Skip to main content

आवाज की दुनीया के दोस्तों

आवाज की दुनीया के दोस्तों

Published on 26/07/2010 - 13:55 प्रकाशित मुखपृष्ठ
केबल टिव्हीच्या जमान्याच्या आधी दिवसभर मनोरंजनाचे साधन म्हणजे रेडीओ, म्हणजे विविध भारती. आणी अर्थात व्ही सी आर व व्ही एच एस टेप्स. पावसाळा आला की पावसावर बेतलेल्या निसर्ग कवितांना एक वेगळाच भाव येतो. घाबरु नका मी काही कविता किंवा तिचे रसग्रहण करणार नाही. :-) पण पावसाळा ही थीम घेउन मला आवडणारी काही गाणी तुम्हाला ऐकवीन म्हणतो. लगेच सुरवात करुया. रेडीओवर ऐकून ऐकून बरीच गाणी मनात घर करुन जातात. माझ्या पटकन लक्षात येणारी ही गाणी तुलनेत नवीन आहेत, काही जुन्यापैकी आठवणारे म्हणजे हे एक गाणे. मधुबालाच्या फॅन्सना समर्पीत. पण धोक्याचा इशारा - भारतभूषण दिसणार. आता मधुबाला व पाउस म्हणल्यावर हे गाणे तर यायला हवेच, नाही का? सिनेमा आहे इजाजत. गायीका आशा भोसले. संगीतकार आर डी. गीतकार गुलझार. जेव्हा आमच्याकडे व्हिसीपी (व्हीसीआर नाही) आला तेव्हा मग आमच्या घरच्यांच्या सिनेमाप्रेमाला एक नवा आवेग आला. जमेल तेव्हा, परिक्षा असो किंवा नसो, पटकन एक टेप आणायची व सिनेमा दोन अडीच तासात बघायला घरात कोणाची ना नसायची. :-) आर डी बर्मन यांचे अजुन एक गीत. सिनेमा १९४२ अ लव्ह स्टोरी. चांदनी सिनेमातील सुरेश वाडकर यांनी गायलेले हे गाणे विसरुन कसे चालेल? रोटी कपडा मकान मधले हे पुढचे प्रसिद्ध गाणे मला तितकेसे आवडत नाही पण तेव्हाच्या फक्त प्रेयसी व आजची प्रेयसी व पत्नीसाठी एक दोन वेळा दांडी मारुन एकत्र काढलेले दिवस आठवून छान वाटते :-) अलिकडच्या काळात पावसाचा इतका सुंदर वापर करुन चित्रीत केलेली ही पुढची दोन गाणी मला अतिशय आवडतात. सिनेमा ताल, संगीत रेहमान. आणी हे एक तुमची आवडती पावसाची गाणी देखील प्रतिसादात जरुर लिहा.

याद्या 5021
प्रतिक्रिया 27

मस्त.. गाणी पाहताना, ऐकताना पावसात भिजल्यासारखे वाटले.. स्वाती

माझी आवडती पाऊसगाणी :- घर आजा घिर आये बदरा सांवरिया [छोटे नवाब-लताबाई- आरडी], रिमझिम के तराने लेके आयी बरसात [काला बाजार-रफी-गीता दत्त- एसडी], रिमझिम गिरे सावन [मंजिल-लता-आरडी]{हे किशोरकुमारचंही आहे, मला लताचं जास्त आवडतं.}डर लागे गरजे बदरिया [रामराज्य-लताबाई-वसंत देसाईंचं संगीत], सदाहरित सावन का महीना पवन करे सोर [मुकेश-लता-एलपी], बरसे बुंदियां सावन की [भजन]आणि अजून बरीच. श्रावणात घन निळा बरसला, घन घन माला नभी दाटल्या, अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले, आला पाऊस मातीच्या वासात ग अशी खूप छान छान पाऊसगाणी मनात रुंजी घालताहेत.

