कट्टा!
‘ग्रंथ माझे गुरु, ग्रंथ मायबाप, निवविती ताप, हृदयाचा’ ... एका ओळीत वाचनसंस्कृतीचं माहात्म्य वर्णन करणारं हे वचन ग्रंथांचं महत्त्व सिद्ध करतं, तेव्हा ग्रंथप्रेमींना कृतकृत्य वाटत असेल. पुस्तकांच्या किंमतीचा विचारही न करता ती मिळवण्यासाठी वणवण करणारे पुस्तकभक्त पाहिले, की ‘वाचनापायी वाट्टेल ते’ करायची तयारी असलेल्या पुस्तकवेड्यांच्या वाचनभुकेला दाद द्यावीशी वाटते. एखाद्याकडे अमुक एक पुस्तक आहे, असं कळलं, की झपाटल्यासारखं होणारे पुस्तकप्रेमी पुस्तकविश्ववर दिसतात, तेव्हा वाचनसंस्कृतीच्या या पुजा-यांच्या पंक्तीत आपण खूप शेवटच्या पानावर आहोत, याची जाणीव होते.
आमच्यावेळी नव्हती असली थेरं!
"आई, काय गं झालं? ही का रडतीये?" हा प्रश्न माझ्या आईनं तिच्या आईला केला होता. सुट्टीत मामा मामींकडे गेलं की आजीच्या तक्रारी सुरु होत असत. तिचं आपलं ठरलेलं वाक्य,"आमच्या वेळी नव्हती बाई असली थेरं!" प्रसंग म्हटला तर साधासाच होता. दर रविवारी मला आणि मामेबहिणींना न्हाऊ माखू घालण्याचा तिचा हट्ट असे. भल्या सकाळी आमच्या सुपीक डोक्यांना कोमट तेल लावून ठेवायची, मग तिच्याकडे असलेल्या पितळ्याच्या तपेलीत घरी तयार केलेली शिकेकाई भिजवून उकळून त्याचं चोथा पाणी वेगळं करायची. शिकेकाईही साधीसुधी नसायची. त्यात संत्र्याच्या वाळवलेल्या साली, रिठे आणि काय काय बरेच जिन्नस असायचे.
फुलांचा राजा
मध्यंतरी उटीला जाण्याचा योग आला. तिथे गेल्यावर प्रमुख आकर्षणात बोटॅनिकल गार्डन आणि रोझ गार्डन अश्या २ बागा बघायला सांगण्यात आले. होटेल पासुन बोटॅनिकल गार्डन जवळ असल्यामुळे प्रथम तिथे मोर्चा वळवला आणि वातावरण असे काही सुरेख होते आणि हिरवळ (म्हणजे गवत फक्त) एव्हढी काही अप्रतिम होती कि २-३ तास तिथेच लोळुन काढले. त्यानंतर मित्रांना रोझ गार्ड्न मध्ये जाण्यात फारसा उत्साह नव्हता. पण तिथे गेल्यानंतर रोझ गार्डन चुकवले असते तर केव्हढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो ते कळाले.
माझे लेखन
सध्या बरेच जण 'माझे लेखन'ची लिंक नसल्याचे लिहीत आहेत, खालील लिंक त्यांसाठीच.
माझे लेखन (http://www.misalpav.com/mytrack) ही लिंक तुमच्या बूकमार्क्स मधे साठवून ठेवा. ह्या लिंकवर तुमचे स्वतःचे सगळे लेखन मिळेल. :)
-प्रभो
..... बाकी सगळं ठीक आहे !
आज माझ्या देशात देवा - सारं काही ठीक आहे ...
