Skip to main content

हातचा

हातचा

Published on सोमवार, 26/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
हातचा =============== . . हाती अर्धाच प्याला, म्हणता सौख्य कळेना.. अवीट जीवन गोडवा, मग जिभेवरी रुळेना.. . स्वीकार मीच न केला, माझ्या अपूर्णतेचा.. आसवांच्या अंध धारा, राहिल्या देत ठेचा.. . हाती अर्धाच प्याला, जो तो बघे रिकामा.. धडपडा जीव "वेडा", हताश नि निकामा.. . जन्म आशा निराशा, मन आंदोल साहवेना.. हातचा आधार विसरता, जीवनी संघर्ष चुकेना.. . हाती अर्धाच प्याला, म्हणता सौख्य कळेना.. हा सोहळा असण्याचा, हृदयांतरी खुलेना..! . बेरजेत मोजावयाचा, हातचा राहून गेला.. जोडून त्यास घेता, गोषवारा नवाच आला.. . हाती अर्धा (च) प्याला, कोट कोट सुखाचा...! हाती अर्धा (च) प्याला, काठो-काठ सुखाचा...! . . =============== स्वाती फडणीस... २१०११०
लेखनविषय:

याद्या 1808
प्रतिक्रिया 9

वा! कवितेतून मांडलेला दृष्टिकोन पटो न पटो, त्यात ताकद आहे आणि रचनेतही ताकद आहे हे निश्चित. दोन दिवसांत दोन ताकदीच्या कविता वाचायला मिळाल्या. ही एक आणि दुसरी प्रार्थना.

आवडली कविता.

:)

तो मिळवल्यावर - हातचा - प्याला भरतो...

बेरजेत मोजावयाचा, हातचा राहून गेला.. जोडून त्यास घेता, गोषवारा नवाच आला. . व्वा ! क्या बात है !