Skip to main content

मिस कॉल

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी रविवार, 20/08/2017 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
©®™ मंगेश पंचाक्षरी, नासिक. ( रविवारी दि 13 ऑगस्ट 2017 रोजी दै सकाळ मध्ये छापून आलेला लेख) आमच्या सौ ला कोणी 'मोबाईल'वर फोन केला तर मुळात आपला फोन वाजतो आहे हेच त्यांना लवकर समजत नाही. कारण त्या रोज मोबाईलची 'रिंग' बदलत रहातात. मोबाईल ही वस्तू रोज 'वॉलपेपर , रिंगर आणि डीपी' बदलणे एवढ्या साठीच असते अशी सौ ची ठाम समजूत आहे. सौ च्या प्रत्येक पर्सला खूप सारे 'कप्पे' असतात. त्यातल्या कोणत्या तरी 'कप्प्यात' सौ मोबाईल ठेवतात. मोबाईल ठेवण्याचा 'कप्पा' कधीही फिक्स नसतो. त्यामुळं मोबाईल ची 'रिंग' वाजायला लागली की सौ पर्स मधून मोबाईल सोडून इतर सर्व सामान बाहेर काढून मोबाईलचा शोध घेऊ लागतात.

निघाला शिकारीला कालीयानाग

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 20/08/2017 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
घालून विळखा दोन्ही धृवांना दाबून शेपटीत हिमालयाला दहाफणांनी ओकीत विषारी आग निघालाआहे शिकारीला कालीयानाग. अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे. कारण दशेंद्रीयांच्या रथावर स्वार होऊनच निघाला आहे शिकारीला कालीयानाग.
काव्यरस

विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 20/08/2017 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा! मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत.

वदनि पेग घेता ....

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 20/08/2017 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या नवप्रथे प्रमाणे ..... © चामुंडराय, मिसळपाव. (कृपया नशापाणी न करता, वारुणीला साथीला न घेता हे काव्य वाचू नये.
काव्यरस

डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! (Tribute to Dr. N. G. Dongare, who unearthed the roots of Physics in ancient Indian texts )

