-मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन)
अलीकडेच नाशिक मध्ये खा. शरद पवार यांची एक मनमोकळी मुलाखत विश्वास लॉन्स येथे झाली. दुसऱ्या दिवशी साहेब जळगावला जाणार होते. आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी ओझर विमानतळावर गेलो होतो. साहेब विमानात बसले आणि थोढ्याच वेळात विमानाने पश्चिम दिशेला टेक-ऑफ घेतला. कोणीतरी पटकन बोलले की अरे साहेबाना तर जळगावला जायचे होते आणि विमान तर मुबईकडे गेले. पायलट विसरले की काय? सर्वांच्याच मनात हा प्रश्न आला होता की विमान मुंबईच्या दिशेने का उडाले असेल?
आम्ही याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की विमान नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडते. प्रत्येक विमानतळावर हवेचा प्रवाह दाखवणारा झेंडा असतो. विमान नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला टेकऑफ आणि लँडिंग करते. भारतात वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. कधी या उलटही वाहत असतो. त्यामुळे येथील रनवे नेहमी पूर्व-पश्चिम असतात. अमेरिकेसह काही देशात चारही दिशांना तोंड करून 'रनवे' असतात. विमान हवेचा अवरोध 45 डिग्री अँगल पर्यंत ऍडजस्ट करू शकतात. त्यामुळे काही रनवे अधिकच्या चिन्हासारखे 'क्रॉस' मध्येही असतात. या रनवे ना 9-27 (पूर्व-पश्चिम) किंवा 18-36 म्हणजे (उत्तर - दक्षिण) असे नंबर दिलेले असतात. आपण विमानात बसलेलो असताना उड्डाणपूर्वी कॅप्टन रनवे नंबरची घोषणा करत असतात. हे समजण्यास अगदी सोपं आहे. हे आकडे म्हणजे डिग्री आहेत. 9 म्हणजे उत्तर दिशेपासून 90 डिग्री. उत्तर दिशेपासून घड्याळाच्या काट्याप्रमाणे मोजलेल्या अँगलला बेअरिंग किंवा अझीमुथ म्हणतात. रनवे 9 म्हणजेच विमान पूर्वेकडे उड्डाण करणार आहे. 27 म्हणजे 270 डिग्री अर्थात पूर्वेकडून पश्चिमेकडे, याचप्रमाणे 18 असेल तर 180 डिग्री म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि 36 म्हणजे 360 डिग्री अर्थात दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे विमानाचे उड्डाण होते. धावपट्टी किमान 1829 मीटर ते 5500 मीटर म्हणजे साडेपाच किलोमीटर लांबीची असते. मुंबईत 9-27 (3445 मी.) आणि 14-32 (2925 मी.)असे दोन रनवे असून ते एकमेकांना छेदणारे आहेत. भारतात दिल्लीचा रनवे सर्वात लांब (4430 मी.) आहे तर जगात क्वामडो (चीन) चा रनवे सर्वात लांब (5500 मी.)आहे. भारतापेक्षा मोठे रनवे इराक, इराण, कोंगो, आफ्रिका, झिम्बाब्वे, नमिबिया, कतार, दुबई, ब्राझील, रशिया, इथिओपिया इत्यादी देशात आहेत. प्रवासी विमानाचा उड्डाणसमयी वेग सुमारे 300 किमी प्रतितास असतो तर हवेत तोच वेग 1000 किमी प्रतितास असतो. त्यामुळे स्थूल मानाने किती हजार किमी अंतर आहे तेव्हडे तास विमान प्रवास करते. रनवेच्या शेवटी पांढऱ्या अक्षरात त्या धावपट्टीचा क्रमांक लिहिलेला असतो. काही ठिकाणी हवा एवढी जोरात वाहत असते की विमान रनवेच्या जवळ येई पर्यंत हवेच्या अनुरोधाने चक्क तिरके खाली आणले जाते आणि अगदी चाक स्पर्श करण्यापूर्वी विमानाची दिशा रनवे प्रमाणे बदलली जाते.
हवेचा प्रवाह विमानाच्या सोयीनुसार असेल तर विमान कोणत्याही दिशेने लँड करता येते. अशा वेळी विमानाचे पार्किंग हँगर जवळ पडेल, प्रवसी गेट जवळ पडेल, इतर विमानांचे टेक ऑफ किंवा लँडिंग मागोमाग त्वरित करता येतील असे विचार करून नियंत्रण केले जाते. आजच्या काळात विमानप्रवासा इतका आरामदायी प्रवास दुसरा नसेल. हवेत उडणाऱ्या या राजमहालामागे किती विज्ञान असते हे बघून आपण थक्क होतो. ज्या संशोधकांनी विमानाचा शोध लावून त्यात आतापर्यंतची प्रगती केली आहे, त्यांना सलाम करावासा वाटतो.
-©मंगेश पंचाक्षरी,नासिक.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5349
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख पण...
टेकऑफ आणि लँडिंग नेहमी वा
In reply to छान लेख पण... by आगाऊ म्हादया......
(कृपया पूर्वपरवानगी शिवाय
In reply to टेकऑफ आणि लँडिंग नेहमी वा by गवि
बरं बरं
In reply to टेकऑफ आणि लँडिंग नेहमी वा by गवि
विक्रांत मुंबईत परत येताना
In reply to टेकऑफ आणि लँडिंग नेहमी वा by गवि
नवीनच माहिती मिळाली. धन्यवाद.
हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित
छान माहिती मिळाली.
कृपया साहेबांच्या
निरोपाला हजर मंडळींना इतके
जर वारा वहात नसेल (शांत
माझ्या अंदाजाप्रमाणे ज्या
In reply to जर वारा वहात नसेल (शांत by अत्रे
तेव्हा जाणकार लोक्स पिंकतीलच
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे ज्या by चामुंडराय
अहो गगनविहारी सर,
In reply to तेव्हा जाणकार लोक्स पिंकतीलच by गवि
https://en.wikipedia.org/wiki
In reply to अहो गगनविहारी सर, by चामुंडराय
रनवेच्या टोकाला मोठ्ठा फॅन
In reply to अहो गगनविहारी सर, by चामुंडराय
...आणि वारा रनवेच्या रेषेला समांतर नसेल, अँगलने वहात असेल
In reply to तेव्हा जाणकार लोक्स पिंकतीलच by गवि
जाणकार लोकांच्या मधे मधे कशाला यायचं मग ?
In reply to माझ्या अंदाजाप्रमाणे ज्या by चामुंडराय
लेमन मत मांडायचेच नाही का?
In reply to जाणकार लोकांच्या मधे मधे कशाला यायचं मग ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगली माहिती मंगेश.
चांगली माहिती
वाऱ्याची दिशा सहज समजण्यासाठी
पायातील मोजा आणि वादळ वारे