Skip to main content

जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 11/05/2017 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का? बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का? शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का? वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का? फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का? आजही तो त्या विटेवर थांबला आहे त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का? —सत्यजित
काव्यरस

मी....

लेखक यांनी बुधवार, 10/05/2017 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यात मी ,तुझ्यात मी तरी उरुनी राहिलो शेष मी बंदिस्त मी ,अन मुक्त मी कैदेतले ही स्वातंत्र्य मी शांत मी ,उद्विग्न मी ह्या भावनांचे काहूर मी आरंभ मी, अन अंत मी पोहोचायचे ते गंतव्य मी त्या गंतव्या पल्याड मी त्याचा ठाव घेणारा शोध मी शून्य मी ,संपूर्ण मी राहतो पुन्हा अपूर्ण मी अनादी मी ,अनंत मी सचित्तातला आनंद मी असलो सर्वत्र विखुरलेला तरीही माझ्यात पूर्ण मी नादात घुमतो झंकार मी अनाहत नाद ओंकार मी ----© ओंकार जोशी

प्रेमाचं गणित

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 10/05/2017 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं शंकुसारखं धारदार नाक शुभ्रवर्णी दंतमाला अन हसल्यावर उमटणारा गालावरचा पॅराबोला इंटिग्रेशनच्या चिन्हासारखे तुझे लिमिटबद्ध लांबसडक केस डोळ्यांमधले कूटप्रश्न अन देहबोलीचे अॅनालॉग संदेश
काव्यरस

मिपाकरांचा "शेती" विषयक माहितीच्या आदान प्रदानासाठी व्हॉट्स-अप गृप.....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 10/05/2017 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, काल पासून शेती ह्या विषयात रस असलेल्या, मिपाकरां साठी, एक व्हॉट्स-अप गृप स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना शेतीची आवड असेल, अशा व्यक्तींनी खालील मिपाकरांशी संपर्क करावा. १. सुखी (मोबाईल नंबर =====> ९७६६३१४९५१) २. अभिजित अवलिया (मोबाईल नंबर ====> ९१५८००९८४६) आपलाच, मुवि

पिझ्झारट्टू

लेखक सरनौबत यांनी बुधवार, 10/05/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
साऊथ इंडियन (दाक्षिणात्य) पदार्थ म्हणलं कि इडली, डोसा, उत्तपा आणि वडा सांबार ह्याच गोष्टी पट्कन माझ्या डोळ्यासमोर येतात. हे पदार्थ मुख्यतः पुण्यातील प्रसिद्ध शेट्टी हॉटेल्स (वैशाली, रूपाली त) खाल्ले. त्यामुळे ह्या व्यतिरिक्त इतर दाक्षिणात्य पदार्थांचे माझं नॉलेज अतिशय मर्यादित. पूर्वी आतासारखं इडली-डोश्याचं तयार पीठ मिळायचं नाही. त्यामुळे ह्या गोष्टी घरी करायला पूर्वतयारी लागायची. प्रत्येकाचा इडली रवा आणि उडीद डाळीच्या प्रमाणाचा 'फॉर्म्युला' असायचा. ज्याची इडली एकदम 'हलकी' (वजनाला, दर्जाने नव्हे!) त्यांच्याकडून तो फॉर्म्युला मिळवायचा.

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग२

लेखक इडली डोसा यांनी बुधवार, 10/05/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पहिल्या लेसनमध्ये काहीच पडझड न झाल्यामुळं मी दुसऱ्या लेसनची उत्साहात वाट बघत होते. लौकर उठून पटापट आवरून निघालो, जरा आधी पोचलो तर जाऊन थोडी उतारावर थांबायची प्रॅक्टिस करता येईल असा माझा विचार होता. पण पीक सीजन असल्यामुळं स्काय लिफ्टसाठी भली मोठी रांग होती. डोंगराच्या पायथ्यापासून ते स्की एरियापर्यंत पोचायला ८ मिनिटे लागतात. यथावकाश आमचा नंबर लागून आम्ही स्की एरियामध्ये पोचलो तोपर्यंत आमच्या टीम ने थोडी प्रॅक्टिस करायला सुरुवातही केली होती.

वॉटर purifier घेताना काय काय पाहावे?

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी बुधवार, 10/05/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राने, नुकताच जांभूळवाडी, कात्रज तलाव येथे flat घेतला आहे. बोरिंगच्या पाण्याशिवाय तेथे पर्याय नाही. पाणी खूप जड आहे. म्हटलं मिपाकरांचा जरा सल्ला घ्यावा, कारण मी water purifier कधीच वापरला नाही. मग अशावेळी त्यात काय काय फीचर्स असायला हवीत? HUL चा साधा pureit वगैरे लगेच खराब होईलसं वाटत, शिवाय पाणी साठवून ठेवणाऱ्या purifier मध्ये क्षार अडकून तेही लवकर खराब होतात असं ऐकलं. मग करावं काय?? नुसता RO फिल्टर काम करेल का? काही सल्ला देऊ शकलात तर उत्तम:) टीप- पूर्वी असा धागा काढला असेल, तर त्याचा दुवा दिलात तरी फस्क्लास.

कटप्पाने ...... जानरावची परेसानी

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 10/05/2017 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बरस माणसाले येकच गोष्ट सतावत होती 'कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा.' आता आपल्याले परेशान्या का कमी रायते का जी. अमदा तूरीन पार खाउन टाकल. दरसाली अळी तूरीले खाते अमदा तूरीने आपल्याले खाल्ल. त्येच्यात हे परेसानी आणखीन कायले ठेवाची. बाहुबली येनार अस समजल तवाच म्या फोन करुन माया साडभावाले सांगतल मायासाठी दोन टिकिटा काढून ठेवजो. ज्या तारखेच भेटेन त्या तारखेच काढजो, म्या येतो. मी आन माया ढोरकी धन्या, त्याले मायासारखाच पिक्चरचा भारी शौक हाय. बायको पोरायले घेउन यवतमाळेले गेली. म्या बी मायी वावरातली काम आटपून घेतली. नाही कणच्या दिसाच टिकिट भेटन काही सांगता येत नाही न भाउ. रोज फोनची वाट पाहात होतो.

धुंद पाऊस

लेखक चांदणशेला यांनी मंगळवार, 09/05/2017 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी भेटीत धुंद पाऊस बरसला थेंबा थेंबात प्रीत नक्षी आकारून गेला पाने हलता मोती ओघळे तुझ्या चाहूलीने गंधाळती मळे गंध तुझा सावळ्या रानी विसावला पावसाळी सावल्यांत मेघांचा झुला झुले हळूवार प्रीतीत सरींचा पिसारा उमले कोवळ्या सूराने दवांत पंख पसरला विहग जलधारांचे पालवींत लोपले गूज फुलपाखरांचे मंजिरींत साठले ओलेत्या नभाने बांधली इंद्रधनुची मेखला
काव्यरस

कोसला

लेखक संदीप-लेले यांनी मंगळवार, 09/05/2017 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
उगाच किंचीत धुगधुगलेला विस्कळीत अन विखुरलेला अस्ताव्यस्त भरकटलेला पंचविशीतला पालापाचोळा मी एक उदाहरणार्थ कोसला (अर्थात भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीचा भावानुवाद)
काव्यरस