सरी
बेभान होऊन उठलं सभोवार काहूर
अंधुक झाली डोंगराची लांब किनार
बुंध्यातला पालापाचोळा विस्कटला गगनी
सर्वञ माळरान आले अंधारूनी
डोईवर मावळली अस्मानाची निळीभोर काया
मातीत विरघळल्या सुकलेल्या काळ्या छाया
माथ्यावर पांघरली गरजत मेघांनी शेज
ऐन ज्वानीनं बहरली ढगांत वीज
चिंब घनातून कोसळू लागल्या सरी
ओले थेंब पाऊल हलकेच घुटमळले दारी
काव्यरस
मिसळपाव
वैमानिक पियर्सन आणि सहवैमानिक क्विंटल त्या दिवशी सकाळी मॉंट्रेयलहुन एडमॉन्टन ला नियमित जाणारे विमान उड्डाणासाठी तयारी करीत होते.