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 20/08/2017 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
सर, आज तुम्ही लिहिलेल्या ‘Physics in Ancient India’ या सुंदर पुस्तकाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर पहिले पान वाचले आणि त्यात आपल्या विषयी जन्म: १९३९ व मृत्यू: २००९ असे वाचले. खरं सांगतो हळहळ वाटली. मनुष्य जात्याच स्वार्थी असल्याने ही हळहळ तुम्ही जगात नाही यापेक्षा तुमच्याकडून खरंच काही ऐकायला मिळालं असतं ते आता मिळणार नाही याचं वाईट वाटलं. खरं सांगतो, डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! विज्ञानविषय मराठीत लिहिण्याचा किडा डोक्यात गेल्यापासून व लिहायला लागल्यापासून एक विचार राहुन राहुन मनात येत असे. इतके भारतीय ऋषी जर गणितात भारी होते, इतके खगोलशास्त्रात गुरू होते तर भौतिकशास्त्रासारखा मूलभूत विषय त्यांनी कसा सोडला? गणित कळणाऱ्या लोकांनी त्या गणिताचा भौतिकशास्त्रात वापर कसा केला नसेल? हे त्यांना का सुचलं नसेल? पण माझी इच्छा भारतीयांनी विमान आधीच बनवलं होतं हे सिद्ध करण्याची वगैरे नव्हती, म्हणजे ते खरं असेलही. पण एक सामान्य विचार करता केवळ भौतिकशास्त्राचा पाया भारतीय आद्यग्रंथात कुठे आहे हे मी शोधत होतो, तसे करता मला India'S Glorious Scientific Tradition हे सुरेश सोनी यांचं पुस्तक वाचायला मिळालं. त्या पुस्तकाच्या प्रकरण ५: Mechanics and Mechanical Science मध्ये न्यूटनने सांगितलेली गतीसूत्रे ही ऋषी कणादांनी वैशेषिक दर्शन या ग्रंथात आहे असे म्हटले आणि त्यात तुमच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. सुरेश सोनींनी दिलेले संदर्भ तपासावेत म्हणून तुमचं ‘Physics in Ancient India’ हे पुस्तक हाती घेतले आणि तुम्ही प्रत्येक विधानाला दिलेल्या संस्कृत श्लोकाच्या मूळ पुस्तकातील क्रमांकासह दिलेल्या पुराव्याला पाहून थक्कच झालो. बरं तुमच्या पुस्तकात तुम्ही भारतीयांचा मान वाढवलात, पण आधुनिक पाश्चात्त्य शास्त्रज्ञाना जराही अवमानित केलं नाहीत. उलटपक्षी, सर्व साधने हाती असताना, ज्ञान असताना, गणित माहिती असताना ऋषींनी या तत्वांची गणितीसूत्र पद्धतीने मांडणी का केली नाही असा प्रश्न तुम्हालाही पडला.(तो अजूनही अनुत्तरीत आहे..) पण तरीही तुम्ही आशावाद कायम ठेवत या तत्त्वांचा शास्त्रज्ञ, संस्कृत पंडित, तंत्रज्ञ यांनी एकत्रपणे अभ्यास केल्यास नक्कीच काहीतरी वेगळं हाती लागेल असा विश्वास जपलात. पण तुमचा विश्वास केवळ भोळा विश्वास नव्हता, तर त्याला तुम्ही शास्त्राच्या पट्टीवर तोललंत, निरीक्षणाच्या कॅलिपर मध्ये मोजलंत आणि प्रयोगाच्या भट्टीत भाजून भारतीय विज्ञानाचं नाणं खणखणित असल्याचं दाखवलंत. बनारस विश्वविद्यालयामध्ये याबाबतचे अनेक शोध प्रबंध लिहिले. एवढंच नाही तर महर्षि भारद्वाज यांनी लिहिलेल्या (व बोधानंद यांनी भाष्य केलेल्या ) अंशुबोधिनी या ग्रंथावरून ध्वांतप्रमापक (Spectrometer or Monochrometer) हे यंत्र Sah Industrial Research Institute, काशी येथे तयार केलंत आणि हे यंत्र भारतीयांना साधारण ७व्या शतकामध्येच माहिती होतं व त्याची रचनाही आधुनिक यंत्रापेक्षा वेगळी असल्याचं दाखवून दिलंत. म्हणजेच अतिनील(ultraviolet), दृश्य(visible) व अवरक्त(infrared) किरणांच्या तरंगलांबीचं मोजमाप त्या काळात ज्ञात होतं हे ही सिद्ध झालं. पण डोंगरे सर हे वाचून मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही हे सर्व करताना तुम्हाला सगळं सोपं गेलं का? तुम्ही ज्या काळात हे सर्व केलंत त्या काळात US, UK ला जाऊन ‘स्वतंत्र’ वातावरणात काम करावंसं वाटलं नाही? तसं कुणी म्हटलं नाही. जुन्या ग्रंथात नवे तंत्रज्ञान शोधायच्या प्रयत्नांना कोणी नस्ती उठाठेव म्हटलं नाही? १८५७ च्या आधीचा भारताचा इतिहास वाचणे हा केवळ वेळ वाया घालवण्याचा उद्योग आहे असे बहुसंख्यांना वाटत असताना तुम्हाला काही असे ‘सल्ले’ मिळाले नाहीत? अशा कुत्सित टोमण्यांनी तुम्ही कधी विव्हल झाला नाहीत? शिवाय एवढे प्रयोग करताना तुम्हाला पाठिंबा देणारे कोण होते? हे प्रयोग सिद्ध होतानाचे किस्से, कहाण्या, रोमहर्षक प्रसंग, प्रलोभने काय होते? अपयश किती वेळा आले? कशी मात केली? शिवाय अश्या पुरातन पुस्तकात Spectrometer चे तत्व सापडल्यावर होणारा क्षण म्हणजे साक्षात्काराच्या क्षणा इतकाच बहुमोल असणार. तेव्हा Eureka Eureka असे म्हटलात का? आम्हाला न्यूटन च्या पडणाऱ्या सफरचंदाविषयी माहिती आहे, आर्किमिडिज ने Eureka म्हणत पळत सुटलेलं माहिती आहे..पण भारतीय शास्त्रज्ञांच्या कहाण्या काय आहेत? वाटलं होतं तुम्हाला हे सर्व विचारता येईल. डोंगरे सर तुम्हाला खरंच भेटायचं होतं. भारतीयांना त्यांच्या पुरातन ठेव्याविषयी पुन्हा प्रेम, आपुलकी, सार्थ विश्वास वाटू लागण्याच्या काळात तुमचं असणं पुढच्या पिढ्यांना दीपस्तंभासारखं वाटलं असतं. तुम्ही तिकडे काशीमध्ये संशोधन करत होतात. तुमच्यानंतर आता तुमची धुरा कोण वाहतंय? त्यांना काही असं नवीन सापडलंय का? ते शास्त्रज्ञ कोण आहेत? त्यांच्या कहाण्या काय आहेत? त्यांनी काही नवीन लिहिलंय का? शिवाय एक मराठी माणूस काशीमध्ये संशोधन करतो. नवीन गोष्टी शोधतो. प्रवाहा विरुद्ध पोहतो. यशस्वी होतो. पण मराठी लोकांना मात्र काहीच माहिती नाही. कदाचित मला माहित नसेल. म्हणजे सर्वसाधारण माझ्या आधीच्या व नंतरच्या पिढीला तुमची ओळख नाही. आम्हाला जयंत नारळीकर माहिती आहेत, वसंत गोवारीकर माहिती आहेत, डॉ. रघुनाथ माशेलकर माहिती आहेत..पण तुम्ही अनोळखी राहिलात...अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या (व मनाने अमेरिकन झालेल्या) भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळाल्यावर भारतीय लोक डोक्यावर घेतात..पण तुम्ही इथेच राहून, इथल्या संस्कृतीची उज्ज्वल परंपरा पदार्थविज्ञानाच्या प्रकाशात पहिलीत. वैशेषिक दर्शन हेच प्राचीन भारतीय पदार्थविज्ञान हे साधार सिद्ध केलंत तरीही एकंदर सामान्य जनांना, त्यातही मराठी लोकांसाठी अनोळखीच राहिलात. एका अर्थाने उपेक्षितच राहिलात.. तुमच्याविषयी कुसुमाग्रजांची हीच ओळ म्हणाविशी वाटते “अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्‍त स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !” सर या बद्दल सॉरी म्हणायला तरी तुम्हाला एकदातरी भेटायचं होतं! N. G. Dongre यांची पुस्तके व प्रकाशने यांची यादी (अपूर्ण) • Dhvantapramapaka Yantra of Maharshi Bhardvaja • Physics in Ancient India • Waves and Oscillations • Kanada’s Science of Physics

