Skip to main content

कासव

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 26/12/2016 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बामणा, मुत्त्या बोलावतंय बघ आमचं तुला. बघ काय म्हणतंय येड्या भोकाचं" "तुझैला तुझ्या तीन एकर. बापंय कीबे तुझा" "बाप नाय डोस्क्याला ताप हाय" आप्पा कोरे म्हणजे अ‍ॅक्चुअली डोस्क्याला ताप कॅटेगरीतलाच. पण त्याच्या पध्दतीने विचार केला तर ताप. नायतर मुत्त्या वागायला सरळ. दिवसभर बारक्या दुकानात गोळ्या चॉकलेटं अन कुरकुरे विकायचा. खरा धंदा व्ह्यायचा पुड्या सिगरेटीवर पण पाटी यल्लम्मा किराणा दुकान अशीच. सकाळी कपाळाला फासलेली इबित्ती घामाच्या ओघळात वाहून जाईपर्यंत धंदा व्ह्यायचा. जसा दिवस बुडायला लागायचा तसं दुकान आप्पाच्या मित्रांनी भरायचं.

काश्मीर धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही, भाग१

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 25/12/2016 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीर धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही, भाग2 भाग१ (प्रा. शेषराव मोरे ह्यांच्या ‘ काश्मीर एक शापित नंदनवन’ ह्या पुस्तकावरून. इतर संदर्भ – १.Freedom at Midnight- Dominique Lapiere, २. Kashmir- Tragedy of errors- Tavleen Singh, ३. भारतीय मुसलमान – शोध आणि बोध- सेतू माधव राव पगडी, जंग ए काश्मीर- कर्नल शाम चव्हाण) वैधानिक इशारा – लेखातील काही किंवा बरेच मुद्दे तुम्हाला पटणार नाहीत, आवडणार नाहीत पण जे सत्य आहे ते समजून घेणे आणि स्वीकारणे हि समस्या सोडवण्यासाठी अत्यंत आवश्यक बाब असते.

आठवणी दाटतातः माझी मुंबई

लेखक नूतन सावंत यांनी रविवार, 25/12/2016 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } माझी मुंबई जगात कुठेही फिरायला गेलं तरी काही दिवसांनी मुंबईची आठवण यायला लागते..आद्य मुंबई बनली ती माहीम, परळ, माझगाव, वरळी, बॉम्बे कुलाबा आणि छोटा कुलबा या सात बेटांनी मिळून, मुंबादेवी या ग्रामदैवातावरूनमुंबईचं नाव पडलं. मुंबा,मुंबाय,मुंबैमुंबई,मुंबापुरी,Bombaim,बॉम्बे,बंबई,अशी कितीतरी नावं.

(मुलिंनी धरु नये अबोला)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 25/12/2016 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा

अर्थ- शबानाचा... आणि रोहिणीचाही !

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 25/12/2016 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वडलांना जुने मराठी हिंदी इंग्रजी चित्रपट पाहण्याचा षौक फार. त्याकाळात त्यांनी खास त्यासाठी घरी VCR घेतला होता जेव्हा tv च काय फोनसुद्धा अक्ख्या चाळीत मिळून १-२ घरात असे व तो सार्वजानिक मालकीचा मानला जात असे. ते स्वतः निरनिराळे जुने सिनेमे आणून बघत आणि मलाही दाखवत, त्यांच्यामुळे मला खूप चांगले चांगले सिनेमे बघायला मिळाले . एकदा त्यांनी असाच " अर्थ" हा महेश भट्ट चा सिनेमा आणला ८ वी मध्ये असेन मी त्यावेळी. सिनेमा बरा वाटला. बाबा म्हणाले,काय कळलं हा सिनेमा पाहुन.

गहू - ओट्स - बदाम कूकीज

लेखक रुपी यांनी रविवार, 25/12/2016 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
c1 ख्रिसमसनिमित्त शेजारीपाजारी, कार्यालयात सगळेजण केक, ब्रेड, कूकीज असं काय-काय बेक करण्याच्या मागे लागतात. "फराळाचं काय काय बनवून झालं?"च्या सुरात एकमेकांना 'काय काय बेक करुन झालं?' असे प्रश्न विचारात नाहीत एवढंच! दर वर्षी आमच्या शेजारच्या आजी आणि इतर शेजारी त्यांनी स्वतः घरी बेक केलेले पदार्थ आम्हांला देतात. हे सगळं कमीच की काय म्हणून या वर्षी कार्यालयात बेकींगची स्पर्धाही होती. अस्मादिकांनी भाग घेतला.

न्यू यॉर्क : २१ : वेस्ट हेवन

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 24/12/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.

घर गळतंय माझं.....

लेखक अबोली२१५ यांनी शनिवार, 24/12/2016 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
घर गळतंय माझं तस ते नेहमीच गळत पण पाऊस आला कि उडतात छतावरच्या दोन चार काड्या अन पाऊस येतो आत येतो जोराचा घर गळतंय माझं थेंबाच शहर झालाय पाण्याने तुंबलंय वाट पाहतेय निचरा होण्याची छताला भोक आहेच पण जमिनीला करतेय निचरेल ...
काव्यरस

महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था

लेखक Parag Purandare यांनी शनिवार, 24/12/2016 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
अपरांत सादर करीत आहे महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था व बारव (पुष्करणी) स्थापत्यावरील डॉ. अरुणचंद्र पाठक (माजी संचालक, महाराष्ट्र राज्य, दार्शनिका विभाग) लिखित एक सर्वोत्क्रुष्ठ पुस्तक. या पुस्तकात महाराष्ट्रातील यादव काळापर्यंतच्या (१३वे शतक) अनेक बारवांची माहिती, आराखडे व फोटो असणार आहेत. तसेच बारवस्थापत्याचे विविध प्रकार आणि त्यांचे तत्कालिन उपयोग यासंबंधीची माहितीही विस्ताराने येणार आहे. पुस्तक लवकरच उपलब्ध होईल.