Skip to main content

या स्पर्धेचं काय झाल?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 11/02/2010 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर गेले काही महिने एका परिषदेची आणि त्या निमित्त आयोजित केलेल्या एका निबंध स्पर्धेची खुप जाहिरात केली गेली होती. मला आठवतं त्याप्रमाणे मिळून सार्‍याजणी या मासिकाने यात पुढाकार घेतला होता. पुढे याचं काय झालं ते जाणून घेण्यास उत्सुक आहे.

आओ म्हारो जैसलमेर

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 11/02/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
झी टीव्हीच्या एका सीरियलच्या शूटिंगसाठी जैसलमेरला घेऊन जाण्याचं निमंत्रण आलं होतं. माझी या दौऱ्यासाठी निवड झाल्यानं एक नवं ठिकाण पाहायला मिळण्याचं समाधान मिळालं. राजस्थानात भरतपूर अभयारण्यात मी सात-आठ वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा जयपूरही फिरून आलो होतो. पण जोधपूर-जैसलमेरची वारी पहिल्यांदाच घडणार असल्यानं जरा अधिक उत्साहित होतो. प्रवास जरा आडनिडा होता. तीन फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता मुंबईहून विमानाने जोधपूरला जायचं होतं. त्यापूर्वी सकाळी मला पुण्याहून मुंबईला पोचणं आवश्‍यक होतं. कूल कॅबची चौकशी करून सकाळी लवकर निघायचं ठरवलं. साडेपाचची कूल कॅब फोन करकरून शेवटी सहा वाजता अवतीर्ण झाली.

देणे

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 11/02/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
निःशब्द चांदण्यांनी जागेपणी पहावे
स्वप्नात तुझे येणे
बेभान वादळांनी श्वासात जागवावे
आवेग जीवघेणे
अस्वस्थ जीव होता गावे तुझ्या स्वरांनी
जादूभरे तराणे
हळुवार भावनांना फुलवून जागवावे
माझे अबोल गाणे
मी मुग्ध, तूही शांत, ही गूढरम्य
काव्यरस

चॉकलेट चिप मूस

लेखक स्वाती२ यांनी गुरुवार, 11/02/2010 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
चॉकलेट चिप मूस साहित्य १ कप सेमी-स्वीट चॉकलेट चिप १ पाकिट(८ औस) क्रिम चीज मऊ केलेले १ टी स्पून वॅनिला १ डबा(८ औस) फ्रोझन व्हिप्ड टॉपिंग, थॉ करुन शोभेसाठी पाकातल्या चेरी मायक्रोवेव मधे चॉकलेट चिप्स वितळवून घ्या. २-३ मिनिटात चिप्स वितळतात. चमच्याने ढवळून एकजीव करून बाजूला ठेवा. एका बोल मधे क्रिम चीज आणि वॅनिला फेटून घ्या.

(नको आणखी )

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 11/02/2010 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
(नको आणखी ) संदर्भ : भारताचा क्रिकेट सामन्यात नुकताच झालेला पराभव प्रेरणा : नको आणखी ----------------------------------------------------------------------------------- मांडणी नव्याने नको आणखी सणकून हारणे नको आणखी उदास व्हावे पुन्हा मीच का क्रिकेट पाहणे नको आणखी येणे तुझे क्षणभराचेच का बारा वाजणे नको आणखी बॅटीत जबरी जहिराती तुझ्या लोगो लावणे नको आणखी धुंदी चढावी फटक्यानी तुझ्या परत फसवणे नको आणखी जगणार आहे तुझ्याच विना नवीन सामने नको आणखी --------------------------------------------------------------- अमोल केळकर
काव्यरस

देवगंधर्वांचं 'पिया कर..', थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं 'मधुकर वन वन'!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 11/02/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मिपाकरहो, देवगंधर्व भास्करबुवा बखले. जयपूर, आग्रा, ग्वाहेर गायकीवर हुकुमत. गाण्यातला साक्षात भास्करच..त्यांची देस रागातली बंदिश.. 'पिया कर धर देखो.. ' सौ शैला दातार. एक गुणी गायिका. योगायोग असा की शैलाताई या भास्करबुवांच्या नातसून.. शैलाताईंनी नमुन्यादाखल गायलेली देस रागातली बंदिश येथे ऐकता येईल.. भास्करबुवांनी छान एकतालात बांधलेली ही बंदिश अगदी प्रसन्न आहे..मुळात देस हा रागच प्रसन्न.

बाबरीचे श्राद्ध

लेखक शरद जयकर यांनी गुरुवार, 11/02/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
आता राम लल्लालाच करायला हवे बाबरीपरी मशिदींच रक्षण अन रसूल अल्लालाच धावायला हवंय मंदिर जन्मभूमी वाचवायला ..... स्वत:च्याच अस्तित्वासाठी ... तथाकथित धार्मिकांचे चोचले जोपासण्यासाठी स्वत:चे सत्व जपण्यासाठी अन टिकविण्याकरितासुद्धा..... खूनखराबा, जाळपोळ, विध्वंस करणा-यांना जातपात नसते, धर्म तर नसतोच नसतो... असते ती फक्त एक जीवघेणी नशा... धगधगत्या ज्वाळांची...लाल भडक रक्ताची ...आर्त किंकाळ्याची वेदनेने तडफडणा-या अश्राप हुंदक्यांची... तर बा रामलल्ला परमेश्वरा अन रसूललल्ला परवरदिगारा कान, डोळे, तोंड बंद करून महात्म्यासारखा स्थितप्रज्ञ बसला असशील तर जरा माणसात ये. थांबव या हिंस्र पशूंना...
काव्यरस

जोशीबाई

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 11/02/2010 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वात वरच्या मजल्यावरच्या कोपर्‍यातल्या आठवीच्या वर्गात आम्ही वाट पाहत होतो, आता कोण येणार तासाला? जोशीबाई जिना चढताना दिसल्यावरच एकच गलका सुरु झाला, " बाई.. गोष्ट, बाई गोष्ट.." " अरे, अरे मला वर्गात तरी येऊ द्याल की नाही?" "परवाच्या ऑफ तासाला अर्धवट राहिलेली कार्व्हरची गोष्ट आधी पूर्ण करा, मग अभ्यास..." बाई हसतच बरं म्हणाल्या आणि धडा शिकवायचे बाजूला ठेवून कार्व्हरचा अनोखा जीवन झगडा विलक्षण प्रभावीपणे सांगू लागल्या ... साधारण सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, शेलाटा बांधा आणि शांत,सात्विक चेहरा! बाईंना आवाज चढवून बोलताना कधी पाहिले नव्हते, तशी त्यांना गरजही लागत नसावी.

एखाद्याचा जातो जीव

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 11/02/2010 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, अलीकडे आम्ही मिपावर बर्‍याच पाककृती वाचतो. त्यात मांसाहारी पाककलांचे वाढते प्रमाण बघून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर त्या मुक्या प्राण्याची आकृती उभी राहते. त्याच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, प्राण जातांना त्याने केलेली धडपड, विरोधाला न जुमानता कसायाने क्रूरपणे केलेली त्याची हत्या हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. तुम्ही खातांना अगदी मिटक्या मारून मारून खाता. पण तुमच्या जिभेच्या चोचल्यांपायी एखाद्याचा जीव जातो त्याचे काय? मी काही 'शाकाहार हाच श्रेष्ठ, मांसाहार कनिष्ठ की उलट' ह्या वादात पडणार नाही. पण मनाला जे वाटते ते सांगितले.