Skip to main content

नवीन इयर फोन बाबत सल्ला हवा आहे...

लेखक झिंगाट यांनी सोमवार, 10/04/2017 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या MI 3S फोन साठी इयर फोन घ्यायचा आहे. माझ्या गरजा ---- १)ट्रेन च्या गर्दीत वापरण्यासारख्या मजबूत असावे. २)MIC हवाच. ३)आवाज चांगला आणि LOUD असावा. एखादा ₹400-600 मध्ये चांगला इयर फोन सुचवावा.

जिममधल्या गमती, किस्से

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 09/04/2017 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
जिम म्हटलं की तिथे गेलं, व्यायाम केला, परत आलं असं सर्वसाधारणपणे होतं. पण म्हणजे; प्रत्येकाचं नाही. किंवा अगदी प्रयत्न केला तरी तिथे काही किस्से असे घडतात की ते कायम लक्षात राहतात. जेंव्हापासून व्यायाम करायला, किंबहुना जिमला जायला सुरुवात केली तेंव्हापासून आजवर घडलेले निवडक काही किस्से सांगावेसे वाटतात. तसं व्यायामाबद्दल बोलायला #मिपाफिटनेस धागा आहेच; इथे जरा अवांतर. ठाण्यात पूर्वी एक गोल्ड जिम नावाचं जिम होतं. तळवळकर्स त्या वेळी बरंच लोकप्रिय झालं होतं. आणि गोल्ड हे नवं आणि ठाण्यातलं दुसरं 'जिम' होतं.

दाही दिशांस जेंव्हा...

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 09/04/2017 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
दाही दिशांस जेंव्हा,अंधार दाटला होता भरपूर,काजव्यांचा आधार वाटला होता! पृथ्वी कधीतरी तर थांबेल वाटले होते माझ्यासवे दिशांनी संसार थाटला होता! ही कंपने अशी का गाण्यात सुरमयी आली? हुंकार वेदनांचा कंठात दाटला होता! अमृत म्हणून प्यालो एकेक दवाचा बिंदू मग्रूर पावसाचा मग ऊर फाटला होता! लाटेवरुन एका नुकताच स्वार झालो अन् एका क्षणात अवघा दर्याच आटला होता! मिळवून दाद गेले,सत्कार जाहले त्यांचे माझाच शेर ज्यांनी तूर्तास लाटला होता! मज मायना जरा हा,उशिराच उमगला होता पत्रामधून माझा पत्ताच काटला होता! —सत्यजित
काव्यरस

न्यूरेम्बर्ग - भाग २

लेखक अफगाण जलेबी यांनी रविवार, 09/04/2017 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूरेम्बर्ग - भाग १ न्यूरेम्बर्ग - भाग २ खटला सुरु होण्याआधी काही गोष्टींचं स्पष्टीकरण अत्यंत आवश्यक होतं. मुख्य मुद्दा म्हणजे हा खटला चालणार कुठे? याचं सगळं कामकाज कसं होणार? कैद्यांना – ज्यांच्यातले काहीजण साक्षीदारही असणार होते – ठेवायचं कुठे? त्यांचं संरक्षण कसं करायचं? ज्या कोर्टरूममध्ये हा खटला चालणार होता ती कशी असेल? या सर्व कामकाजाची नोंद कशी ठेवायची?

डाव - ४ [खो कथा]

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 09/04/2017 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
डाव - १ डाव -२ डाव- ३ सखारामच असणार तो. त्याचं हे नेहमीचंच हाय. उगा हितं तिथं कडमडायचं. नाय तर काय. आता त्यानं गावभर बोभाटा केला तर आली का नाय पंचाईत? आधीच बाबांना संशय आलाय. परवा मोबाईलचं बील बघून तडतडलेत.  मोबाईल काढून घ्यायची धमकी पण दिलीय. सखारामचं तोंड दाबायचं  काम वस्तादनं चांगलं केलं आसतं.

एक मिसळ बारा पावः नाशिकच्या मिसळपावची गाथा.

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 09/04/2017 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिकच्या मिसळीचे दिवाने हजारो है, नाशिकच्या मिसळ दिवानग्यांची ही दिवानगी नक्की केव्हापासून सुरु झाली आणि काय काय रुप घेऊन कशी कशी नव्याने अवतरत आली ह्याची सुरसरम्य कथा मांडली आहे खालच्या माहितीपटातून. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही सेकंद चुकवू नये अशी नितांतसुंदर फिल्म मिसळपावडॉटकॉम वर असलीच पाहिजे म्हणून इथे शेअर करत आहे. एन्जॉय!!! श्रेयनिर्देशः दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलकः तेजस जोशी ध्वनी आणि आवाज : रुचिर पंचाक्षरी संशोधनः लिनाली खैरनार, सी. एल.

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 09/04/2017 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
साचला का एवढा अंधार आहे? काजव्यांचा तेवढा आधार आहे! जागल्या होत्या मशाली काल येथे आज इथला सूर्यही बेजार आहे! एकही ठिणगी कशी येथे पडेना? कोण इथला आंधळा सरदार आहे? फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही श्वास माझाही जरा उबदार आहे! सारखा हिंदोळतो हा प्राण माझा त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे! —सत्यजित
काव्यरस

वायूमंडल

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 09/04/2017 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब.

संध्याकाळचा एक पर्पल-प्रसन्न संवाद

लेखक माहितगार यांनी रविवार, 09/04/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट परगावात आटपाट काम निघाले आणि अस्मादीकांनी एजंट महोदयांना मोबाईल फिरवला, रेल्वेचे कन्फर्म्ड तिकीट उपलब्ध झाले नाही तेव्हा बसगाडी शिवाय पर्याय नव्हता, शिवनेरी शिवाय इतर बससेवांवर मागची बरीच वर्षे चालवलेला बहीष्कार उठवण्याची वेळ आली होती.

रामू

लेखक अक्षरमित्र यांनी शनिवार, 08/04/2017 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर रामकृष्ण हे त्याचे खरे नाव. पण आम्हा पोरांमधे तो रामू किंवा राम्या नावानेच फेमस होता. म्हणजे तो अजुनही आहे पण आता मी तिथे नाहिये. रामू माझ्यापेक्षा नक्की किती वर्षांनी मोठा आहे हे मला नीटसं ठाऊक नाहिये पण साधारण आमच्यामधे ७-१० वर्षांचे अंतर असावे. मात्र बारीक अंगयष्टीमुळे रामुचे वय अजुनही कळून येत नाही. रामू ला राजकारणाची आवड आहे की खाज आहे हे मला नीटसं अजुन उमगलं नाहिये पण कदाचित दोन्ही असावं असं मला अजुनही वाटतं. रामूचं घर चाळीच्या पुढच्या बाजुला तर माझं मागच्या बाजुला.