In reply to by क्रान्ति

यात भर घालायचीच तर सहजपणे आठवलेली आणखी काही गाणी: १. अब के सावन ऐसे बरसे.... (हे गाणं नुसते न वाजवता कानाच्या पडदे फाटतील असे जोरजोरात हवे आणि सोबतीला डॅन्स करायला मित्रमैत्रीणीही) २. झेर झिर बरसे सावन अखियाँ साँवरिया घर आये.... (आशिर्वाद) पण हे गाणे कुठे संपते याकडे नीट लक्ष द्यायला लागते. नाहीतर लगेच "आ गया" म्हणत जाडजूड साँवरिया संजीवकुमार येतो.. ३. सावन बरसे तरसे दिल.... (हे गाणे ऐकताना सोबत भिजायला एकच माणूस असले तरी पुरे. ;) )

Get this widget | Track details | eSnips Social DNA
http://www.esnips.com/doc/b8e4740e-c027-437f-84ed-552f6cd9309d/Barse-Bundiya-Sawan-Ki---Lata-Mangeshkar http://www.youtube.com/watch?v=Y0YzSsjIr5w http://www.youtube.com/watch?v=GTUWZMYKiPw http://www.youtube.com/watch?v=qo0-UvnG7p4 http://www.youtube.com/watch?v=O_CI5JxQzvw http://www.youtube.com/watch?v=dpOcmdq1keA&feature=PlayList&p=45C74EAEB966D25B&playnext=1&index=88 तुर्तास एवढीच आठवतात.

>>ऑफिसातुन व्हिडिओ दिसत नाही.. शेम २ शेम ऐसाईच बोल्ताय पण वर्णना वरुन १) जिंदगीभर नही भुलेंगे... २) कतरा कतरा... ३) रीम झीम रीम झीम... ४) लगी आज सावन की ... येवढीच गाणी ओळखता आली. बाकी ही चारही गाणी अतिशय आवडती अजुन सुचली तर सांगेनच. सहजराव ४-५ वाक्यात प्रत्येक गाण्याच रसग्रहण वाचायला आवडल असत. :)

वेक अप सिड मधले हे एक गाणे अजुन एक गाणे! सावरीया सिनेमातील माशा अल्ला

पावसाळा सुरू झाल्यावर हमखास आठवणारी काही आवडती गाणी.[ही गाणी बघताना/ऐकताना मुड काही वेगळाच सेट होतो :) ] १. रिमझिम गिरे सावन... २. पिया बसंती रे... ३. प्यार हुआ इकरार हुआ... ४. सुर है ना ताल है... ५. भागे रे मन.... ६. तु ही रे.... या गाण्यांबद्दल जास्त काही सांगण्याची गरजच नाही, बघा आणि ऐका :)

In reply to by प्रभो

हापिसात युट्युब बंद म्हणून घरी जाऊन प्रतिसाद देईन असा विचार करून हा धागा बाजूला ठेवला तो उरलाच. सर्वप्रथम प्रभोंशी बाडिस आहे! पाऊस म्हटल्यावर हेच गाणं आठवतं आधी! ;) मग रिमझिम गिरे सावन, अब के सजन सावन मे (गाण्यात पाऊस नाही पण शब्दांत आहे म्हणून), रिमझिम रिमझिम, भीगी भीगी रातों मे (याचं नवं व्हर्जनही अनुपमा वर्मा मुळे खूप आवडलं! ;)) वगैरे गाणी आठवली. पण माझं सगळ्यात आवडतं गाणं हे : पहेली चित्रपटातील 'वॄष्टी पडे टापुर टुपुर'! अगदी टपोरे थेंब पडल्याचा भास होतो! मस्तच! सहजराव, मस्त धागा!

