Skip to main content

अपरिचित त्रिशुंड गणपती मंदिर

लेखक समेळ पंकज विजय यांनी मंगळवार, 24/01/2017 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
समाधी मंदिर व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे त्रिशुंड गणपती महाराष्ट्रातील एक अद्वितीय मंदिर आहे. पुण्यातील तुळशीबाग, पर्वती, ओंकारेश्वर, सारसबाग गणपती मंदिर प्रसिध्द आणि लोकांना परिचित आहेत. हे मंदिर दुर्लक्षित राहण्याचे दुसरे कारण म्हणजे १८व्या शतकात नागझिरा ओढ्याच्या काठावर असण्याऱ्या सोमवार आणि मंगळवार पेठेच्या काही भागात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ.स. १६०० मध्ये शहापुरा पेठ वसवली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशवे यांनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शहापुरा पेठेचा विकास करून सोमवार पेठ असे नामकरण केले. या पेठेत गोसावीपुरा नावाचा भाग होता.

दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 24/01/2017 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
अनुवादीत लोक अकारण निमत्त विचारतील उदासीनतेचं विचारतील कारण तुझ्या बेचैन होण्याचं बोटं दाखवतील सोडलेल्या तुझ्या केसांकडे दृष्टी लावून पहातील व्यतीत झालेल्या काळाकडे पाहून कंकणाकडे काही करतील पोटात मळमळ पाहून थरथरत्या हाताला करतील काही खळखळ होऊन आततायी ताने देतील अनेक बोलण्या बोलण्यात करतील माझा उल्लेख नको होऊस प्रभावित त्यांच्या बोलण्यावर समजून जातील पाहूनी छ्टा तुझ्या चेहर्‍यावर नको विचारू प्रश्न त्यांना काही झाले तर नको बोलूंस त्यांच्याकडे माझ्या विषयावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला तर श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
काव्यरस

एक निर्णय (भाग 4)

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 24/01/2017 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक निर्णय भाग 1 एक निर्णय भाग 2 एक निर्णय भाग 3 भाग ४ हळूहळू दिवस पुढे सरकत होते. लग्नाला तीन वर्षे देखिल झाली. अलीकडे मीनाक्षी घरी वेळेत येऊ शकायची नाही. तिने एक उत्तम गायनॅक म्हणून अत्यंत थोड्या अवधित नाव मिळवले होते. तिच्या पेशंट्स तिनेच तपासावे म्हणून तिची वाट पाहात उशिरापर्यंत थांबायच्या. अशा प्रेग्नेंट बायकांना दुस-याकोणावर सोडायला मीनाक्षीचीही तयारी नसायची.

साईट (SITE) आणि खेडा प्रकल्प

लेखक प्रदीप यांनी मंगळवार, 24/01/2017 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
*/

१ ऑगस्ट १९७५ ह्या दिवशी भारतात प्रथम उपग्रहाद्वारे दूरचित्रवाणीचा कार्यक्रम देशभर प्रसारित केला गेला. ह्या दिवशी आपल्या Satellite Instructional Television Experiment (SITE) ह्या एकवर्षीय कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. इस्रोच्या अहमदाबाद येथील 'स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स सेंटर'ने ('सॅक'ने) ह्या प्रयोगाचे संकल्पन व संपूर्ण व्यवस्थापन केले.

फायनल डिल - कथा - काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 23/01/2017 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
फायनल डिल - कथा - काल्पनीक रात्रीचा अंधार अधिकच दाट होत चालला आहे . रातकिड्यांची किरकिरही वाढत चालली आहे . सगळीकडे काळोख वेढुन राहिला आहे . रस्त्यांवरची वर्दळ कधीच थांबली आहे . कुठेतरी दुरवर रात्रीची गस्त घालत फिरत असलेल्या गुरख्याचे काठी आपटणे आणी त्याची "जागते रहो" हि आरोळी , एवढाच काय तो आवाज या शांत वातावरणात ऐकु येत आहे . आपल्या घराच्या वरच्या खोलीत खुर्चीवर बसुन तो एकाग्रपणे काहितरी लिहितो आहे . घड्याळात किती वाजले याची त्याला काहिच जाणीव नाही . आपल्या मनातल्या कल्पना तो मन लावुन हातातल्या लेखणीने समोरच्या टेबलावरील डायरीमध्ये भराभरा उतरवतो आहे .

एक निर्णय (भाग 3)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/01/2017 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
एक निर्णय भाग 1 एक निर्णय भाग 2 भाग ३ एक एक महीना सरकत होता आणि दोघेही अभ्यासाच्या मागे लागले होते. एक वेगळाच समजूतदार धागा त्यांच्यात तयार झाला होता. एकत्र अभ्यास चांगला होत होता. प्रिलिम झाली... मुख्य परीक्षा झाली आणि तीन महिन्यांची मोठी सुट्टी सुरु झाली. त्या काळात सुट्टीमधे भेटणे तसे जमत नसे. त्यामुळे दोघे एकदाच भेटले. "तू पुढे काय ठरवल आहेस?" मिनाक्षीचा प्रश्न. "काही नक्की नाही ग. तू?" प्रशांत. "मी सायन्स. रुहियातुन बारावि करणार.

आभासी जगातल्या आभासी भाषा : वलारमोर्गुलिस

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 23/01/2017 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
*/

बिग बँगमधून विश्वाची निर्मिती झाली, एकपेशीय जीवापासून विविध सजीव निर्माण झाले, त्यांची उत्क्रांती झाली. प्राणी असोत वा आजचा प्रगत (??? कदाचित १४ कोटी वर्षांनी सगळे सुपरमॅनही असू शकतील.) मानव, उत्क्रांतीबरोबरच कंपूबाजीलाही सुरुवात झाली. कंपूला ‘समाज’ असं गोंडस नाव मिळालं.

ती एक वेडी

लेखक निओ यांनी रविवार, 22/01/2017 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
ती एक वेडी जुन्या आठवणींचा कोष मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी एक दिवस तिच्याही नकळत हा कोष जाणिवेत आला बघता बघता त्यातनं एक सुंदर फुलपाखरू निघालं तिच्या तळहातावर अलगद बसलं अगदी विश्वासानं ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली त्याची ओळख पटवू पाहू लागली हळूच त्याने पंख मिचकावले तिला वाटलं ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे ओळख पटली ती हसली तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं त्याच्या रूपानं हरखून गेली जुन्या आठवणीत हरवून गेली एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली पुन्हा एकदा नवथर प्रेमाची चाहूल लागली तीच तरुणपणातील धडधड तीच हुरहूर तीच ओढ़ तिचा विश्वास बसेना स्वतःवर पण ती तिच्या भावनांशी प्रामाणि

झेंगट कॉपीराईटचं, शैक्षणिक झेरॉक्सींगच !

लेखक माहितगार यांनी रविवार, 22/01/2017 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नव्हेंबर डिसंबर २०१६ नोटबंदी निर्णयामुळे इतर छोट्या मोठ्या बातम्या पडद्या आड राहील्या त्यातील एक छोटी बातमी दिल्लीच्या रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसची. आजुबाजूच्या फोटोकॉपींग सेंटरवरच्या विद्यार्थ्यांकडून (आणि इतरांकडून) पुस्तकांच्या झेरॉक्सींगच्या वेळी लेखक-प्रकाशकांच्या कॉपिराईटचे काय खोबरे होते याची कुणि फारशी काळजी करत नाही. कारण सरसामान्यपणे सर्वसामान्य भारतीयांची वृत्ती कायद्यांकडे झेंगट म्हणून पहाण्याची झाली असावी.