©®™ मंगेश पंचाक्षरी, नासिक.
( रविवारी दि 13 ऑगस्ट 2017 रोजी दै सकाळ मध्ये छापून आलेला लेख)
आमच्या सौ ला कोणी 'मोबाईल'वर फोन केला तर मुळात आपला फोन वाजतो आहे हेच त्यांना लवकर समजत नाही. कारण त्या रोज मोबाईलची 'रिंग' बदलत रहातात. मोबाईल ही वस्तू रोज 'वॉलपेपर , रिंगर आणि डीपी' बदलणे एवढ्या साठीच असते अशी सौ ची ठाम समजूत आहे. सौ च्या प्रत्येक पर्सला खूप सारे 'कप्पे' असतात. त्यातल्या कोणत्या तरी 'कप्प्यात' सौ मोबाईल ठेवतात. मोबाईल ठेवण्याचा 'कप्पा' कधीही फिक्स नसतो. त्यामुळं मोबाईल ची 'रिंग' वाजायला लागली की सौ पर्स मधून मोबाईल सोडून इतर सर्व सामान बाहेर काढून मोबाईलचा शोध घेऊ लागतात. एका पर्स मध्ये इतकं समान मावू शकते यावर सौ सह आमचाही विश्वास बसत नसतो. त्यात बऱ्याच वेळा पूर्वी घरभर शोधलेल्या वस्तूचा अचानक 'लाभ' होतो. सौ त्यात 'हरवून' जातात. इकडे मोबाईल ची 'रिंग' वाजतच रहाते. अखेर मोबाईलचं वाजणं आणि थरथरणं बंद होते. आता एवीतेवी रिंग बंद झालीच आहे तर मोबाईल 'शोधून' काय उपयोग असा विचार करून सौ मोबाईल बाहेर न काढताच पुनः सर्व सामान पर्समध्ये भरून ठेवतात. पर्सची चेन बंद केली जाताच पुनः मोबाईल वाजणे सुरू होतं. विशेष म्हणजे 'मोबाईल'चा शोध परत पहिल्या प्रमाणेच सुरू होतो.
बायकांनी लवकर मोबाईल न उचलण्याचे 'मूळ' हे त्यांच्या पारंपरिक पोशाखात आहे. बायका जनरली साडी किंवा पंजाबी ड्रेस या वेशात असतात. या पोशाखाना खिसा नसल्याने मोबाईल पर्स मध्ये ठेवण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. क्वचित काही स्त्रिया जीन्स वापरत असल्या तरी पुरुषांप्रमाणे जीन्स च्या खिशात मोबाईल ठेवण्याची बायकांना सवय नसते. घरात किचन मध्ये पोळ्या वगैरे करताना, घरकाम करताना त्यांना पटकन मोबाईल वापरता येत नाही. आजकाल घराघरांत बरीचशी भांडणे ही केवळ बायको ने वेळेवर मोबाईल 'न' उचलण्याच्या कारणाने होत असतात.
बायकांची मात्र नवऱ्याकडून चटकन 'मोबाईल' उचलण्याची अपेक्षा असते. नवऱ्याने मोबाईल उचलायला उशीर केला की बायको ला नको नको त्या 'शंका' यायला लागतात. नवरेही काही कमी नसतात. त्यांच्या मोबाईल मध्ये सर्वात जास्त 'मिस' कॉल हे 'मिसेस' चेच कॉल असतात. एरवी एखाद्या 'मिस' चा कॉल कोणी पुरुष कशाला 'मिस' करेल?
© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
इमेल:- mangeshp11@gmail.com
याद्या
9311
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
तुमचे लेख स्त्रियांच्या
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आपण
In reply to तुमचे लेख स्त्रियांच्या by ज्योति अळवणी
सहज कुतूहल म्हणून चेक केलं,
In reply to प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आपण by मंगेश पंचाक्षरी
आणि उखाणे लेख,
In reply to प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आपण by मंगेश पंचाक्षरी
व्वा.. खोदकाम भारी आहे..
In reply to आणि उखाणे लेख, by बाजीप्रभू
हे प्रतिसाद बहुधा "कुलदेवी"
In reply to व्वा.. खोदकाम भारी आहे.. by मोदक
वाईट वाटून घेऊ नका. पण असल्या
त्यात काय वाईट वाटायचं?
In reply to वाईट वाटून घेऊ नका. पण असल्या by अभिजीत अवलिया
:)
धन्यवाद!
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"©" तो खैर समझे.. पर "®™" ..
Registered Trade Mark?
In reply to "©" तो खैर समझे.. पर "®™" .. by गवि
अर्थ / फुलफॉर्म माहितीये पण
In reply to Registered Trade Mark? by अभिजीत अवलिया
सोपं आहे हो . . . . .
In reply to अर्थ / फुलफॉर्म माहितीये पण by गवि
®™
In reply to "©" तो खैर समझे.. पर "®™" .. by गवि
त्याला ओरिजिनल नाव ठेवण्याची
In reply to ®™ by रानरेडा
हिंमत कसली ?
In reply to त्याला ओरिजिनल नाव ठेवण्याची by मंगेश पंचाक्षरी
®™ काय्देशिर होतो का ?
In reply to माझं खर नाव मी लिहिलं आहे, by मंगेश पंचाक्षरी
C फॉर कॉपिराईट नसेल ते. C
In reply to "©" तो खैर समझे.. पर "®™" .. by गवि
सकाळच्या कुठल्या आवृत्तीत आला
https://m.facebook.com/story
In reply to सकाळच्या कुठल्या आवृत्तीत आला by जेम्स वांड
मस्त लेख !
धन्यवाद!
In reply to मस्त लेख ! by धर्मराजमुटके
धन्यवाद सर
In reply to मस्त लेख ! by धर्मराजमुटके
दर्जेदार?वाचकांनी सकाळ वाचू
हीहीही. छान.