रनवे

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शनिवार, 19/08/2017 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
-मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन) अलीकडेच नाशिक मध्ये खा. शरद पवार यांची एक मनमोकळी मुलाखत विश्वास लॉन्स येथे झाली. दुसऱ्या दिवशी साहेब जळगावला जाणार होते. आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी ओझर विमानतळावर गेलो होतो. साहेब विमानात बसले आणि थोढ्याच वेळात विमानाने पश्चिम दिशेला टेक-ऑफ घेतला. कोणीतरी पटकन बोलले की अरे साहेबाना तर जळगावला जायचे होते आणि विमान तर मुबईकडे गेले. पायलट विसरले की काय? सर्वांच्याच मनात हा प्रश्न आला होता की विमान मुंबईच्या दिशेने का उडाले असेल? आम्ही याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की विमान नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडते.

विष्णू - बोधचिन्हे आणि प्रतिकं

लेखक आर्य यांनी शनिवार, 19/08/2017 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांपासून लिहायचे होते, पण कामामुळं राहून जात होतं... थोडी रोचक माहिती............ काही दिवसांपूर्वी पुन्हा दक्षिण भारत फिरायचा योग आला, त्यामध्ये अनेक मंदिरात गेलो, अर्थातच सर्वात जास्त मंदिरं विष्णूची किंवा त्याच्या विविध अवतारांची होती उदा: राम, कृष्ण, नृसिंह, केशव इत्यादी. पण प्रत्येक ठिकाणी वेगळी मुर्ती, वेगळी रचना, नाव वेगळं त्याचे सहचारीही वेगळे होते. एव्हढाच काय आपण विष्णूच्या विविध मूर्ती, चित्रं आणि ग्राफिक बघतो त्यात प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं विष्णूची रूपं दाखवतो, म्हणून त्यावर अभ्यास करायचा ठरवलं आणि त्यातून काही रोचक माहिती समोर आली.

पापणी

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 19/08/2017 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा *पापणी* लवलवती पापणी... अश्रूंना घेऊन लपली, मिटल्याने झाली ओली आतल्या अंधारात तरी, पहा चमचमली ...लवलवती पापणी थरथरती पापणी... अश्रूंच्या लाटांनी, बेभान जराशी झाली सोडण्या तयांना खाली, पहा तयार झाली ...थरथरती पापणी झरझरती पापणी... अविश्रांत असा, झरा वाहता झाली,  पुन्हा भरण्यासाठी, वेडी, रिक्त झाली ...झरझरती पापणी - संदीप चांदणे

शेकहँड

लेखक मंगेश पंचाक्षरी यांनी शनिवार, 19/08/2017 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
©मंगेश पंचाक्षरी, नासिक. (कृपया पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये) शेक हँड करणे ही आता एक प्रचलित पद्धत झाली आहे... कोणी ओळखीची व्यक्ती भेटली किंवा कोणाशी औपचारिक ओळख करून दिली की पूर्वी हात जोडून 'नमस्कार', किंवा 'राम राम' असं अभिवादन केले जायचे... पूर्वेकडील देशात खरं तर हात जोडण्याचीच पद्धत आहे... आपण थायलंड मध्ये गेलो तर सुहास्य मुद्रेने ते लोक हात जोडून 'सवाडीका' असे म्हणतात... जपान मध्ये वाकून अभिवादन करतात.. भारत हा उष्ण कटिबंधातील देश आहे... लोकांच्या हाताला स्वाभाविकपणे घाम आलेला असतो... त्यावर धूळ आणि जंतूही असू शकतात..

"अनिवासी" यांच्यासह पुणे कट्टा : रविवार, २७ ऑगस्ट '१७

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 18/08/2017 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे (१५ ऑगस्ट १९४७) प्रत्यक्ष साक्षीदार असलेले (संदर्भ : एक आठवण) आणि राणीदेशनिवासी ज्येष्ठ मिपाकर "अनिवासी" सद्या पुण्याला भेट देत आहेत. त्यांच्याबरोबर एक मिपाकट्टा करायचे योजले आहे.