बेलाचे पान स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण त्यात असावे घरकुल माझे छान राजेंद्र देवी

...ए स्ट्रेंजर इन टाउन... ‘फ्रैंक मोर्गन’

लेखक महामाया यांनी शुक्रवार, 28/10/2016 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो.. आठवणीतला हॉलीवुड-सात सुट्‌या सगळ्यांनाच हव्या, अगदी सुप्रीम कोर्टचा जज देखील याला अपवाद नाही.

मिस्ड कनेक्शन्स

लेखक ट्रेड मार्क यांनी शुक्रवार, 28/10/2016 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रेंच कनेक्शन तब्बल चार वर्षांनी आमचं भारतात जायचं ठरलं. मुलींच्या शाळा बुडू नयेत म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे जूनमध्ये जायचं असा प्लॅन करून फेब्रुवारीमधेच डील्स शोधायला सुरुवात केली. आम्ही चौघे आणि बरोबर एका मित्राची बायको आणि २ मुले असे एकूण ७ जणं जून मध्ये जाणार होतो. सुट्टी फार नसल्याने मी एका महिन्यात परत येणार व बाकी सगळे २ महिने म्हणजे ऑगस्ट पर्यंत राहणार होते. माझा मित्र जुलै मध्ये भारतात जाऊन या बाकी सगळ्यांबरोबर ऑगस्टमध्ये परत येणार होता. बऱ्याच संशोधनाअंती Indianeagle.com (IE) नामक वेबसाईट वर एक चांगलं डील दिसलं.

सॉल्विंग द मॅन-वूमन जिगसॉ

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 28/10/2016 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ प्रकाश वेरेकर सेक्सॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी स्त्री-पुरुष संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असलेल्या पिडीएफमधे वाचता येतील. सदर पुस्तिकेत लैंगिक संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (प्युबिस रींग), इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.

चारोळी

लेखक गौरी कुलकर्णी २३ यांनी शुक्रवार, 28/10/2016 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेलाही नजरकैदेत ठेवले असता नजरेतही तूच दिसलास , स्वतः दुःख देऊन मला असा दर्दभरा का हसलास ? कधी व्हावे गुलाब असे मला वाटे पण नंतर आठवी की जीवनात असती काटे मग त्या गुलाब प्रमाणे माझाही कंठ दाटे परंतू सर्वांनाच उमगे या गुलाबाचेच रहस्य मोठे !
काव्यरस

दिवाळी (कविता)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी गुरुवार, 27/10/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे मानवाच्या संगतीने, देवसुद्धा
काव्यरस

एकदा पहावा असा व्हिडिओ

लेखक alokhande यांनी गुरुवार, 27/10/2016 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
यु ट्युब वर हा विडिओ पहिला आणि यावर्षीचि दिवाळी एक्दम सध्या पध्दतीने साजरी करून शिल्लक पैसे मधून गरीब लोकांना त्यांच्या गर्जेनुसार वस्तू देनार आहे आपण हि एक्दापहावा असा विडिओ लिंक - https://m.youtube.com/watch?v=g1Jpn0Kmsu4

चांदण्याला चांदणे समजू नये

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 27/10/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

गीतगुंजन २३: बॅड, बॅड, लिरॉय ब्राऊन

लेखक प्रास यांनी गुरुवार, 27/10/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
संगीत सृष्टीमध्ये साठच्या दशकाला एक वेगळंच वलय आहे. या काळात रॉक, ब्लूज, सोल, जॅझ, कंट्री असं भावनांच्या उत्स्फूर्त कल्लोळाला कवेत घेणारं संगीत तयार झालं, आणि त्याबरोबरच तयार झाले या संगीताला शब्द देणारे गीतकार. या संगीत प्रकाराला साजेशी गीतं लिहिणं हे खरं तर तसं कसबी काम पण हा काळच असा होता की या काळाला साजेसे गीतकार तर झालेच पण कित्येक संगीतकारांनी आपल्या संगीताला साजेशी गीतरचना करण्यास सुरूवात केली. त्यापैकीच एक गीतकार संगीतकार गायक होता जीम क्रोस. जीम लहानपणापासून संगीतात रमणारा असला तरी कॉलेजात दाखल होईपर्यंत त्याने आपल्यातल्या संगीतकार-गीतकार आणि गायकाला फारसं मनावर घेतलं नव्हतं.

शिक्रेट (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 27/10/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला! लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते. ''काकू जरा मुरवण देता का?'' ''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू. मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू. काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत. पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी. नायतर मग चवकशा सुरूच- ''सुमी रोज कशाला येती?'' ''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?'' उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच! मुरवान मिळलं तर चटनी टाकून म्या, पिंटी आन नकुशी- भाकरीला खातो- दिवस निगतो.