काही गरीब, कंगाल काही - काही मात्र श्रीमंत आहेत |
जगण्याच्या लढाई मधे , जनता सारी व्यस्त आहे
महागाई, भ्रष्टाचाराने , थोडी फार त्रस्त आहे |
रस्त्यांवर चारचाकी, रोज रोज वाढत आहेत
त्या खाली चिरडून सुद्धा , रोज काही मरत आहेत |
पावसाच्या काही सरी, नेतात रस्ते पाण्याखाली
नागरिकांचे सेवक मात्र, मागतात थोडी चिरीमिरी |
बॉम्बस्फोट आणि गँगवॉर - सारं काही सुरळीत आहे
चौका चौकात सिग्नलला - भिकारी देखील खूप आहेत |
अणू स्फोट करुन काही - भारत शक्तीशाली होतो
समुद्रातून येउन मृत्यु, रस्त्यांवर थैमान घालतो |
लोकांनाही त्याचे भय, आता फारसे वाटत नाही
मोठ्या मो
(प्रार्थना)
यशोधराचे 'प्रार्थना' हे अप्रतिम छंद्काव्य वाचून आम्हाला काही छंद आठवले नसते तरच नवल. सादर आहे ;)
ठेवतो अपेक्षा
मिळेल दर्शन
जिन्यात लपेन
आज तुझ्या..
एकाएकी तुझे
प्रकटती तात
कैसे बोलतात
अरे चोरा!...
फोकलाया पाठी
काठी बाभळीची
कन्यका तुमची
माझी ताई!...
अवकळा उरे
'सरली' जाणीव
उरली नेणीव
आवर रे...
छंदः परद्वार
चतुरंग
काव्यरस
हातचा
हातचा
===============
.
.
हाती अर्धाच प्याला,
म्हणता सौख्य कळेना..
अवीट जीवन गोडवा,
मग जिभेवरी रुळेना..
.
स्वीकार मीच न केला,
माझ्या अपूर्णतेचा..
आसवांच्या अंध धारा,
राहिल्या देत ठेचा..
.
हाती अर्धाच प्याला,
जो तो बघे रिकामा..
धडपडा जीव "वेडा",
हताश नि निकामा..
.
जन्म आशा निराशा,
मन आंदोल साहवेना..
हातचा आधार विसरता,
जीवनी संघर्ष चुकेना..
.
हाती अर्धाच प्याला,
म्हणता सौख्य कळेना..
हा सोहळा असण्याचा,
हृदयांतरी खुलेना..!
.
बेरजेत मोजावयाचा,
हातचा राहून गेला..
जोडून त्यास घेता,
गोषवारा नवाच आला..
.
हाती अर्धा (च) प्याला,
कोट कोट सुखाचा...!
हाती अर्धा (च) प्याला,
काठो-काठ सुखाचा...!
.
.
==========
आवाज की दुनीया के दोस्तों
केबल टिव्हीच्या जमान्याच्या आधी दिवसभर मनोरंजनाचे साधन म्हणजे रेडीओ, म्हणजे विविध भारती. आणी अर्थात व्ही सी आर व व्ही एच एस टेप्स.
पावसाळा आला की पावसावर बेतलेल्या निसर्ग कवितांना एक वेगळाच भाव येतो. घाबरु नका मी काही कविता किंवा तिचे रसग्रहण करणार नाही. :-) पण पावसाळा ही थीम घेउन मला आवडणारी काही गाणी तुम्हाला ऐकवीन म्हणतो. लगेच सुरवात करुया. रेडीओवर ऐकून ऐकून बरीच गाणी मनात घर करुन जातात. माझ्या पटकन लक्षात येणारी ही गाणी तुलनेत नवीन आहेत, काही जुन्यापैकी आठवणारे म्हणजे हे एक गाणे. मधुबालाच्या फॅन्सना समर्पीत.
ती...
ती... कोण होती ती? तसं माझं अन् तिचं नातं नव्हतच. साधारण ६ वर्षांपूर्वी तिचं आमच्या समोर राहणार्या एका तरुणासोबत लग्न झाल्यामुळे आमच्या समोर रहावयास आलेली.. पण मोकळा स्वभाव असल्यामुळे आमच्याही घरी कायम येणे जाणे.. त्यातून उलगडत गेली ती आणि तिचं आयुष्य.. तिला सख्खा भाऊ नव्हता म्हणून मला भाऊ मानलं.. आणि आता ही नात्याची वीण एवढी घट्ट झालीये की ती मला माझ्या सख्ख्या बहीणींईतकीच प्रिय..आणि म्हणूनच 'ती'ची कथा ईथे मांडावीशी वाटली..
ती.. अक्षरशः गोरीपान, सुंदर.. सोनेरी केसांमुळे गर्दीतही सहज ओळ्खू येणारी.. तिचं ५वी पर्यंत शिक्षण गावीच तिच्या वडीलांजवळ झालं.
मिसळपाव