In reply to by मेघवेडा

धागा वर आलाय तर आमच्या अजून २-३ आवडी टाकतो. जिया धडक धडक जाये - कलयुग - थोडासा पाउस आहे ह्यात :) http://www.youtube.com/watch?v=wfSuwqmR9rs तुझे याद ना मेरी आयी - कुच कुच होता है.. http://www.youtube.com/watch?v=CAiBQnm1VL0 आणी 'टिप टिप' च्याखालोखाल आवडणारं मि. इंडिया मधलं 'कांटे नहीं कटते दिन ये रात' ...... आहाहा..काय त्या श्रिदेवीच्या अदा... ;)

सहजराव, वरील सर्व गाणी पावसात भिजवणारी आहेत. मस्त भिजलो. :) रुदालीतले 'दिल घुं घु करे घबराये. घन धम धम करे' चालेल काय ! -दिलीप बिरुटे

आहाहा! एकदम पावसात भिजल्यासारखं वाटलं. मला तर पाऊस म्हटलं कि मायमराठीतली गाणी आठवतात. आज कुणीतरी यावे. चिंब भिजलेले रूप सजलेले वगैरे. आणि गारवातली सगळी गाणी.

लेख आवडला. प्रतिक्रियांत सुचवलेली गाणीही मस्तच. हे अजून एक अप्रतिम गाणं - ओ सजना, बरखा बहार आयी आणि लगानमधलं हे 'घनन् घनन्' शिवाय 'सावन बरसे तरसे दिल' मराठीत श्रावणात घननीळा,रिमझिम झरती श्रावणधारा, घन ओथंबून येती, नभ मेघांनी आक्रमिले अशी मोठी यादी आहे. [गालबोट/दृष्ट लागू नये म्हणून भिकार गाणं पहायचंच असेल तर इथे पहा - http://www.youtube.com/watch?v=h99-DrCWttM (रेन इज फॉलिंग छमा छम छम) :).]

सहजशेठ, सुंदर धागा..काय एक से एक गाणी एकत्र ऐकता\पाहता आली ..धन्यवाद! (आभारी)केशवसुमार बर्‍याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या..इथल्या पावसात ती मजा नाही :( (स्मरणशील)केशवसुमार

एक से एक गाणी .... मजा आली, चांगले कलेक्शन होते आहे ह्या धाग्यावर ... पण आमच्या बिकाम्चे आवडते गाणे कसे कुनीच दिले नाही ;)

मस्त गाणी!! मला तक्षकमधील बुंदोंसे बातें पण आवडते. चित्रिकरणात पाऊस आहे असे सरफरोश मधील जो हाल दिलका पण आठवले! :)

मधुबालेला बघून दिल खुष झालं. (भारत भूषणसाठी केव्हाच फिल्टर डेव्हलप केला होता) झीनतला डिट्टो डिट्टो डिट्टो डिट्टो.(मनोज कुमारसाठी डिट्टो डिट्टो.......................)

मस्त धागा , मला गुरू मधलं ऐश्वर्याचं 'बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो' हे गाणं पण खूप आवडतं. यु-ट्युब हाफिसात नाही उघडत त्यामुळं लिंक नाही देता येत.....

In reply to by पुष्करिणी

हे गाणं खूप आवडतं. माझी पावसाची आवडती गाणी आधीच दिलेली आहेतच, पिया बसंती, भागे रे मन वगैरे. नंदनला देखो बारीश हो रही है आठवलं नाही, कमाल आहे ;-)

चित्रपट पहेली: सत्यजित आणि नमिता चंद्रा, गायलंय सुरेश वाडकर-हेमलता यांनी मूळ गाणं बंगाली होतं, रवींद्रनाथ टागोरांचं, त्यातले 'बृष्टी करे टापूर टूपूर' हे शब्द या हिंदी अवतारात तसेच ठेवलेत, आणि बर्‍याच वर्षांनंतर तेच लक्षात राहतात हे गाणं आठवलं की... चित्रपटः अजनबी, राजेश खन्ना- झीनत, लता-किशोर